________________
केकावलि. 'तिणे जरि सुधारस स्वरतमानसां पाजिला, वधी अमृत घोटितां, व नयेचि बापा ! जिला.॥ १०४ क्रमुनि जाय । दूरस्थ सुरातें दे अमृत, लहानासि पय जसें माय ॥ २३ ॥' तसा प्रकार कथेचा नाही. ती लहान थोर, गरीब श्रीमंत, सगळ्या लोकांना सारख्या रीतीने वागविते व त्या सर्वांना अमृतच पाजिते. म्हणून मोहिनीपेक्षां भगवत्कथा श्रेष्ठ. ७. येथे अमृत शब्द श्लिष्ट आहे. याचे 'सुधा' आणि 'मोक्ष' असे दोन अर्थ होतात. मोहिनीने देवांना अमृत म्हणजे सुधा पाजली, कथा सर्व लोकांना अमृत म्हणजे मोक्ष देते. 'तेहि अमृत ओगरितां करि सुज्ञहि विष्णु पंक्तिभेदातें'. (विश्वेशस्तुति)..खरोखर. व्या०:-सत्य हे क्रियाविशेषण न करितां पाहिजे असल्यास 'अमृत' शब्दाचे विशेषण करावें. सत्य अमृत खरें अमृत, अमृत या नांवाने प्रसिद्ध असणारी सुधा हे खोटें अमृत. मोक्ष हे खरें अमृत. यांत 'पर्यस्तापन्हुति' अलंकाराची स्पष्ट छाया पडली आहे. अशाच प्रकारचा उद्गार कवीनें गंगास्तुतींत काढला आहे-'अमृतचि तव अमृत; म्हणे अमृत असें ज्यासि शक्र, पाणी तें; । गंगे! मागति हेचि ज्ञाते प्राथूनि चक्रपाणीतें'. ॥ [गीति ९६ पृ० ५५]. केकामाधुर्यः-मोहिनीने आपल्या आवडत्या भक्तांस मात्र अमृत पाजिलें; तेही खोटेंच; भगवत्कथा सर्वांना अमृत पाजिते तें देवपेयासारखे अशाश्वत सुख देणारे नसून कैवल्यासारखें चिरंतन सुख देते. सुधा प्राशन करणारे देव सुद्धा क्षीणपुण्य झाले म्हणजे मृत्युलोकी जन्म घेतात. पण ज्यांना एकदां कैवल्यसुखाची (मोक्षाची) प्राप्ति झाली त्यांचा मात्र कधीं नाश होत नाही व ते अखंड सुखांत राहतात. १. मोहिनीने. २. आपल्या ठिकाणी आसक्त झाले आहे चित्त ज्यांचे अशा देवांना; (किंवा) 'स्व' म्हणजे आत्मा त्याचे ठिकाणी रत म्ह० रममाण झालेल्या, अर्थात् आत्मस्वरूपनिष्ठ देवांना. दैत्य आत्मरत नव्हते म्हणून 'स्वरतमानसां' हे पद त्यांच्याकडे लागू होत नाही. ३. गिळतांना. ४. ओलावा; दया. द्वितीयार्धाचा अर्थःमोहिनीने देवांना अमृत पाजिलें, पण देवांचे रूप घेऊन देवसमाजांत बसणाऱ्या राहकेतूंना मात्र तिने अमृत पy दिले नाही. तर तिने त्यांची दया न करितां ते अमृत गिळित असतां चक्राने त्यांची शिरे कापली. कथा अशा प्रकारचा कोणाचाही विश्वासघात करीत नाही. तिच्या ठिकाणी पक्षपात मुळीच नसून ती सर्वांना सारख्या रीतीने वागविते. भगवत्कथाः-ह्या ठिकाणी कवीने भगवत्कथा मोहिनीपेक्षा श्रेष्ठ असे सिद्ध केले आहे. दुसऱ्या एका स्थळी ती अमृतापेक्षा अधिक गोड आहे असा त्याने आपला अभिप्राय दर्शविला आहे. तो असाः-'झाले जे तृप्त भास्वत्कुलतिलकरघूत्तंसलीलारसाने,। सारासारज्ञ साधु स्वमान अमृतही मानिती फार सानें। पीयूषं सोदरेंदुक्षयहि न हरिला, त्यागिलेंही पित्याला, राहूचा घात केला, विषसहजनिला कोण सेवील त्याला !' ॥ १० ॥ [प्राकृत मंत्ररामायण-उपसंहार, पृष्ठ १०७] या केकेंतही व्यतिरेकालंकार आहे. 'अमृत' या पदाचे दोन अर्थ आहेत म्हणत येथे श्लेषही आहे. २३ मो० के०