पान:केकावलि.djvu/222

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. २१५ २१५ क्षमा न करि एकदा, तरिहि फार खोडी करां; न देचि भय, ताडनोद्यमसमेत सोडी करां. ॥ १. एका प्रसंगी. तृतीयचरणार्थ:-जरी कृष्ण नेहमी फार खोड्या करीत असे, तरी यशोदा त्यांची क्षमाच करी. परंतु एका प्रसंगी कृष्णाने मोठीच खोडी केली तेव्हां मात्र कृष्णाच्या अपराधाची क्षमा न करितां ती काठी घेऊन त्याला मारावयास धांवली. कथासंदर्भ:-एकदां नंदवधू यशोदा वेणीफणी करून व अंगावर आपले सर्व दागिने घालून दधिमंथन करीत ज्यांत कृष्णलीला वर्णिली आहे अशी गाणी गात होती. तिचे दधिमंथनाचे काम आटपण्याच्या अगोदर कृष्णाने येऊन रवी धरिली व भूक लागली म्हणून छंद धरिला. हे पाहून यशोदेने कृष्णाला आपल्या मांडीवर प्यावयास घेतले. कृष्णाचे पिणे चालले आहे इतक्यांत डेऱ्यांत दूध तापत ठेविले होते त्यावर साय येऊन तें उतूं जात आहे असे पाहून कृष्णाचे पिणे पुरतें झाले नव्हते तरी त्याला तसाच एकीकडे ठेवून ती दुधाखालचा जाळ कमी करण्यास धांवली. ती आपणास टाकून दुधाकडे धांवली हे पाहून केष्णाला फार राग आला. त्याने घरांत जाऊन सर्व मडकी दगडाने फोडून टाकिली व आपण एकीकडे स्वस्थ लोणी खात वसला व आपल्याभोंवतीं जमलेल्या माकडांनाही ते वाढू लागला. तिकडे यशोदा दूध उतूं जात होतें तें खाली उतरून परत कृष्णास पाजावयास आली. तों कृष्ण जाग्यावर नसून दह्यादुधांची मडकी मात्र फुटलेली तिला दिसली. इतकें जरी झाले तरी तिने त्याबद्दल फारसा मनांत राग धरिला नाही पण पुढे कृष्णाला शोधितांना जेव्हां तिला तो उखळावर बसून लोणी खातांना व तें वानरांना वांटतांना आढळला तेव्हीं तिला फार राग येऊन हातात काठी घेऊन ती त्याला मारावयास धांवली. बराच वेळ कृष्ण सांपडला नाही पण शेवटीं सांपडला. तेव्हां तिने त्याचे हात धरून त्याजवर काठी उगारली. आई आपणास मारणार असे पाहून कृष्णाने आपले तोंड रडवें केलें, व तो कापावयास लागला. हे पाहून यशोदेला त्याची दया आली व तिने हातांतील काठी टाकली व कृष्णाचे हात धरले होते ते सोडून दिले. 'स्तनकाम मोघ होतां, भग्न करुनि मथनपात्र मग भंवते,। वानर मेळवुनि सुरस दे. वाटुनि खाय पातली तंव ते' ॥१२॥ (पूर्णमंत्रभागवत). २. ताडन+उद्यम+समेत मारले उद्योग+सहित मारण्याच्या उद्योगासुद्धां चतुर्थचरणार्थः-जेव्हां कृष्णाने आई आएणास मारणार असे पाहून तोंड गोरेमोरे केले, तेव्हां यशोदेने त्याला भय तर नाहीच दाखविलें, पण त्याचे हात सोडून देऊन त्याला मारण्याकरितां घेतलेली काठीही टाकून दिली. ३. हाताला. 'मारणेही सोडले व त्याबरोबर कृष्णाचे हात धरले किंवा बांधले होते तेही सोडले' हा येथे सहोक्ति अलंकार झाला. याचे लक्षण:-'सहोक्तिः सहभावश्चेद्भासते जनरंजनः । दिगंतमगमत्तस्य कीर्तिः प्रत्यर्थिभिः सह ॥' जेथें चमत्कारजनक सहभाव होतो म्हणजे दोन गोष्टी एकच क्रिया करितात तेथें सहोक्ति हा अलंकार होतो. आर्याः-'साहित्य मनोरंजक जरि भासे तरि सहोक्ति कविविहित । त्याची सत्कीर्ति जवे जाय दिगंतासि रिपुगणासहित' (अ. वि.) त्या राजाची कीर्ति याचकांबरोबर दिगंताला