________________
केकावलि. २२७ समीहित फळे जंगा तव पैदाब्ज दे, देववी; । अशीच करुणा असो हरि! कधी न भंगो पिता; अशा मज असाधुला इतर कोण संगोपिता? ॥ सुविद्य, धन मेळवी, वेचन आयके, आँवरी ९३ ५ ॥ निर्गुणाचा सगुण झाला । तोचि वाप कामा आला ६ ॥ तुका म्हणे अहो बापा! । चुकवी चौऱ्यायशींच्या खेपा ७ ॥ प्रथमचरणार्थः-तुमच्या शिवाय इतर कोणते देव ही सृष्टि उत्पन्न करण्यास समर्थ आहेत? कोणीही नाही हा भावार्थ. म्हणून या जगाचे खरे प्रसविते तुम्हीच आहां. १. वांछित. द्वितीयचरणार्थः-देवाचें चरणकमल प्राणिमात्रांना इष्ट फलें देऊन किंवा इतरांकडून देववून त्यांचे मनोरथ सर्वस्वी पूर्ण करितें. भगवंताच्या कृपेमुळेच भक्तांना ऐहिक व पारमार्थिक सुखाचा लाभ होतो. आतां ही भगवंताची कृपा कधीं प्रत्यक्ष व कधी अप्रत्यक्ष होते. हे 'दे, देववी' यांतील तात्पर्य. २. जगांतील लोकांना. येथे ही उपादानलक्षणा ( Metonymy ) झाली. पृ० १४-१५ पहा. ३. पद (पाय, चरण)+ अब्ज (अप्-जल, ज-झालेलें जलापासून झालेलें, कमल), चरणकमल. ४. विष्णो ! 'हरि' ह्या शब्दाचे पुष्कळ अर्थ होतात. अमरांत 'हरि' शब्दाचे अर्थ पुढीलप्रमाणे दिले आहेत:'यमानिलेंद्रचंद्रार्कविष्णुसिंहांशुवाजिषु । शुकाहिकपिभेकेषु हरिर्ना कपिले त्रिपु' ॥ हरि=१ यम, २ वायु, ३ इंद्र, ४ चंद्र, ५ सूर्य, ६ विष्णु, ७ सिंह, ८ किरण, ९ अश्व, १० पोपट, ११ सर्प, १२ वानर, १३ बेडुक, १४ पिंगट (रंग). तृतीयचरणार्थः-देवा ! तुझी माझ्यावर अशीच कृपा असो. तूं सर्व जगाचा पिता आहेस तेव्हां माझाही आहेसच. हे तुझं आणि माझें पितापुत्राचे नाते कधीही भंग न पावो. तुझें पितृप्रेमबंधन कधी न तुटो, ५. भंग पावो, तुटो. ६. अभक्ताला, पाप्याला. चतुर्थचरणार्थः-देवा ! तुम्ही जर माझा पतित म्हणून त्याग केला तर मग दुसरा कोण माझें पाप्याचे रक्षण करणार? कोणी करणार नाही. तुमच्याकडून जर माझ्या पापांची क्षमा झाली नाही तर ती दुसरे कोठेही होणे नाही. कारण सर्व देवांत दीनदयाळ व पतितपावन अशी तुमचीच कीर्ति आहे. तुम्हींच जर माझे अपराध पोटांत घालून मला क्षमा केली नाही तर दसच्या कोठेही माझें संरक्षण होण्याची मला आशा नाही. खुबीदार शब्दयोजना:-'असाधुला' हा शब्द विशेष खुबीदार आहे. साधुपुत्राचे संरक्षण कोणीही करील, पण हट्टी दुवृत्त पुत्राचे भगवंतावांचून इतर कोणीही बाप करणार नाही. ७. संगोपन करणारा, रक्षणकर्ता. ८. प्रास्ताविकः-पुत्र गुणवान असला तरच तो जन्मदात्या पित्यास आवडतो पण * भगवंतास सर्व सारखेच आवडतात. तेव्हां पित्यापेक्षाही भगवंताची सदयता जास्ती असें कवि या केकेंत वर्णितात. सुविद्य-ज्याने चांगली विद्या संपादन केली आहे. विद्वान. अन्वयार्थः-सुविद्य (उत्कृष्ट विद्वान्), धन मेळवी (संपत्ति मिळवितो). व वायके (वापाच्या म्हणण्याप्रमाणे वागतो), प्रपंच आवरी (प्रपंचाच्या कामांत