________________
केकावलि. २५५ देऊन त्याने त्याची नभोमंडळांत नक्षत्रमालिकेंत स्थापना केली. ह्याच कथेवरून महादेवाचें 'ऋतुध्वंसी' असें नांव पडले आहे. शिवाची नांवें:-शिवाविषयी पुष्कळ रूपके आहेत ह्मणून पृ० १८२ च्या दुसऱ्या टीपेंत सांगितलेच आहे. पुराणांत एका स्थळी असा एक श्लोक आढळतो:-'चरितानि विचित्राणि गुह्यानि गहनानि च । ब्रह्मादीनां च सर्वेषां दुर्विज्ञेयोऽस्ति शंकरः ॥ ब्रह्माविष्णूची चरित्र विचित्र, गुह्य व गहन तर आहेतच पण शंकराची चरित्रं तर समजण्यास फारच कठीण. शंकराच्या प्रत्येक नांवांत कांहीं तरी खुबी असतेच. केकावलीत महादेवाची ‘सदाशिव' (केका० १), 'गंगाधर' (के० २४), 'कृत्तिवासा' (के० ३०), 'हर' (३१), 'शिव' (६८), 'मदनमारक' (६९), 'शंभु' (के० ७०), 'पुरांतक' (के० ७२), 'दक्षहा' (के० १०३), 'महेश्वर, (१०९) अशी दहा नांवे आली आहेत. त्यांपैकी बहुतेकांचा खुलासा टीपेंत केलाच आहे. त्यांपैकी शिव, सदाशिव, हर, शंभु व महेश्वर हीं नांवें परमेश्वराचीच आहेत. उदाहरणार्थ:-'शं सुखं भावयति उत्पादयतीति वा शंभुः, शं सुखं अस्मात् भवतीति शंभुः' (रुद्राध्याय, आनंदाश्रम ग्रंथांक २ पृ० ७२). 'जो सुख उत्पन्न करितो किंवा ज्याच्या पासून सुख होतें तो शंभु ('शंकर' याचा अर्थ तरी ऐहिक पारमार्थिक अशा दोन्ही त-हेचे सुख करणारा-देणारा हाच आहे). 'शिवः कल्याणरूपः, अकल्मषः, निस्वैगुण्यः' (रुद्राध्याय पृ० ७३), 'शिव' ह्मणजे मंगलरूप ईश्वर, ‘समेधयति यन्नित्यं सर्वार्थान्सर्वकर्मसु । शिवमिच्छन् मनुष्याणां तस्माद्देवः शिवः स्मृतः ॥ (महाभारत-रुद्राध्याय पृ० ७३). दक्षाच्या कथेतील रूपकः-'दक्षहा' (दक्षाचा नाश करणारा) ह्या शब्दांत येणाऱ्या कथेत तरी महादेवाच्या संबंधानें गूढ रूपकच आहे. 'दक्ष' शब्दाचा अर्थ निपुण. कोणत्याही विद्येत किंवा कलेत प्रवीण मनुष्य तो दक्ष. आतां दक्षता किंवा प्रवीणता प्रत्येक कलेत किंवा विवेत असते म्हणून दक्षाला अनेक कन्या (अनेक विचा) झाल्या असे हटले त्यांत ब्रह्मविद्या ही नेहमी 'एकमेवाद्वितीयं' परमेश्वरालाच धरून राहाते ह्मणून तिला सती असें नांव देऊन तिला दक्षाची ज्येष्ठ कन्या कल्पिली; व तिचे मंगलस्वरूप परमेश्वर हाच शिव ह्याच्याशी लग्न लाविलें. पूर्वी कृतयुगांत ब्रह्मवेत्ते ऋषि यज्ञ करित. ते यज्ञ प्रेमप्रधान म्हणजे केवळ ईश्वराची कृपा आपणावर व्हावी एवढ्याच हेतूनें नूतन स्तोत्रे रचून केलेले असत. तेव्हां त्या यज्ञांत सतीचा व शिवाचा उत्तम मानसन्मान होत असे. पण पुढे पुढे जसे जसे लोक स्वार्थपर झाले तसे तसे त्यांचे यज्ञ 'प्रीतिप्रधान' होण्याचे कमी कमी होऊन शेवटी शेवटी ते पर्ण कामप्रधान' (स्वार्थपर) झाले. म्हणजे लोक ईश्वराची आराधना ब्रह्मसुखाकरितां न करितां धनधान्यपुत्रपौत्राकरितां किंवा आयुरारोग्याकरितां करूं लागले. अशा यज्ञात स्वार्थपर विद्यांचा व त्यांच्या पतींचा सन्मान होऊन ब्रह्मविद्या सतींचा व मंगलस्वरूप अशा तिच्या पतीचा मोठा अपमान झाला. तेव्हां सतीने अग्निकुंडांत उडी टाकून ती भस्म झाली म्हणजे ब्रह्मविद्या गुप्त झाली. तेव्हां 'यज्ञेश्वर' (प्रीतिप्रधानयज्ञाचा ईश्वर) शिवाला राग येऊन त्याने कामप्रधान यज्ञाचा नाश करून त्यांत हविर्भाग घेणाऱ्या देवांचे शासन केले. पुढे सती हिमालयाची कन्या पार्वती __ होऊन तिनें शिवाला वरिलें. अर्थात् ब्रह्मविद्या जगांतून नाहीशी होऊन हिमालयस्थ ऋषींजवळ राहावयास गेली व तेथे मात्र केवळ परमेश्वराच्याच सेवेत ती सादर झाली. हे रूपक सारांशरूपाने सोडविले आहे. जास्त विस्तार प्रत्येकाने आपल्या अंतःकरणांत करावा.