________________
२१४ मोरोपंतकृत तु स सुन्तीही प्रसिर असर व्य तुझे कथिति गोपिका विविधं तीस बोभाट, ते सुखप्रद गुणस्तवापरिस जाहले वाटते;। सुचवितात. 'रजोमलिनकाय' हे विशेषण साभिप्राय आहे ह्मणून परिकर अलंकार झाला आहे. ८. वस्त्रे. 'अंबर' शब्दाचे दोन अर्थ होतातः-१ आकाश. २. वस्त्र. 'अंबरे व्योम्नि वाससि' इत्यमरः. रामकृष्ण चिखलाने आपली अंगें भरवून मातेची वस्त्रेही मलीन करीत ह्याविषयी 'कृष्णविजय' अध्याय ८ आर्यागीति १४ पहाः -'तनु भरिती जंबाळे, गळां वळे घालिती मिठी जै बाळें । ढाटे पाए। याना, सेवावा आग्रहें जगन्नाथांनी ॥' १. प्रास्ताविकः-'तुह्मी रांगते होतां तेव्हां मात्र यशोदेची प्रीति तुम्हांवर होती असें नाही, तर मोठे चालते बोलते झाला तरी देखील तुम्हांवर तिची प्रीति फार होती, अशा अभिप्रायाने कवि म्हणतात'. (केकादर्श). २. गोकुळांतल्या गवळिणी.३. नानाप्रकारचे. ४. गा-हाणी, कागाळ्या. अन्वयार्थ:-'गोपिका (गवळिणी) तुझे विविध (नानाप्रकारचे) बोभाट (कागाळ्या) तीस (तुझी माता यशोदा तिला) कथिति (सांगत होत्या), ते (बोभाट) गुणस्तवापरिस (तुझ्या गुणांच्या स्तवनापेक्षां) सुखप्रद (सुखदायक, आल्हाददायक) वाटते जाहले (झाले) ती एकदां (एक वेळ) क्षमा न करि तरिहि तुह्मी फार खोडी करां (केली); ती [यशोदा भय (भीति, मारण्याचे भय)न देचि (न देती झाली) एवढेच नव्हे. तर ताडनोद्यमसमेत (मारण्याच्या उद्योगाबरोबर) करा (हाताला) सोडी (सोडिती झाली).' प्रथमार्धाचा अर्थः-कृष्णाच्या लहानपणीं गवळिणी त्याच्या खोड्यांबद्दल यशोदेजवळ अनेक प्रकारची गा-हाणी नित्य घेऊन येत. कृष्ण आमच्या घरी येऊन दह्यादुधांची शिंकी पाडतो, डेरे फोडतो, त्यांतील गोरस खातो व इतरांना वांटतो, वगैरे निरनिराळ्या गोष्टींसंबंधीं गान्हाणीं गोपिका यशोदेकडे घेऊन येत असत. पण ती ऐकून यशोदेला वाईट न वाटतां आनंदच होई. इतरांच्या तोंडून कृष्णाच्या गुणांची प्रशंसा ऐकून तिला जितका आनंद झाला असता त्यापेक्षा अधिक आनंद कृष्णाच्या लहानपणाच्या खोड्या ऐकून यशोदेला होत असे. अत्यंत मायाळू आईला जसे मुलाच्या खोडीपासून वाईट न वाटतां उलट समाधान वाटत व ती मुलाचे कौतुकच करिते त्याप्रमाणे कृष्णाच्या लहानपणच्या खोड्यांबद्दल मा न्हाणी ऐकून यशोदेला होत असे. कृष्ण खोड्या करीत असे त्याबद्दल गा-हाणी ऐकून यशादला कसे वाटत असे याचे वर्णन पंतांनी 'कृष्णविजयांत' फारच सुरस रीतीने केले आहे. 'गोपवधूजन निकड गा-हाणे येति घेऊनी जननिकडे । गा-हाणींहि परिसती, कोप करिना तरी सुता उपरि सती ॥२४॥ [कृष्णविजय-पूर्वाध-अ० ८] तसेच 'मंत्रभागवत' दशमस्कंधांत पंत लिहितात:-'ते बोभाट यशोदाश्रुतिसि सुधासेकसेचि निववीती ॥ १६० ॥' बोभाट हा शब्द पंतांनी बऱ्याच ठिकाणी योजिलेला आढळतो. हरिवंश अ० ३६ गी० ८७ पहा. ५. सुख द ६. गुणप्रशंसपेक्षा.