पान:केकावलि.djvu/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ष्णाशी पुष्कळ वर्षांनंतर झालेली भेट (अ. ८२), नंदवसुदेवाची भेट (अ. ८४), हे भाग पहावेत. सर्वांत भक्तिरसाची भट्टी पंतांना फार चांगली साधली आहे. याची उदाहरणे पंतांच्या काव्यांत सर्वत्र आहेत. केकावली, भीष्मभक्तिभाग्य, कृष्णविजयांतील सुदामचरित्र (अ. ८०,८१), श्रुतदेवबहुलाश्वकथा (अ. ८७), उद्योगपर्वांतील कृष्णाचें विदुरगृहीं भोजन, द्रोणपर्वांतील कृष्णाने अर्जुनाच्या अश्वांची केलेली चाकरी इत्यादि अनेक प्रकरणे या गोष्टीची उत्तम साक्ष देतील. परमार्थसाधन हे पंतांच्या काव्यरचनेच्या मुळाशी असल्यामुळे त्याच्या काव्यांत भक्तिरसाचा पाक अमृततुल्य मधुर झाला आहे यांत नवल नाही. यासंबंधाने लिहितांना पंतांच्या काव्याची योग्यता कालिदास, भारवी, दंडी इत्यादि संस्कृत कविवर्याच्याही वरची आहे असे एका नामांकित विद्वद्वर्याचें ह्मणणे आहे. त्यांच्या मते पंतांची कविता कालिदासाच्या कवितेप्रमाणे प्रसन्न असून भारवीच्या कवितेप्रमाणे ती भारदस्त आहे. तसेंच 'मोरोपंती भारतांतील कांहीं आख्याने नीट समजलीं ह्मणजे सगळा कालिदास व सगळा भारवी वाचल्याचे श्रेय मिळून आणखीही अधिक लाभ होतो. तो लाभ भक्तिरसाचा व देवाविषयी आस्तिक्यबुद्धीचा होय. भक्तिरसाचा लाभ कालिदासाच्या, काव्यांत फारसा होण्याचा संभव नाही. भारवीने आपल्या काव्यांत भक्तिरसाचा छटा निःसंशय उडविलेला आहे. पण कोठे मोरोपंती भक्तिसागराचा अलोट पूर व कोठे भारवीची भक्तिरसाने मंद मंद वहात जाणारी छोटी सरस्वती.' सारांश ज्या ज्या स्थळी पंतांनी ईश्वराविषयी किंवा ईश्वरभक्ताविषयी उद्गार काढिले आहेत त्या त्या स्थळी त्यांची वृत्ति लीन व तदाकार झालेली दृष्टीस पडून त्यांचे काव्य सुरस, आनंदजनक व माधुर्यप्रसादादि गुणगणमंडित झाले आहे. पंतांच्या काव्यरूपी महावस्त्रांत नीतितत्वांचा बोध करणारी सुभाषितरत्ने जागोजागी गुंफिलीं असल्यामुळे काव्याची प्रभा द्विगुणित वाढून वाचकांची मने बोधप्रकाशमय होतात. पंतांच्या काव्यांतील सुभाषितसंग्रह एवढा मोठा आहे की, तो सर्व एकवटला असतां मनास बोधपर व उन्नतिपर असें शिक्षण दुसऱ्या , कोणत्याही पुस्तकाचे फारसें साह्य न घेतां सहज देता येईल. त्यांच्या सुभाषितांचीं कांहीं निवडक उदाहरणे परिशिष्ट-'ख' मध्ये दिली आहेत. मोरोपंत कवि रसिक होते ही गोष्ट त्यांचे काव्य वरवर वाचून पाहाणारांच्या सुद्धा दृष्टीस येईल. त्यांनी आपल्या काव्यांत रसिकत्वाविषयी पुष्कळ ठिकाणी उल्लेख केले आहेत (परिशिष्ट 'उ' पहा). त्यांच्या काव्यांतून प्रसंगोचित, खुबीदार व बाणेदार भाषणे, व हृदयंगम वर्णने यांचा सुकाळ दिसून येता. विस्तारभयास्तव त्यांची उगीच थोडीशी उदाहरणे पुढे दिली आहेत. 'वर माग' ह्मणणा-या अश्विनीकुमारांस माद्रीचे पुढील भाषण किती खुवीदार, समयोचित व हृदयंगम आहे ते पहाः माद्री हांसोनि ह्मणे 'जाणुनि हृद्रोग, त्यासि अगदानें । दूर करा जी ! रोगी न निवे कनकाचियाहि अग-दानें.' ॥ (आदि. १८.९७) आश्विनीकुमार हे देवांचे वैद्य होते तेव्हां वरील दृष्टांत फारच समर्पक आहे. पुढील उक्ती नारदार व बाणेदार आहेत त्या पहा. भीष्माचें परशरामाशी भाषण:--