________________
२३४ मोरोपंतकृत जशी जगदधक्षयीं कर भवन्नंदी नावरी. ॥ ९६ रंक रागानें.' (ब्रह्मो. २२-३२) देवदया मातापित्यांच्या दयेपेक्षां पुष्कळपटीने श्रेष्ट आहे:-(१) 'मायबापें संभाळिती । लोभाकारणे पाळिती. ॥ १ ॥ तैसा नव्हे देवराव । याचा कृपाळु स्वभाव ॥ २ ॥ मनासारिखें न होतां । बाळकासी मारी माता ॥ ३ ॥ तुका म्हणे सांगू किती । बाप लेंकासी मारिती ॥४॥ (२) तूं माउलीहून मायाळ, चंद्राहूनि शीतळ । पाणियाहून पातळ, कल्लोळ प्रेमाचा. ॥१॥ देऊ काशाची उपमा, दुजी तुज पुरुषोत्तमा ! । ओंवाळूनि नामा, तुझ्या वरूनी टाकीलों ॥ २ ॥ तुवां केलें रे अमृता, गोड त्याही तूं परता। पांचां तत्वांचा जनिता, सकळ सत्तानायक ॥३॥ काही न बोलोनी आतां, उगाच चरणी ठेवितों माथा । तुका म्हणे पंढरीनाथा ! क्षमा करी अपराधः ॥ ४ ॥ (३) 'या प्रभुसि दया जैसी येत पित्याला तसी न मातेला' (अश्व. ४०३६). ईश्वराची दया मातेच्या दयेपेक्षाही श्रेष्ठ आहे अशाविषयी ख्रिस्ती शास्त्रांतील पुढील वचन संस्मरणीय व समानार्थक समजून ते येथे दिले आहे.(4) 'Can a woman forget her sucking child, that she should not have compassion on the son of her womb ? yea, they may forget, yet will I (Lord) not forget thee'. ( Isaiah 49. 15 ). मूल आपल्या आईशी फार मोकळेपणाने व लडिवाळपणे वागते व तिच्यावर त्याचे प्रेम अतिशय असते ह्मणूनच ईश्वराला मातेची उपमा देतात. 'येग येग विठाबाई । माझे पंढरीचे आई' हे तुकोबाचे वचन सुप्रसिद्ध आहे. १. जगत् (जग)+अघ (पाप)+क्षयीं (नाश करण्याविषयीं)-जगांतील पाप नाहींसें करण्याविषयीं. २. आपली नदी; अर्थात् आपल्या पायापासून निघालेली गंगा, भागीरथी. चतुर्थचरणार्थः-ज्याप्रमाणे गंगेत स्नान करणाऱ्या अथवा गंगास्मरण कर- .. णाऱ्या जगांतील लोकांचे पाप नाहीसे करण्याविषयी गंगा आपला हात कधीं आवरून धरित नाही, तर जे लोक तिच्या उदकांत स्नान करितात, तिचें प्राशन करितात किंवा तिचे नुसते स्मरण करितात त्या सर्वांचे पाप ती नाहींसें करिते; (तद्वत् भगवंताची कृपा सुष्टाप्रमाणे दुष्टावरही प्रसाद करण्यास मागे घेत नाही). गंगेचे माहात्म्य पुराणांत फार वर्णन केले आहे. पुढील वचनच पहा:-'गंगा गंगेति यो ब्रूयात् योजनानां शतैरपि। मुच्यते सर्वपापेभ्यो विष्णुलोकं स गच्छति' ॥. चतुर्थचरणासंबंधी विशेष खुलासा:भगवंताची दया पाप्यांचा उद्धार करण्याविषयी हात आटोपित नाही ह्याला चतुर्थ चरणांत कवीने दृष्टांत दिला आहे. ज्याप्रमाणे 'त्रिलोकीसती'ला 'अतुलमौक्तिकावलि'प्रमाणे शोभा देणारी व आपल्या पायापासून निघालेली नदी भागीरथी सर्व जगाचे पातक नाहीसे करण्याच्या कामांत आपले हात आटोपित नाही, तद्वत् दहाव्या केकेंत आपल्या पातकाचे गुरुत्व दाखविण्याच्या हेतजरी कवीने 'भगवच्चरणकन्यका आपगा' मला निरखून भ्याली असें ह्मटले आहे तरी या ठिकाणी सर्व जगाचे पातक भंस्म करण्याविषयी सदा तत्पर असणाऱ्या भागीरथीचे योग्य माहात्म्य वर्णिले आहे. “गंगास्तुति, गंगाप्रार्थना 'गंगावकिली,' 'गंगास्तव' आणि 'गंगाविज्ञप्ति' अशी पांच गंगावर्णनपर प्रकरणे पंतांनी रचिली आहेत, त्यांत त्यांनी गंगामहिमा फारच सुरस वर्णिला आहे.