Jump to content

पान:केकावलि.djvu/225

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१८ मोरोपंतकृत मनांत सहजा दया, निपट टाकिली काय ? जी !। सँकोप दिसती गुरु क्षणभरीच; जें तापलें जल ज्वलनसंगमें, त्यजि न शैत्य तें आपलें. ॥ ८८ ज्वलनसंगमें तापलें तें आपलें शैत्य न त्यजि. ४. प्रल्हादाचा नातु व विरोचनाचा पुत्र. [केका ७६]. ५. आई. प्रथमार्धाचा अर्थः-देवा ! तुह्मीं देखील वामनावतारी बलिराजास बांधिलें म्हणून आम्हां पतितांचें मातेप्रमाणे कल्याण करणारी अशी जी तुमच्या मनांतील स्वाभाविक दया तिचा तुम्ही अगदीच त्याग केला होता काय? अर्थात् केला नाही. बलिराजास बांधून थोडा वेळ जरी तुह्मी निष्ठुर झालांसां दिसला तरी तुम्ही त्याजवर खरोखर निष्ठुर झाला नव्हता. कारण त्याला वर देऊन त्याचे तुह्मीं कल्याण केलें.. १. साहजिक, स्वाभाविक. खुबीदार शब्दयोजनाः-देवाचा स्वभाव साहजिकच दयाभूत आहे. ही देवाच्या मनांतील साहजिक दया दीन, शरणागत भक्तांची माता होय. हिच्याच जोरावर पतितांचा उद्धार होणार. म्हणून सहजा हे विशेषण खुबीदार आहे. २. निस्तुक, पूर्णपणे, अगदींच. ३. अजी! महाराज! ४. क्रोधयुक्त. प्रास्ताविकः-देवांनी बळीला बांधला ही प्रभूची निष्ठुरता फार वेळ टिकली नाहीं; यावरून कवि अर्थांतरन्यास अलंकाराचा आश्रय करून केकेच्या द्वितीयार्धात एका सामान्य तत्वाकडे वळतात. ५. थोर, वडील लोक. ६. अग्निसमागमानें. द्वितीयार्धाचा अर्थः-थोर लोकांस राग आला तरी तो क्षणभरच टिकतो, फार वेळ राहात नाही. याला दृष्टांत पाण्याचा. पाणी जरी अग्निसांनिध्यामुळे कढत झाले, तरी काही वेळाने जसें तें फिरून थंड होते तद्वत् कारणवशात् थोर लोकांस जरी क्षणभर क्रोध आला तरी ते आपली स्वाभाविक दया टाकीत नाहींत. 'उत्तमस्य क्षणं कोपः' ही ह्मण सर्वप्रसिद्ध आहे. शैत्य (थंडपणा) ही पाण्याची मूळप्रकृति आहे तद्वत् क्षमा किंवा शांतता थोर लोकांचा स्वाभाविक गुण होय. 'सकोप दिसती गुरु क्षणभरीच, जे तापलें जल ज्वलनसंगमें त्यजि न शैत्य तें आपलें' ही पंतोक्ति रघुवंशां'तील पंचम सर्गाच्या ५४ व्या श्लोकार्धाशी जुळतेः-(सचानुनीतः प्रणतेन श्वान्मया महर्षि{दुतामगच्छत् !) 'उष्णत्वमग्न्यातपसंप्रयोगात् शैत्यं हि यत् सा प्रकृतिर्जलस्य.' (तेव्हां पाय धरूनियां सविनये म्यां प्रार्थियेला मुनी, । क्रोधा टाकुनि पावला नृपसुता, स्नहातला मनी) पाण्याला जरि ताप येई, तरि तो अग्न्यातपानेंचि ये, आहे शीतल वस्तुतां प्रकृतिन । जाणती ज्ञानिये'. ॥ ('लेले'कृत भाषांतर.) सारांश, पाणी हे अग्नीच्या आंचेमुळे उष्णत्व पावते पण शैत्य हे त्याची मूळ प्रकृति होय (शीतळपणा हा पाण्याच्या अंगचा गुण आहे). पंतांनी ही केका जेव्हां लिहिली तेव्हां त्यांच्या मनांत वर दिलेली कालिदासोक्ति निःसंशय घोळत असावी. मो- रोपतास कालिदासाच्या काव्याची ओळख होती याविषयी अल्प विवेचनः-मोरोपतास रकिरातादि पंडितमन्य काव्यांची ओळख नव्हती, निदान ती होती असे त्यांच्या कविते१रून तरी दिसून येत नाही अशी मोरोपंतांच्या भक्तांपैकी काहीजणांची समजूत आहे. तिला ह्या ककाधासारख्या पंतांच्या काव्यांतील वचनांनी बाध येतो. सुप्रसिद्ध निबंधमालाकार आपल्या 'मो