पान:केकावलि.djvu/244

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. २३७ प्रभो ! तिसहि ठेविशी, जशि महासुखी देवेकी । न होति जननी कशा पशुपदार, गाई ? लयाँ न पावतिच तत्सुखें, कृति न कोण गाईल या? ॥ ९८ मारावे म्हणून जिने ते स्तन तुझ्या मुखांत घातले अशा घातकी पूतनेस देखील देवा! तुम्ही साक्षात् जननी देवकीस द्यावयाचे असें कैवल्यसुख दिलेत. यांत तुम्ही आपली अत्यंत दयालुता व द्वेषबुद्धिशून्यता दाखविली. भागवतांतील पुढील लोक याशी समानार्थक आहे:-'अहो बकीयं स्तनकालकूटं जिघांसया पाययदप्यसाध्वी । लेभे गतिं धात्र्युचितां ततोऽन्यं कं वा दयालु शरणं व्रजेम' ॥ (३.२.२३) प्रभूनी घातकी पूतनेला माता मानून मातेला द्यावयाची गति दिली इतके ते दयाळ आहेत असे वर्णन पंतांच्या काव्यांत वारंवार केलेले आढळतें:-(१) 'अतिदुष्टा पूतनिका; हरिने दिधला स्वलोक परि पूत निका। मानियली जननी ती; प्रभुची गाती म्हणोनि सज्जन नीती.' ॥ [कृष्णविजय-पूर्वार्ध अध्याय ६ आ० गी० २८], (२) 'माराया तुज देवा! जी सविषस्तन्य दे बकी । केली तव प्रसादाने ती जशी धन्य देवकी.' ॥६॥ [मोरोपंतस्फुट काव्य-विठ्ठलविज्ञापना-पृष्ठ १४२], (३) 'तैसीही तरली जी स्तन्यमिषे दे बकी सुतापचि ती'। [उद्योगपर्व-अ० ७ गी० ७१], 'गरळस्तन्य तुला दे ती पावे पूतना महितकाय । मग न करिशील ध्यातां जपतां निजपूतनाम हित काय ? ॥ [हरिवंशअध्याय ५० गी० ८३.] - १. मोठ्या सुखांत, कैवल्यसुखांत. २. कथासंदर्भ:-देवकराजाची कन्या व वसुदेवाची पली. हीच पूर्वजन्मीं अदिती होती. हिनें व हिचा पति काश्यपऋषि ह्या दोघांनी भगवान् विष्णूनें आपलें पुत्रत्व स्वीकारावे म्हणून तीव्र तप आचरिलें व त्यांच्या तपाने प्रसन्न होऊन भगवंतानें तीन वेळां ह्यांच्या पोटी अवतार धारण केला. कृतयुगांत वामनावतारी ह्यांच्याच पोटी देव अवतरले. तसेंच त्रेतायुगांत काश्यप व त्याची स्त्री अदिती ही अनुक्रमें दशरथ व कौसल्या झाली व प्रभु रामचंद्ररूपाने त्यांच्या उदरास आले. द्वापारयुगांत म्ह० कृष्णावतारांत भगवान् तिसऱ्या खेपेस यांच्यापासून जन्मले व अशा प्रकारे ह्या ऋषिदंपत्याच्या तपाचे सार्थक झाले. यमकः-प्रथम चरणांत 'दे बकी' असे शब्द येऊन द्वितीय चरणांत 'देवकी' शब्द योजून पं. तांनी प्रास साधिला, यांत त्यांच्यावर वर्णव्यत्ययाचा दोष मुळीच येत नाही. कारण कार 'ल'कार; 'ड'कार, 'ल'कार; 'श'कार, 'घ'कार; 'ब'कार, 'व'कार; या चार जोडीतल्या प्रत्येक दोन वर्णीत साम्य मानण्याची अलंकारविद् जनांची चाल आहे. 'रलयोर्डलयोश्चैव शषयोर्बवयोस्तथा। वदंत्येषां च सावर्ण्यमलंकारविदो जनाः ॥' ३.पशुप (गवळी)+दार (पती, स्त्री)= गवळिणी. तृतीयचरणार्थः-देवा, ज्या अर्थी पूतनेला तुम्ही देवकीची गति दिली त्या अर्थी गोकुळांतील गवळिणी व गाई ह्या तुमच्या माता कशा नव्हत? अर्थात होत्याच होत्या. ४. नाशास. ५. चतुर्थचरणार्थ:-तुम्ही पूतनेस जर माता समजून अक्षयसुखास पोंचविले, तर गाई व गोपी ह्यांचे तुम्ही दुग्धपान केले असल्यामुळे त्यांनाही अविनाश सुखाची प्राप्ति करून दिलीच असेल. मग तुमच्या कृपालुत्वाची ही कृत्ये कोणता कवि गाणार नाहीं? सर्वगातील. ६. कृत्ये, गोष्टी, कथा. कृष्णावताराचा विलक्षणपणाः-प्रभचे