Jump to content

पान:केकावलि.djvu/236

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. २२९ पिता जरि विटे, विटो; न जननी कुपुत्रीं विटे; यामृतरसाधी न कुलकज्जलें त्या किटे। ॥ ४ ॥ तुका म्हणे भोळा भाविक हा देव । आह्मी त्याचे पाव धरुनी ठेलों ॥ ५ ॥ हा तुकोबाचा अभंग संस्मरणीय आहे. जन्मदात्या पित्यापेक्षां ईश्वराचें पितृत्व जास्त असें यांत सकारण वर्णिलेलें आहे यास्तव येथे व्यतिरेक अलंकाराची स्पष्ट छाया पडलेली आहे. केकासौंदर्यः-या केकेंत बापाला मुलगा कोणता आवडतो याचे कवीने मोठे सरस वर्णन केले आहे. तसेच पुढील केकेंत वर्णिलेलें मातृमाहात्म्यही फार सुंदर वठले आहे. 'आसका बाप निरासकी मा' (आशेचा बाप निराशेची माय) म्हणून जी व्यवहारांत म्हण पडली आहे ती आईबापांच्या प्रेमामधील फरक पाहिला म्हणजे योग्यच आहे असे दिसून येते. १. प्रास्ताविकः-बापाला जरी कुपुत्र आवडला नाही तरी तो मातेला प्रिय असतो म्हणून ईश्वराच्या कृपेला मातेची उपमा देऊन कवि ह्या ९५ व्या केकेंत मातृप्रेममाहात्म्याचे सुंदर वर्णन करतात. अन्वयः-'पिता जरि विटे तरि] विटो; परंतु] जननी कुपुत्रीं न विटे; दयामृतरसाधी त्या कुलकज्जले न किटे; परागुरूचे (पित्याचे) प्रसादपट (प्रसन्नतारूप वस्त्रे) झांकिती परि ते] थिटे (आंखूड) [असतात]; म्हणोनि जन्मदेचे ऋण न फिटे असें भले म्हणती.' व्यु:-पाति=रक्षण करितो म्हणून पिता. 'रक्षणाच्च पिता नृणाम्' (पा-रक्षणे आकारस्य इत्वम् तृच् प्रत्ययान्तो निपातः.) २. विटला, कंटाळला, त्रासला. (केकेच्या) प्रथमचरणाचा अर्थः-कुपुत्र बापाला जरी आवडला नाही तरी न आवडो पण आईला मात्र त्याचा त्रास वाटत नाही. ३. वाईट मुलाचे ठिकाणी. व्यु०:-'पुन्नाम्नो नरकात् यस्मात् त्रायते पितरं सुतः । तस्मात् 'पुत्र' इति प्रोक्तः स्वयमेव स्वयंभुवा ॥.' [मनुस्मृति-अध्याय ९ श्लोक १३८.] पुत्रमाहात्म्यः-जे अपुत्रिक असतात त्यांना स्वर्गलाभ होत नाही अशाविषयी शास्त्रांतून तसेंच कवींच्या काव्यांतून जागोजाग उल्लेख केलेले आढळतात. ऐतरेय ब्राह्मणांत हरिश्चंद्राने नारदास पुत्रोत्पत्तीपासून काय लाभ आहे म्हणून विचारले. त्यावर नारदाने उत्तर दिले की पुत्रमुख पाहिल्याने बाप ऋणमुक्त होतो आणि अमर होतो. पृथ्वी, अग्नि व उदके यांपासून जे उपयोग मिळतात त्यांपेक्षां पुत्रोत्पत्तीपासून अधिक उपभोग मिळतात. पुत्रलाभापासून तमाचा नाश होतो, कारण पुत्र म्हणजे केवळ अत्युच्च आकाशांतील ज्योतीच आहे. पुत्र ही एक अन्नाने भरलेली नौकाच आहे. मुलगा हाच स्वर्ग यास्तव पुत्राची इच्छा करावी. अपुत्रकाला स्वर्ग नाहीं ही गोष्ट पशूही जाणतात. याविषयी पंतांच्या पुढील दोनच गीति पहा:-(१) 'संतति नसतां स्वर्गी पितरांसि बसावया नसे ठाव.' । [आदिपर्व-अ० ४ गी० ५], (२) 'अनपत्यत्व स्वर्गद्वारनिरोधासि हेतु हे व्यक्त.' । [आदिपर्व-अ० १८ गी० ३३]. भावार्थः-आई कुपुत्राचा कधी कंटाळा करीत नाही. कुपुत्र पुष्कळ झाले पण कुमाता कोणी कधी ऐकिली नाही असें संस्कृतांत एक वचन आहे. ४. दयारूपी अमृताने आई म्हणजे ओली झाली आहे बुद्धि जिची; जिचं अंत:करण दयेनें ओले झाले आहे अशी; अर्थात् परमदयालु माता. ५. कुळाचें काजळ (आ २० मो० के०