________________
२३० मोरोपंतकृत विकिपाकासानि अतुट प्रसादपट झांकिती परि पैरा गुरूचे थिटे; ___ म्हणूनि म्हणती भैले 'न ऋण जन्मदेचें फिटे' ॥ विटेल जननीहि की शत रची निमित्ते विधी; ९५ पल्या दुर्गुणाने काजळासारखा कुळास डाग लावणारा पुत्र) त्याने कुलकलंकी पुत्राने. ६. मलिन होते. किटणें अस्वच्छ, मलीन होणे, डाग पडणे. द्वितीयार्धाचा अर्थःपुत्र कुलाला कलंक लावणारा जरी असला तरी परम दयाळु मातेचें अंतःकरण त्याविषयी नेहमी प्रसन्नच राहाते. तिला तो कधी वाईट वाटत नाहीं; उलट ती त्यावर सदोदित दयाच करित असते. १. प्रसन्नतारूपी वस्त्रे. २. पर-श्रेष्ठ, त्या गुरूचे बापाचे. सर्व गुरूंत पिता श्रेष्ठ अशाविषयी कृष्णविजय-उत्तरार्ध अ० ८० गी० ५४ यांतील कृष्णाची उक्ति पहाः'गुरु आद्य पिता, दुसरा विद्याप्रद मत्समान गुरु लोकीं, । शोकी तारक तिसरा तो मीच ज्ञानदानपटु जो की.' ॥ तृतीयचरणार्थः-बाप अपत्यप्रेमामुळे मुलाच्या अपराधांवर किंवा दुर्गुणांवर पांघरूण घालतो खरा पण त्याचे पांघरूण अपुरतें असल्यामुळे ते सर्वांग झांकित नाही. आईचे प्रसाद मात्र मुलाला अघळपघळ असून ते . त्याला कोणाही बाजूने उघडे पडू देत नाहीत. ३. अपुरते, तोकडे; आंखूड, निरुंद. ४. आई अपत्याच्या अपराधाची पूर्णपणे क्षमा करिते यास्तव. ५. विचारशील, थोरपुरुष. चतुर्थचरणार्थः-यास्तवच आईचे उपकार जन्मजन्मांतरीही फिटत नाहीत म्हणून ज्ञाते पुरुष म्हणतात. मातृमहिमाः-बापाचे उपकार एक वेळ फिटतील परंतु आईचे उपकार कधीही फिटणे नाही, म्हणूनच आर्यधर्मग्रंथांतून मातेची योग्यता फार मोठी मानली आहे. याविषयी पुढील वचनें पहा:-(१) 'न मातुः परदैवतम्' । (२) 'सर्ववंद्येन यतिना प्रसूर्वद्या प्रयत्नतः' (३) पितृतोऽपि गुरुर्माता नास्ति मातृसमो गुरुः । पतिता गुरवस्त्याज्या माता नैव कदाचन । गर्भधारणपोषाभ्यां तेन माता गरीयसी' ॥ (४) 'उपाध्यायान् दशाचार्य आचार्याणां शतं पिता । सहस्रं तु पितृन् माता गौरवेणातिरिच्यते.' ॥ (५) [तैत्तिरीयोपनिषदाच्या शिक्षाध्यायांतील ११ व्या अनुवाकांत अध्ययन झाल्यानंतर आचार्य जो आपल्या शिष्यास उपदेश करितात त्यांत प्रथम आईला देवाप्रमाणे मान असे म्हटले आहे हे पुढील संशित उताऱ्यावरून कळून येईल] ‘सत्यं वद । धर्म चर । धर्मान्न प्रमदितव्यम् । कुशलान्न प्रम नयम । भत्यै न प्रमदितव्यम् । देवपितृकार्याभ्यां न प्रमदितव्यम् । मातृदेवो भव । दिवो भव । आचार्यदेवो भव । अतिथिदेवो भव' । इत्यादि. ६. जन्म देणाऱ्या मातोश्रीचे. खुबीदार शब्दयोजना:-येथे 'जन्मदा' हा शब्द कवीने मोठ्या खुबीने योजिला आहे. सापन । मातेचे पुत्रावर विशेष प्रेम नसते, उलट पुष्कळ ठिकाणी पुत्राशी तिचा विरोधच दहीम पर तेव्हां पुत्रावर सापत्नमातेचे उपकार फारसे नसल्यामुळे तिच्या उपकाराबद्दल ऋणी असण्याचे त्याला कारण नाही. ७. ब्रासेल, कंटाळेल. प्रास्ताविकः-यांत मातेपेक्षाही भगवान् दयाळु आहे असें कवि सांगतात. अन्वयार्थः-'जननीहि (मातोश्री देखील)