पान:केकावलि.djvu/226

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. २१९ रोपंतांची कविता' या निबंधांत लिहितात:-'अगदी अव्वलपासून अखेरपर्यंत कोणत्याही मराठी कवीस रघुकिरातादि पंडितमन्य काव्यांची बिलकुल ओळख होतीशी दिसत नाही. नामदेव, तुकाराम यांची गोष्ट तर बोलायालाच नको, पण पंडितमंडळींत बरेच मोडण्यासारखे जे वामन, मोरोपंत, रामजोशी वगैरे त्यांच्या ग्रंथांतही कालिदासांदिकांचा मागमूसही नजरेस येत नाही. संस्कृत कवितेच्या धर्तीवर जुनें मराठी काव्य म्हटले म्हणजे रघुनाथपंडितांचे 'नलोपाख्यान'च एक होय; त्याची रचना श्रीहर्षाच्या 'नैषधा'च्या नमुन्यावर केली आहे असें कवीनेच सरतेशेवटी सांगितले आहे. पण याखेरीज बाकीच्या कोणत्याही महाराष्ट्रकाव्यांत जुन्या संस्कृत कवींची पद्धति कोणत्याहि संबंधानें बिलकुल दृष्टीस पडत नाही. (निबंधमाला अंक ४७). आजपर्यंत जेवढा म्हणून मोरोपंत कवींच्या ग्रंथांचा भाग आमच्या वाचण्यांत आला तेवढ्यात असे एकही स्थल आम्हांस आठवत नाहीं की ज्यावरून संस्कृतांतील पंचमहाकाव्यांशी किवा नाटकांशी मोरोपंतांचा परिचय होता असें अनुमान करितां येईल. (निबंधमाला अंक ५७). वामन, मोरोपंत वगैरे मंडळीचा संस्कृतकवींपैकी कितीकांशी व कितीसा परिचय होता हे आतां समजणे अगदी अशक्यच आहे; पण एवढे खरे आहे की, त्यांच्या ग्रंथांत पाहूं जातां वरील परिचयाचें फारच थोडे प्रमाण सांपडेल. आणि यावरूनच तो परिचय जरी कांहींकांचा यथाकथंचित् असलाच, तरी तो म्हणण्यासारखा दृढ नव्हता असे म्हणण्यास हरकत दिसत नाही". (निबंधमाला अंक ६२). या शास्त्रीबोवांच्या म्हणण्यावर निबंधमालेत (अंक ६१, ६२). कै० वा० दा० ऑक व के० वा० कानेटकर या दोघांनी चर्चा केली आहे. त्यांत कै० ओक ह्यांनी विठ्ठलकवीच्या सीतास्वयंवरकाव्यांतील कांहीं श्रीहनुमंतनाटककथा कांहीं रघुवंशिंची। कांहीं आदिकविप्रमेयरचना कांहीं गिरा देशिंची' ॥ हे लोकार्ध पुढे करून निदान बीडकर विठ्ठलकवीस तरी 'हनुषान्नाटक' व रघुवंश' या काव्यांची चांगली ओळख होती असे सिद्ध केले. पण मोरोपंत कवीला रघुवंशादि पंडितमन्य काव्यांची कितपत ओळख होती हे त्यांच्या काव्यरचनेवरून सिद्ध करण्याचा यत्न त्यांत व इतरत्र कोणी केलेला नाही. या ठिकाणी तशा प्रकारचा थोडासा यत्न केला आहे तिकडे .. शोधकांचे लक्ष्य लागावें. पंतांनी हनुमंतास उद्देशून 'वाटे स्वमंत्ररामायण निज नाटक तुम्हींच तोलावें' (६६). असें 'नामरसायनां'त म्हटले आहे त्यावरून पंतांचा हनुमन्नाटकाशी चांगला परिचय असावा असे दिसते. पंतांच्या हरिवंशांतील पुढील गीतींतील उपमा त्यांना रघुवंश सर्ग ११ शोक ६० वरून सुचली असावी. रघुवंशांतील श्लोकः-'श्येनपक्षपरिधूसरालकाः सांध्यमेघरुधिरावाससः । अंगना इव रजस्वला दिशो नो बभूवुरवलोकनक्षमाः ॥' हरिवंशांतील गीति:-'जसि रुधिरदिग्धवस्त्रा गतशोभा स्त्री रजस्वला राया !। संकोचे परपुरुषा शंभर सेना तसीच ती बा! मा' ॥ (३८,७७). तसेंच पंतांनी 'जैमिनीकृताश्वमेधस्थित कुशलवचरित वर्णिले आहे'. (नामरसायन १०६). त्यांतील कांहीं पयें रघुवंश सर्ग १४ तील श्लोकांशी अत्यंत सदृश असून त्यांतील दुसऱ्या ब-याच गोष्टी त्यांना चवदाव्या सर्गातील वर्णनावरून सुचल्या असाव्यात असे ती दोन काव्यप्रकरणे ताडून पाहिली असतां कळून येईल. याची थोडीशी उदाहरणे:-(१) अथाभिघे रघुवंशकेतोः प्रारब्धमानंदजलैर्जनन्योः' (लोक ७), 'कौसल्या मलिना कृशा स्वतनयाने तदा हर्षली । आनंदाश्रु, धरूनि राघव शिरीं हुंगूनियां वर्षली । पूर्वीच्यापरि विप्न होइल