पान:केकावलि.djvu/261

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२५४ मोरोपंतकृत ___हरो असुरधी; हिणे भुलविले किती हो! येती; । नव्हे न ह्मणवे; असो; जरि विमोहिला दशहा, मग राहूसारख्या ज्ञान्याचे सोंग घेतलेल्या, अथवा अर्धवट ज्ञानी मनुष्याला अमृत कसे पचावें ? पचलें नाहीं हे नीटच झाले. मोहिनीने स्वतः देवांस अमृत पाजिले व दैत्य अमृतास मुकून मद्यसेवनांत तर्र झाले यावरून परमेश्वरास अनन्यभावाने शरण जाणाऱ्या भक्तांस माया वाधक न होतां उलट साधक होते व तिच्याच साह्याने त्यांना अमृताचा (मोक्षाचा) लाभ मिळतो; उलटपक्षी मूढजनांना ब्रह्मानंदाची प्राप्ति होणे तर लांबच राहते परंतु ते क्षणिक विपयानंदांतच तल्लीन होऊन जातात ह्या गोष्टी कळून येतात, देवदैत्यांनी समुद्रमंथन केलें या कथेतील रूपक हरिवंश 'पुष्करप्रादुर्भाव' या प्रकरणाच्या टीकेंत सुप्रसिद्ध टीकाकार नीळकंठ चतुर्धर यांनी सोड. विले आहे. त्याचे मोरोपंतांनी पुढील प्रमाणे सारांशरूपाने भाषांतर केले आहे. आमच्या वाचकांस त्याचे मनन करण्यास सांपडावे ह्मणून तेवढी गीति येथे दिली आहे:-'मन सिंधु, मतिच मंदर, कथिलें शमकाम जे सुरासुर ते, । अभ्यास हेंचि मंथन, मुक्ति सुधा, जाणती सुधी पुरते. ॥' (हरिवंश ४५. २८). ४. सुप्रसिद्ध. १. दैत्यांची बुद्धि. प्रास्ताविकः-मोहिनीने दैत्यांस वश केलें असें भगवान ह्म__णतील अशी आशंका मनांत आणून कवि ह्मणतात. द्वितीयचरणार्थः-तिणे दैत्यांची मने हरण केली तर खुशाल करो. तिने तसे केले यांत मोठे नवल नाही. कारण बोलून चालून दैत्य तमोगुणी व स्थूलबुद्धि पडले; पण कथेनें सत्वगुणी व सूक्ष्म बुद्धि अशा हजारों तपस्व्यांस स्ववश केले. तेव्हां मोहिनीच्या प्रभावापेक्षां कथेचा प्रभाव माँठा हे उघड झाले. २. 'यति' ह्या शब्दाने संन्यासी, योगी, तपस्वी, मुनि इत्यादि सात्विक भगवद्भक्त यांचे ग्रहण करावें. ज्याने आपली इंद्रियें स्ववश केली तो यति. ३. मोहित केला. प्रास्ताविक:-कथेने शेकडों तपस्व्यांची मने आपल्या स्वाधीन केली खरी पण त्या मोहिनीने सर्व योगिजनांत श्रेष्ठ जो महादेव त्यास भुलविलें अशी भगवदाशंका मनांत आणून कवि म्हणतात. तृतीयचरणार्थः-मोहिनीने योगिजनांचा स्वामी दक्षांतक महादेव याला मोहित केलें हे खरें, माझ्याने नाहीं म्हणवत नाही. पण ते एकीकडे राहो. कारण दक्षयज्ञविध्वंसक महादेव हा तरी तमोगुणीच होता. ४. दक्षाचा नाश करणारा महादेव. कथासंदर्भ:-दक्षप्रजापति हा महादेवाचा सासरा. ह्याने एकदां यज्ञास आरंभ केला तेव्हां त्याने सर्व देवांस पाचारण केलें. पण महादेवाला बोलाविले नाही. तरी दक्षकन्या गोरी हिला बोलावणे नसतांही बापाचा यज्ञ पहावयास जावे म्हणून ती निघाली. तेथे दक्षाने तिच्या भर्त्याची पुष्कळ निंदा केली. मी साहून तिने आपल्या देहाची अग्निकुंडांत आहुती दिली. महादेवाला हे वर्तमान कमले अत्यंत क्रोध येऊन त्याने आपली जटा आपटली व त्यापासून निघालेल्या वीरभद्रास त्याने दक्षयज्ञाचा नाश करण्यास आपल्या बरोबर नेलें. वीरभद्राने यज्ञमंडपांत जाऊन यशाचा विध्वंस करण्यास आरंभिलें व सर्व ऋत्विजांची दाणादाण केली. तसेच महादेवाने दक्षाचे शिर तोडून तो मृगरूपाने पळणाऱ्या यज्ञाच्या पाठीस बाण घेऊन लागला व त्या मृगाचे शिर तोडून त्यास मृगशीर्ष हे नांव