________________
केकावलि. विचारुनि पहा बरें निजमनी महाराज! हो! । वनोवनि फिरा पिशापरि; म्हणा अहोरात्र 'हा!' . १. राजाधिराज! देवाधिदेवा! २. येथे पहिल्या दोन चरणांतील 'हो' हे यमक एकार्थीच योजिले आहे. असा प्रकार पंतांच्या काव्यांत कचित् आढळतो. केका ५३ पृ. टीप ९ पृ० १४३ पहा. ३. रानोरान. प्रास्ताविकः-सीतेचा शोध करितांना भगवंतांनी सदयता कोणती प्रकट केली ती कवि तृतीय चरणांत सांगतात. ४. व्या०:- येथे ‘फिरा' व 'ह्मणा' ही जुन्या वर्तमानकाळाची रूपें होत. काव्यांत यांचा उपयोग भूतकाळी फार आढळतो. हल्ली मराठीत गद्यांत या मूळच्या वर्तमानकाळच्या रूपांचा उपयोग होत नाही. ५. वेड्यासारखे. रामाचे अरण्यांत पिशाचवत् हिंडणे व शोक करणे यांतील रहस्यः-'श्रीरामचंद्र हे सीतेच्या शोधार्थ अरण्यांत फिरत असतां त्यांचे भक्त जे वृक्षपाषाणरूपें धारण करून बसले होते त्यांना भेट द्यावी ह्या हेतूनें, व जितकी सृष्टिरूपाने पंचभूतात्मक प्रकृति आहे, तीच प्रकृति सीता आहे, व मी त्या भूगोलादिक अनंत गोलरूपी सीतामय सृष्टिरूप प्रकृतीला अंतर्यामित्वेकरून एका आकर्षणशक्तीने आकर्षण करून धरणारा पुरुष व समष्टीरूप ईश्वर आहे, त्या आह्मी उभयतांनी एकरूपी असतां अवतारशरीरें जगत्कार्यार्थ इच्छामात्रेकरून धरिली आहेत, ही भावना प्रकट करण्याकरितां, हे सीते! हे सीते! याप्रमाणे शोकमुद्रा प्रकट करून, वृक्षपाषाणादिकांना आलिंगन देऊ लागले. श्रीराम हे जगदुद्धारार्थ सीताशुद्धीचे निमित्त दाखवून फिरत आहेत, वास्तविकपणे ते पूर्णज्ञानी असून त्यांना कामक्रोधमोहादि विकारांची पीडा नव्हती हे पार्वतीने सीतारूप घेऊन केलेल्या रामाच्या फीक्षेवरून स्पष्ट झाले.' (वेदोक्तधर्मप्रकाश.) तृतीयचरणार्थः-देवा! रामावतारी जेव्हां सीता नाहींशी झाली तेव्हां तिची आपणास करुणा येऊन तिचा शोक करीत आपण वेड्यासारखे रानोरान फिरत होता. हे सदयतेवांचून झाले. काय? ६. रात्रंदिवस. व्या०:-येथे ‘रात्रि' शब्दाचे 'रात्र' असें रूप झाले आहे. ७. हाय ! भारतीय रामायणांत व मंत्ररामायणांत सीतेकरितां रामाने केलेला शोक पंतांनी फार सुरस वर्णिला आहे. मुक्तामालेतील पंतकृत तत्संबंधीं वर्णनही तसेंच हृदयंगम आहे. पुढील संक्षिप्त उतारे पहा:'सा कुत्र पत्रशाले ! मालेवाचैव या मया निहिता । लब्धा मिथिलाजानेर्जाने न्यासापहारिणो त्वाहम ॥५२॥ कासारकुंदकदलीकरिकेसरिकृष्णसारकेकिपिकैः । अलिचंपकबंधूकैः शून्ये बत! सुंदरी विभज्य हृता ॥५४॥ मृग! यामीक्षणविजितः शक्ष्यसि नोदीक्षितुं बत त्रपया। मृगयामि क नु तां वदमित्रमहं ते वनेचरो रामः ॥ ५७ ॥ लीनासि किमेकांते का ते कांते व्यलंघयं वाचम् । विरहज्वरविपदयि ते दयिते दयितेऽतिदुःसहाधीरे ॥ ५८ ॥ कानन! तदासि नंदनमधुना, पितृकाननं सुविस्पष्टम् । अहमपि हरिरभवं तामृते त्विदानीं श्रियं महाभूतः ॥ ६२ ॥ (मुक्तामाला) सारांश-'हे पर्णशाले ! जी (रत्न)मालेप्रमाणे आजच मी तुजपाशी ठेवून गेलों, आणि जी मला जनकापासून प्राप्त झाली ती कोठे आहे ? ती हरण केल्याबद्दल मी तुला न्यासापहारिणी (चोर) समजतों. ५२ सरोवर, कुंदकळ्या, कदलीस्तंभ, हत्ती, सिंह, काळवीट, मोर, कोकिळ, भ्रमर, चांपेकळी.