________________
मोरोपंतकृत प्रपंच, भैर घे शिरी, करि कृपा पिता त्यावरी;। असा जरि नसे, रुचे तरि न तो अभद्र क्षण; तेसा तुजचि आवडे; करिसि तूंचि तंद्रक्षण. ॥ ९४ बापाला साह्य करितो), शिरी (डोक्यावर) भर (प्रपंचाचा भार) घे (घेतो), त्यावरी (एवंगुणविशिष्ट पुत्रावर) पिता (बाप) कृपा करी (लोभ करितो, अशा पुत्रावर बापाची माया असते); जरि असा (वरील गुणांनी युक्त) नसे (नसला) तरि तो अभद्र (गुणहीन, करंटा पुत्र) क्षण (क्षणभर देखील) न रुचे (आवडत नाहीं); तसा (तशा प्रकारचा दळभद्या मुलगा) तुजचि (देवालाच) आवडे (आवडतो), तूंचि (देवा! तुम्हीच) तदक्षण (त्या मूर्खपुत्राचा सांभाळ) करिशि (करितां). ९. (बापाचें) सांगणे. १०. आवरितो, आटोपतो. १. संसार. प्रपंच आवरी:-(बापाचा) सर्व व्यवहार आटोपतो. २. प्रपंचाचा सर्व भार आपले डोक्यावर घेतो. ३. प्रथमार्धाचा अर्थः-विद्वान्, धन मिळविणारा, बापाच्या सांगण्याप्रमाणे चालणारा व सर्व प्रपंचाचा कारभार आपण पाहून बापास विश्रांति देणारा अशा पुत्रावर बाप लोभ करितो, असा गुणवान् पुत्र असला तर मात्र तो बापाला आवडतो. ४. करंटा, द्वाड, गुणहीन. तृतीयचरणाचा अर्थः-परंतु पुत्र अशा प्रकारे गुणवान नसला तर तो करंटा, दळभद्रा म्हणून बापाला क्षणभर देखील आवडत नाही. अशिक्षित, द्रव्य न मिळविणारा, पित्याच्या आज्ञेत न वागणारा व प्रपंचाच्या कामांत मुळीच लक्ष न देणारा अशा पुत्रास बाप अभद्ग म्हणजे करंटा समजतो व तसा पुत्र त्याला क्षणभर देखील नजरेसमोर नको असतो. धृतराष्ट्र दुर्योधनाविषयी बोलतांना म्हणतो:-'शूलाधिक दुःसहतर दुःखहेतु कुनर वित्या' उद्योगपर्व-अ० ९ गी० ९८]. ५. तशा प्रकारचा, म्हणजे निर्गुण पुत्र. चतुर्थचरणाचा अर्थः-वर सांगितलेले गुण ज्याच्यांत नाहीत असा मूर्ख पुत्र बापाला जरी क्षणभर आवडत नाही तरी ईश्वराला आवडतो व तो त्याचा सांभाळ करितो. ६. तत्-त्याचे +रक्षण=पालन. त्या निर्गुण पुत्राचे संरक्षण. भावार्थ:-अमुक पुत्र गुणहीन म्हणून त्याचा त्याग देव करीत नसून गुणी अगुणी अशा सर्वजणांचा देव सांभाळ करितो, तस्मात् तो बापापे. क्षाही दयाळू आहे. 'प्रपंच उत्तम रीतीने चालविण्यास जे गुण जगीं अवश्य पाहिजेत असे गुण असलेल्या पुत्रावर पिता प्रेम करितो; पण निर्बुद्ध, निर्धन, ईश्वराशेचें पदोपदी लंघन करणारा व प्रपंचाकडे ज्याचे लक्ष्य नाही अशा मनुष्यावर देखील परमेश्वर दया करून त्याला परमार्थमार्गास लावितो. ईश्वरप्राप्ति होण्यास नेणतेपणा, निर्धनता, व संसाराचा त्याग ह्या गोष्टी प्रतिकूळ नसून उलट त्या थोड्याबहुत तरी अनुकूळच आहेत असे येथील व्यंग जाणावें. परमेश्वरास नेणते भक्त आवडतात:-'तयासि नेणती बहुत आवडती । होय जया चित्तीं एकभाव ॥१॥ ऊपमन्यु धुरु हे काय जाणती । प्रल्हादाच्या चित्तीं नारायण ॥ २ ॥ कोळी भिल्ल पशु श्वापदें अपारें। कृपेच्या सागर तारियेली ॥ ३ ॥ काय ती गोपाळे चांगली शहाणीं । तया चक्रपाणी जेजी सवें