पान:केकावलि.djvu/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( २३ ) वधिले क्षत्रिय तेव्हां नव्हता हा भीष्म शांतनव समज, । देवासि मागते ते झाले, मरणी, करूनि नवस, मज. ॥ (उद्योग १३.३८) सैरंध्री भीमसेनास ह्मणतेः निजलां काय मृतापरि ? व्हा जागे सिंहसे उठा, राहो । ___निद्रा, कीर्ति वरा, हो ! हीप्रद हा वाहु भृगुकुठारा हो. ॥ (विराट. १,८७) अर्जुन कृष्णास ह्मणतोः-- वधिले वीर, पळविले, मजसी कोणी न येति भांडाया,। म्यां न वधावें पळतां, चाला, मारूनी काय रांडा या ?॥ (कर्ण. ३५.६०) कृष्णाने इंद्रास सत्यभामेकरितां पृथ्वीवर पारिजातक वृक्ष मागितला. तेव्हां इंद्राची उक्तिः. सुर सुरतरु पाठवितां हा ! ह्मणतिल करुनि आठवा नाकीं, । विटुनि ह्मणेल शचीही स्वपरिग्रह हाहि पाठवाना की ! ॥ (हरि. २७.६५) भेदक उपहासाचे उदाहरण गदापर्व अ० ५,२९ यांत उत्कृष्ट दिले आहे: जप करिल ज्येष्ठ पिता घेउनि शतपुत्रशोकमणिमाळा, । असते नव पुत्र अधिक घडतें विध्युक्त कर्म भूपाळा. ॥ खोंचदार व क्रोधावेशयुक्त भाषणाची ठळक उदाहरणे पाहणे असल्यास कर्ण. ४०,४५७७; ४२,२६-४९ पहा. तसेंचः दुर्योधनादिकांची श्राद्धे जरि वाटली मना कार्ये, । कां बकहिडिंबकीचककिर्मीरांची करूं नये कार्ये ? ॥ (आश्रम. २.१०१) वाप ह्मणावें याला तरि असतें अरिस काय बा ! शिंग ? ॥ (आश्र. २.१०५) कर्णाचे शरसंधानलाघवः काढी, जोडी, ओढी, सोडी शर कर्ण, लाघवास्तव तें। न दिसे, दिसे शरासनमंडल हतशत्रुबलहि त्याभवतें. ॥ (कर्ण. ३०.७१) घटोत्कचाची त्वराः धर्मानुमतें स्मरतां द्याया गुरुदास्यपुण्य जनकानें, । __ ऐकें घरीं घ, टोत्कच नमनीं, तो सत्य पुण्यजन कानें. ॥ (वन. ५.२६) निजलेल्या वीरांना कपटाने मारल्याबद्दल भीम अश्वत्थाम्यावर धावून गेला तेव्हां ब्रह्मास्त्रापासून त्याला वाचविण्याकरितां कृष्णाची त्वराः प्रभुने प्रतोद घेउनि, भीमाच्या संकटांत अवनातें। __ हय हांकिले कराया हीत प्रीतहि मनांत पवनातें. ॥ (ऐषिक. २.२) . दुर्योधनाचे बाणेदार भाषणः-गदा. अ० १०,१४-२३; अ० ९,११-१८; अ०६. ३६-४१ पहा. धृतराष्ट्राचा शोकः हुरहुर बहु खोटी रे ! उर ! उर न क्षणहि, काळजा ! तडक,। असु हो ! निघाचि, न चुका पुत्रप्रस्थानकाळ, जा तडक. ॥ (शल्य, १.२६)