Jump to content

पान:केकावलि.djvu/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

त्या शृंगाररसाचे वर्णन पंतांच्या काव्यांत वाचले असतां असे दिसून येईल की प्रणयी जनांची हृद्गतें जरी कवीला पूर्णपणे अवगत होती तरी त्यांनी कोठेही फाजिलपणा केलेला नाही. शृंगारवर्णन तर अप्रतिम आहे पण अश्लीलत्व त्यांत मुळीच नाही. पंतांच्या कवितावधूचा शृंगार इतर कवींच्या शृंगाराप्रमाणे अश्लील नसून तो पतिव्रतेच्या शंगाराप्रमाणे मर्यादशील आहे. पंतांचे शृंगाररसवर्णन भवभूतीच्या शृंगाररसवर्णनाप्रमाणे खुबीदार, नाजूक व प्रौढ असते. शृंगारवर्णनाचा कळस करण्यासारख्या प्रसंगीही त्यांनी आपला मर्यादशील व प्रौढ शृंगारवर्णनाचा क्रम सोडिला नाही. हरिवंशांतील भामाकोपशांतवन (अ० २६), प्रद्युम्नप्रभावती विवाह (अ० ३५), उषानिरुद्ध विवाह (अ. ४१), कृष्णविजयांतील कृष्णाची रासक्रीडा (अ० २९-३३), रतिप्रद्युम्नाची ओळख पटणे (अ० ५५), मंत्रभागवतांतील रासक्रीडा (१०-३७६-४०७), भारतांतील दुष्यंतशकुंतलाख्यान (आदि.१२), शर्मिष्ठययातिकथा (आदि. ११), पांडुमाद्रीसमागम (आदि. १९), उर्वशीकृत अर्जुनविलोभन (वन. ३.४७-७२), कीचककृत द्रौपदीप्रमाथ (विराट. १), हे प्रसंग पंतांच्या शृंगारवर्णनाची उदाहरणे होत. विप्रलंभ शृंगाराची उदाहरणे पाहिजे असल्यास मंत्ररामायणांतील किंवा वनपर्वांतील रामाचा सीतेविषयी विरह व मंत्रभागवतांतील किंवा बृहद्दशमांतील कृष्णदारविरहवर्णन हे प्रसंग पहावे. आतां क्वचित् प्रसंगी शृंगारांतर्गत बीभत्सवर्णन आढळतें, पण काळाकडे लक्ष्य दिले असतां ती गोष्ट क्षम्य असून त्याची अल्पता मोरोपंताच्या त्या रसिकतत्वाचे व सभ्यपणाचे मोठेच चिन्ह होय (पृ०६६-६८). पंतांच्या एकंदर काव्यमहोदधींत फाजिल शृंगाराची वर्णने किंवा तत्सूचक पदें फारच अल्प आहेत. वीररसवर्णन तर पंतांना उत्कृष्टच साधले आहे. वीररसाचे वर्णन करितांना पंतांना स्फुरण चढून 'सूं सणणणसणणणणण' अशी शब्दवाणांची वृष्टि करून ते वाचकांस प्रत्यक्ष समरभूमीच दाखवितात. वीररसाची उदाहरणे भारतांत व रामायणांत वाचकांस हवीं तितकी आढळतील. वनपर्वांतील किरातार्जुनयुद्ध, विराटपर्वातील अर्जुनप्रगटन, उद्योगपर्वांतील विदुलासंजय कथानक व भार्गवभीष्मयुद्ध, तसेंच भीष्मपर्वापासून गदापर्वापर्यंत सर्व पर्वे, व रामायणांतील रामरावणयुद्ध ह्यांत पंतांनी वीररसाचा महानदच निर्माण केला आहे. वीररसांत शृंगाररसाचे मिश्र वर्णन पहावयाचे असल्यास कर्ण. ३५.४८-५६, ३१.१४५, ३३.३३ पहा. करुणरसाची उदाहरणे पहावयाची असल्यास मंत्ररामायणांतील रामलक्ष्मणांस निश्चेष्ट पाहून सीतेने केलेला शोक, कुशलवाख्यानांतील रामाने सीतेचा त्याग केला तेव्हांचा सीतेचा शोक, हरिश्चंद्राख्यानांतील शोक, तसेंच द्रोणपर्वात अभिमन्युवधानंतर पांडवांनी केलेला शोक, वनपातर्गत नलदमयंतीकथा व यक्षाख्यानांतील शोक, तसाच कुरुक्षेत्रावर कौरवस्त्रियांनी युद्धानंतर केलेला स्त्रीपर्वातील शोक, ही प्रकरणे पहावी. रौद्राची उदाहरणे कर्णपर्वांतील दुःशासनवध, हरिवंश अ. ४८ तील देवदैत्यसमर, व सौप्तिकपर्व यांत सांपडतील. भयानकरस गदापर्वांत व सौप्तिकपात भरलेला आहे. बाकीचे बीभर व अद्भत हे रस वीर, भयानक, रौद्र, शूगार यांचे अनुषंगी असून हास्यरसाची छटा तरक आढळते. याशिवाय वत्सलरसपरिपाक पाहावयाचा असल्यास कृष्णविजयांतील वैटभीती प्रद्युम्नास पाहून झालेली अवस्था व तिचे भाषण (अ. ५५,-२९-३६), व्रजस्त्रियांची क.