Jump to content

पान:केकावलि.djvu/224

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. २१७ न ती प्रबळ गोपिका; तुज तुझी दया बांधिती. ॥ ७ तुम्हींहि बळि बांधिला, म्हणुनि आमुची माय जी करा. यशोदेनें तुह्माला कष्टविले त्यापेक्षा तुम्हीच यशोदेला ज्यास्ती त्रासविलें. (यावर 'मी तिला कसें त्रासविलें' असें भगवान् म्हणतील अशी शंका घेऊन कवि त्यावर उत्तर देतात.) यशोदेने हातांत घेतलेले पहिले दांवेंच जर तुह्मांला बांधावयास बेताने पुरतें तर ती एकास दुसरें, दुसऱ्यास तिसरें, याप्रमाणे अनेक दांवीं जोडून तुह्मास बांधण्याचे परिश्रम कशास घेती ? पहिलेच दांवें तुम्हांला बांधावयास पुरतें ह्मणजे तिला जो त्रास पडला तो पडला नसता तेव्हां हे सर्व परिश्रम तिला तुमच्या लीलेमुळेच पडले. यशोदा दांव्याने कृष्णास उखळास बांधावयास लागली तेव्हां पहिले दांवें पुरेनासे झाले म्हणून तिने त्यास दुसरें जोडिलें. दुसरेही पुरेनासे झाले म्हणून तिसरें जोडिलें. अशा रीतीने पुष्कळ दांवीं तिने एका ठिकाणी केली. ती दांवीं जोडून जोडून थकली तेव्हां कृष्णाला तिची दया आली व त्याने तिला आपणास बांधू दिले. या सुरस प्रसंगाचे चटकदार वर्णन 'कृष्णविजयांत' आहे. [कृष्णविजय-पूर्वार्ध-अ० ९.] कृष्णाला यशोदेने दांव्याने बांधले. ह्मणूनच त्याला दामोदर (दामेन वद्धं उदरं यस्य सः) म्हणतात. 'दामें उदरी बांधी गोपी जगदीश्वरा स्वतनयातें । तेव्हांपासुनि राया ! दामोदर म्हणति सर्व जन यातें ।' [हरिवंश-अ०१३ गी० ४०]. १. समर्थ (बांधावयास). २. गोपवनिता, (अर्थसंदर्भाने) यशोदा. प्रास्ताविकः-'मी तिला पुष्कळ त्रास दिला असेन पण शेवटी तर तिने मला बांधिले तर खरें' असें भगवंताचे झणणे कल्पून त्यावर कवि चतुर्थचरणांत म्हणतात. चतुर्थचरणाधा अर्थःअनंत ब्रह्मांडाचे स्वामी जे तुह्मी त्या तुम्हाला बांधावयास देवा! यशोदा अत्यंत असमर्थ होती. तिने तुम्हांला बांधिलें तें केवळ तुह्मीं दयेस्तव तिला तसे करूं दिले म्हणूनच घडले. दयाघन गोपाळकृष्ण यशोदेच्या प्रेमास्तव वांधला गेला असेच उद्गार ग्रंथांतरी सांपडतात. पुढील उतारे पहा:-देव उद्धवास म्हणतात:-'यद्यपि सुदुर्लभ असें सुप्रेमें सुलभ यापरि सदा मी, । किंबहुना बा! लागे बांधुनि घेणेहि या हरिस दामी. ॥ [मंत्रभागवत-एकादशस्कंध-गी० २८६]. रासक्रीडेच्या प्रसंगी भगवान् गोपीस म्हणतात 'मृदुता न कुसुमदामी, कठिनी जरि, तरि न लेशहि श्रम, दामी । प्रेमें बद्ध सदा मी देव म्हणे; गोपिकांसि दे रस दामी ॥' [कृष्णविजय-अ० २९ गी० ६४]. तसेंच दामबंधनप्रसंगी पंत म्हणतात:-'दा त्या बांधावें, यमपाशेही न यन्नतां बांधावें. । प्रभु निजतन्त्र, परि हरी भक्ताधीन; स्वगौरवासि परिहरी. ॥' [कृष्णविजय-अ० ९ गी० २६]. 'न करी क्षमा तमोमति भर तनुचा न गति जववती तेणें । वात्सल्ये सुत धरं दे, बाढ यशोधाम बंध गणि लेणे." १३ (पूर्णमंत्रभागवत). ३. प्रास्ताविकः-यशोदेने भगवंतास बांधले, तरी तिने दया टाकिली नव्हती, या गोष्टीस स्वतः भगवंताचे उदाहरण दाखवीत होत्साते कवि दृष्टांत देऊन म्हणतात. अन्वयः-[देवा तुह्मींहि बळि बांधिला; ह्मणुनि जी! मनांत सहसा ही जी आमुची माय ती निपट टाकिली काय? गुरु क्षणभरीच सकोप दिसती में जल १९ मो० क०