Jump to content

पान:केकावलि.djvu/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( २० ) पंतांच्या संस्कृतभाषाज्ञानाविषयी. व काव्यसामर्थ्याविषयी एवढा भरंवसा होता तेव्हां ते सरस्वतीदत्तवरप्रसाद कविश्रेष्ठ होते असें ह्मणण्यास काय हरकत आहे ? काव्यगुणदोषविवेचन. मोरोपंतांची काव्यरचना बहुतेक स्वतंत्र अशीच आहे. भारत, रामायण, भागवतादि ग्रंथांत फत्त कथानकापुरताच काय तो मूल संस्कृत ग्रंथांतून आधार घेतला आहे. कवितेंतील अलंकार, उज्ज्वल कल्पना, अनुप्रास व यमकें ही खुद्द कवीचीच होत. मोरोपंतांच काव्य ‘सर्व संग्रह' व 'काव्यसंग्रह' या मासिक पुस्तकद्वारा जेव्हां प्रथम बाहेर पडले तेव्हा तो वास्तविक कवि नसून केवळ यमक्या भाषांतरकार होय, त्यांचे काव्य कृत्रिम ह्मणूनच नीरस व क्लिष्ट आहे वगैरे दूषणें बड्या मंडळीकडून त्यांस देण्यांत आली. त्यांचा विचार पृ० १५७-१६० त टीपंत संक्षेपतः केला आहे. या आक्षेपांचें सविस्तर खंडण पाहावयाचे असल्यास तें 'निबंधमाले'त व कै. मल्हार बाळकृष्ण हंस यांच्या 'मोरोपंतावरील निबंधांत' सांपडेल. पंतांच्या कवितेचा मोठा गुण तिची प्रौढता हा होय. लांब समास (परिशिष्ट-ए पहा), संस्कृत शब्दांचा किंवा वाक्यांचा भरणा, तसेच शुद्ध संस्कृत पद्धतीस अनुसरून केलेली वाक्यरचना व प्रयोग (परिशिष्ट-ऐ) इत्यादि गोष्टींमुळे पंतांच्या काव्यांत ओज किंवा प्रौढता फार आली आहे. नुसती भाषाच प्रौढ असते असें नाहीं तर आंतील अर्थही गंभीर व प्रौढ असतो. त्यांच्या काव्यांत अर्थालंकार व शब्दालंकार यांची गर्दी झालेली आढळते. प्रासयमकादि शब्दचमत्कृतीचा कित्ता पंतांनी वामन पंडितापासून घेतलेला असून त्यांत त्यांनी आपली पराकाष्ठा केली आहे (परिशिष्टें-ऋ, हृ, टीप पृ० ६२ पहा.). लांब यमकें, चमत्कारिक अनुप्रास व साहित्यशास्त्रज्ञांनी सांगितलेले बहुतेक सर्व अलंकार पंतांच्या काव्यांत, विशेषतः त्यांच्या भारतांत आढळतात (पुरवणी३ पहा). मधून मधून शब्दावर कोट्या व श्लेष ही आढळतात; पण त्यांची संख्या त्यांच्या काव्याचे प्रमाणाने फारच कमी ('परिशिष्टें-औ अं' पहा). मोरोपंतांची श्लेषावर अभिरुचि असती तर एखादें 'नलोदया' प्रमाणे श्लेषप्रचुर काव्य रचणे त्यांना कठिण नव्हते. त्यांची चित्रविचित्र रामायणादि काव्ये पाहिलीं ह्मणजे महाराष्ट्रभाषा त्यांच्या अगदी अंकित होती असे वाटते. अशा कवीला एखादें श्लिष्ट काव्य रचणे ह्मणजे हाताच्या मळाप्रमाणे सोपे झाले असते. त्यांच्या काव्यांतील पुष्कळ यमके ठरीव, ह्मणजे पुन्हा पुन्हा तीच तीच आलेली असतात, तरी ती दूरान्वित नसून सहज ओघानेच आली आहेत असे वाचकांस वाटतें (परिशिष्ट 'हृ.') शब्द व अर्थ यांच्या अलंकारांची गर्दी झाली आहे तरी त्यामुळे अर्थहानि झालेली फारशी आढळत नाही. कोठेही मूळवर्णनास सोडून अलंकाराच्या ओघात पंत वाहावले नसून त्यांची शब्दरचना व वर्णनाची हातोटी अशी खुबीदार असते की त्यामुळे सहृदय वाचकांची त्यांच्या काव्यांवर मुरकुंडीच पडावी. नवरस जसे काही त्यांच्यापुढे हात जोडून उभे होते असे वाटते. नवरसांखेरीज 'वात्सल्य' व 'भक्ति' हे रस पंतांच्या काव्यांत प्रमुखत्वान आढळतात. कोणत्याही रसाचे वर्णन चालले असतां कवी, त्याच्यांत अगदी तादात्म्य दिसून येते. उत्कृष्ट रसपरिपाकाची उदाहरणे पंतांच्या काव्यांत विपुल आहेत. येथे त्यांचा उगीच थोडासा उल्लेख मात्र करितों. ज्यास संस्कृत 'प्रथमो रसः, 'आद्यरसः' असें ह्मणतात