________________
मोरोपंतकृत प्रिया बसविली शिरीं, मुनिपथीं कसा देक्ष हा? ॥ १०३ सुरासुरनरोरगां भुलवुनी कथा न त्यजी; न भेर्दै करि पंक्तिचा; अमृत पाजिती सत्य जी। १. वल्लभा, अर्थसंदर्भानें गंगा. प्रास्ताविकः-महादेवाला मोहिनीने वश केलें यांत आश्चर्य करण्यासारखें कांहीं नाही. कारण महादेव खरा योगी नव्हता. चतुर्थचरणार्थःमहादेवाने आपली बायको गंगा हिला आपल्या डोक्यावर जटाजूटांत बसविली, म्हणून तो स्त्रीजित ठरला. अशा स्त्रीजित महादेवाला मोहिनीने भुलविलें यांत लिने मोठासा पराक्रम केला असे मुळीच नाही. महादेवाला महायोगी म्हणणे बरोबर नाही. कारण त्याने आपली बायको आपल्या डोक्यावर बसवून घेतली. ज्याची बायको शिरजोर तो मुनिमार्गाने चालण्यास समर्थ असे कसे म्हणावें ? २. भागवतांतील पुढील वचन पहावें:-'किं विद्यया किं तपसा किं त्यागेन श्रुतेन वा । किं विविक्तेन मौनेन स्त्रीभिर्यस्य मनो हृतम् ॥ (२.६.११) मुनिपथीं-मुनिमार्गात, मुनिधर्मांत. ३. चतुर, समर्थ. यांत कवीनें भगवंताशी विनोदपूर्वक कोटिक्रम केला आहे. यांत उपमान जी मोहिनी तिजपेक्षां उपमेय जी कथा तिचे मोहकत्वगुणसंबंधाने आधिक्य वर्णिले आहे म्हणून हा व्यतिरेक अलंकार होय. के० ३१ पृ० ८६ पहा. ४. प्रास्ताविकः-यांतही मोहिनीपेक्षां भगवत्कथेचें आधिक्य वर्णिले आहे. सुर (देव)+असुर (दैत्य)+नर (मनुष्य)+उरग (सर्प, उराने सरपटत जातो म्हणून सर्पाला उरग म्हणतात,) यांना=देवदैत्यमनुष्यसाना. अन्वयार्थः-कथा सुरासुरनरोरगां अलवुनि न त्यजी; पंक्तीचा भेद न करि; जी सत्य अमृत पाजिती; तिणे जरि स्वरतमानसां सुधारस पाजिला, [तरि] ती बापा ! जिला द्रव नयेचि [ती] [राहुकेतूंना] अमृत घोटितां वधी. प्रथमचरणार्थः-भगवत्कथा देवांना, दैत्यांना, मनुष्यांना, तशीच रूपांना आपल्या मोहकगुणाने मोहित करिते. पण ती त्यांचा त्याग करीत नाही. उलटपक्षी मोहिनीने देवदैत्यमनुष्यादिकांना आपल्या सौंदर्यादि गुणांनी च. टका लावला खरा, पण शेवटी तिने त्यांचा त्याग केला, ती त्यांना सोडून गेली तशी गोष्ट कथेची नाही. ती ज्याला एकदां मोह पाडिते त्याच्या जवळ ती शेवटपर्यंत राहन त्याचा सांभाळ करिते. ५. मोहित करून. ६. भिन्नभाव. द्वितीयचरणार्थ:-देवत्यांच्या पंक्ती बसल्या असतां मोहिनीने देवांस अमृत पाजून व दैत्यांस न पाज भेदभाव दाखविला तसा प्रकार भगवत्कथेचा नाही, ती सर्वांना अमृत पाजिते. एकाला चांगला पदार्थ वाढून दुसऱ्याला तो न वाढणे किंवा वाईट पदार्थ वाढणे माला करणे म्हणतात. भावार्थः-समुद्रमंथन केल्यावर अमृत निघाले तेव्हां देवदैत्याम भांडण लागले. त्या वेळी अमृत वाढण्याचे काम मोहिनीने आपणाकडे घेऊन देवांना मात्र तिने ते वाढले, पण दैत्यांना वाढले नाही. याप्रमाणे मोहिनीने देवांची तरफदारी केली. 'अमृतमथनां'तील पुढील वर्णन पहा:-'सुर असुरांत बसविले बहु, असुर सुरांतही प्रताराया । ज्यां पंक्तिभेद घडला या स्वयशे तेहि विप्र ताराया. ॥३-२२ ॥ बहुमाने प्रियवचनें निकटस्थासुर अति.