________________
२३५ केकावलि. कृपाचि जननी तुझी; सकल जीव दायाद; या _ तिणेंचि उपदेशिल्या करिति सर्व दाया दया; । असें उमजतां भले न गुरुभाव तो टाकिती; १. प्रास्ताविकः-भगवंताची कृपा हीच खरी माता, इतर जन्म देणाऱ्या माता कृपाजननीने ठेवलेल्या दाया होत अशा अभिप्रायाने कवि म्हणतात. अन्वयार्थः-तुझी (भगवंताची) कृपाचि (दया हीच) जननी (माता); सकल जीव (सर्व मनुष्यादिप्राणी) दायाद (कृपाजननीची लेकरें) [होत]; या (आमच्या प्रसिद्ध जन्म देणाऱ्या माता) तिणेंचि उपदेशिल्या (कृपाजननीने उपदेश केल्या होत्सात्या) सर्व दाया (उपमाता) दया करिति (मुलांवर कृपा करितात, कृपाजननीच्या मुलांवर ह्या उपमाता दया करितात); भले (सुज्ञलोक) असें उमजतां (कृपा हीच खरी जननी, इतर माता केवळ दाया असें समजत असतां) गुरुभाव न टाकिती (दाया आमच्या आया नव्हत असें मानित नाहीत तर त्यांच्या ठिकाणी मातृभावच ठेवितात); तुजहि (देवा! कृष्णावतारी तुझांला देखील) गोपिका (गवळीण,अर्थसंदर्भाने यशोदा)मता (मान्य झाली,उपमाता असून तिच्या ठिकाणी तुझी खरा मातृभाव ठेविला) मग जनांस (लोकांना) किती तोटा (काय नुकसान होणार)?२. मुले. 'दायादौ सुतबांधवौ' इत्यमरः. 'दायाद शब्दाचे (१) पुत्र, (२) नातलग असे दोन अर्थ होतात. ३.ह्या प्रसिद्ध माता. ४. कृपाजननीने. ५. उपदेश केलेल्या सांगितल्या संवरलेल्या. प्रथमार्धाचा अर्थः-भगवत्कृपा हीच वास्तविक माता, आम्हांस जन्म देणाऱ्या माता ह्या कृपाजननीने आमचा संभाळ करण्याकरितां ठेवलेल्या दाया (उपमाता) होत. ह्या उपमाता जी आमच्यावर दया करितात ती आपण होऊन करीत नसून कृपाजननीने सांगितल्यामुळे त्या तसें करितात. उपमाता मुलांची जी काळजी घेतात ती खऱ्या प्रेमास्तव नसून पैशाकरितां असते तद्वत् आमच्या ह्या उपमातांना आमची काळजी असण्याचे कारण कृपाजननीने त्यांच्याकडे ते काम सोपविलें आहे म्हणूनच, कृपाजननीच्या लोभास्तवच आमच्या उपमाता आमच्यावर लोभ करितात. ६. उपमाता, मुलें सांभाळण्याकरितां ज्या बाया ठेवितात त्या. 'दाई' हा शब्द हिंदुस्थानी व फारशी अशा दोन्ही भाषांतून आढळतो. हा शब्द पंतांच्या काव्यांत पुष्कळ ठिकाणी योजिला आहे. 'स्नेहें शिशुला देइल मातेहुनि अन्य काय सुख दायी' (शांतिपर्व) 'मजपरिस तूं कराया दायींहुनि मायबाप जेवि हित (शांतिपर्व). 'धे' स्तनपान देणे त्यापासून 'धात्री' (स्तनपान देणारी) हा शब्द निघून त्यापासून दायीं? शब्द निघाला. (व्युत्पत्ति० पृ० ४१). ७. समजत असतां. ८. सुज्ञ पुरुष, जाणते, कृतज्ञ लोक. ९. माता ही समजूत, आईपणा, दायांना आया समजणे हा त्यांच्या संबंधी मातृभाव. तृतीयचरणार्थः-ज्ञाते पुरुष भगवत्कृपा श्रेष्ठ आहे म्हणून आपल्या मातांविषयी आपला पुत्रधर्म टाकित नाहीत; उलट ते उपमातांनाच आ माता मानून त्यांचा आदर करितात.