________________
मोरोपंतकृत ___मता तुजहि गोपिका, मग जैनास तोटी किती ? ॥ भैरोनि कुचकुंभ जी विपरसें मुखीं दे बकी, ९७ १. मान्य. २. गवळीण; (अर्थानुरोधानें) कृष्णमाता यशोदा. चतुर्थचरणार्थः-यशोदा तुमची उपमाता असूनही ती तुला मानवली म्हणजे तिच्या ठिकाणी तुम्ही खरा मातृभाव ठेविला होता. अर्थात् तिला तुम्ही आपली प्रत्यक्ष माता समजून तिला 'आई आई' म्हणून हांका मारीत होता. यशोदेला तुम्ही माता म्हटले म्हणून जसे तुमचें कांहीं नुकसान झाले नाही तसे इतर लोकांनी आपल्या उपमातांस आया म्हटले म्हणून काय तोटा होणार आहे ? कांहीं होणार नाही. ३. इतर लोकांस. ४. नुकसान. 'तोटा' हा शब्द हिंदुस्थानी आहे. ५. प्रास्ताविक:-'यशोदा जरि वास्तविक तुमची उपमाता होती, तरी ती तुमचे स्वपुत्राप्रमाणे लालनपालन करीत होती म्हणून तिला तुम्ही माता म्हटले, यांत कांहीं आश्चर्य नाही; पण बकी (पूतना) मातेच्या वेषाने तुमचा घात करावयास आली व तिने तुम्हाला विष पाजिलें असे असून तुम्ही तिला मातेची सद्गति दिली हे मात्र आश्चर्य खरें!' असें९८व्या केकेंत कवि वर्णितात. ६. कुंभाकार (घागरीएवढे)स्तन. विस्तृत व पीन कुच असणे हे स्त्रीसौंदर्याचे लक्षण समजतात.कुचांना कुंभाची तसेंच मदोन्मत्त हत्तीच्या गंडस्थळाची उपमा देण्याचा कविसंप्रदाय आहे. 'घुसळितां कुचकुंभहि हालति' (वामन), 'वक्षोजकुंभ घन पीन' [विठ्ठल-बिल्हणचरित्र पृ० २१६ श्लो० २३), (मोहिनीवर्णन) 'कुंभस्तनी मदालसमधुरगति महाविभूतिची आली, । मूर्तिमती ती मंजुलगीतिच जाणों मृगव्रजी आली.' ॥ (मोरोपंतकृत अमृतमथन ३.१७) 'मातंगकुंभयुगुलस्तनभार' [विठ्ठलबिल्हण० पृ०२११ श्लो०२५]. स्वभुजांसि म्हणे सुरिंचे आलिंगुनि घटसम स्तन निवारे'। (द्रोण० ३. ७७). व्यर्थ स्त्रीरत्न जेवि अस्तन गा' (अस्तन=लवुस्तन). (द्रोण० ८.६६) कुचांना कोणकोणत्या पदार्थांची उपमा देण्याचा संप्रदाय आहे ते पुढील श्लोकांत व्यक्त केले आहे:-'पूगाब्जतत्कोरकबिल्वतालगुच्छेभकुंभाद्रिघटेशचकैः । सौवीरजंबीरकबीजपूरसमुद्रछोलंगफलैरुरोजः' ॥ (श्रीकेशवमिश्रकृत अलंकारशेखर). गोवर्धनाच्या मतें स्त्रीकुचांचे वर्णनीय गुण म्हटले म्हणजे 'स्तने श्यामाग्रतौन्नत्यविस्तारदृढपाण्डुता' । हे होत. ७. विषयुक्त रसाने. अन्वयार्थः-'प्रभो ! (देवा!) जी बकी (पूतना) विषरसे कुचकुंभ (आपले कुंभाप्रमाणे मोठे स्तन) भरोनि (स्तनाचे ठिकाणी विष लावून, स्तनांत विषरस भरण्यास कुच कुंभाप्रमाणे असले पाहिजेत म्हणून कवीने येथे स्तनावर कुंभत्वाचा मुद्दाम आरोप केला आहे) मुखीं (मुखांत) दे (देती झाली), तिसहि (तिलाहि) जशी देवकी तशी महार (सायुज्यसुखी) ठेविशी (ठेविता झालास); [तर मग] पशुपदार (गवळ्यांच्या स्त्रिया), गाई (धनु) जननी (माता) कशा न होती (कां होणार नाहींत) ? तत्सखें (गोपी गाई ह्यांची सुखें ) लया (नाशास) न पावतिच (पावणार नाहीत) [मग] या कृति (दयालुपणाची आणि कृतज्ञपणाची कृत्ये) कोण (कोणता कवि) न गाईल (गाणार नाही)? प्रथमार्धाचा अर्थः-आपल्या पीनोन्नतवर्तुलाकार स्तनांत विष माखून तुला