________________
२०६ मोरोपंतकृत (यो समाजालय स्वासस धरासुरतपःफळें त्वरित धांवली जी वना.॥ तयीं भुवरा! तसे संदय; कां असे ? आज हो! १. धरा (पृथ्वी)+सुर (देव)+तपः (तपश्चर्या)+फळे पृथ्वीवरील देव ब्राह्मण त्यांच्या तपश्चर्येची फळे. ब्राह्मणांस पृथ्वीवरील देव (भूदेव) असें ह्मणतात. २. त्वरेनें. द्वितीयार्थाचा अर्थ:-जी प्रभूची पावले पित्याचे वचन सत्य करण्याकरितां अरण्याकडे धांवली ती पावलं मला आठवली. (पुन्हा कवि म्हणतात:-) मला वाटते ती पावले नाहीं धांवली तर ती धरासुरतपःफळें धांवली. अरण्याकडे जी धांवली ती रामाची पावले नव्हत, तर तेथे तपश्चर्या करणाऱ्या ऋषींच्या तपांची मूर्तिमंत फळेंच धांवली. भावार्थः- ऋषींच्या तपःसामर्थ्यानेच 'साधूंच्या परित्राणार्थ व दुष्कृतांच्या विनाशार्थ' भगवंताचा लवकर अवतार होऊन त्यांचे दंडकारण्यांत लवकर जाणे झाले. येथे भगवंताच्या पायांवर ऋषींच्या तपःफलांचा आरोप केला असून फळेंच धांवली -६ असे म्हटले आहे. वास्तविक फलें धांवण्यास स्वतः असमर्थ आहेत पण त्यांनी पायांचें रूप धारण करून ती धांवली. म्हणून येथे हा परिणाम अलंकार झाला. पृ० ३८ पहा. ३. दंडकारण्याकडे. हे अरण्य गोदावरी व नर्मदा ह्या दोन नद्यांच्या मध्ये असून याचा विस्तार मोठा आहे. इक्ष्वाकुवंशांतील दंडक राजाचे हे राज्य होते व शुक्राच्या शापाने ते पुढे अरण्य बनले. (रामायण-अरण्यकांड-१ अध्याय-१ श्लोक.) 'हरिवंशांत' असे सांगितले आहे की, दंडकराजाने तापसी लोकांना तप करण्यास एकांत स्थान मिळावे म्हणून हे वन केलें. ४. तेव्हां. अन्वयार्थः-प्रभुवरा! (देवश्रेष्ठा! ) तयी (सीतेला रावणाने हरण केले त्या प्रसंगी) तसे (त्या प्रकारचे) सदय (कृपाळु) [झालां]; हो! (अहो!) आज (ह्या प्रसंगी) असे (ह्या प्रकारचे) [निर्दय कां ? (काय म्हणून?); हो! (अहो!) । महाराज (देवा !) निजमनी (आपल्या मनांत) विचारून पहा बरें (विचार, करून तर पहा खरे) [देवा! तेव्हां तुम्ही] पिशापरि (वेड्याप्रमाणे)वनोवनी फिरा [व] अहोरात्र (रात्रंदिवस) 'हा!' (हाय ! हाय! खेदसूचक शब्द) म्हणा (म्हणत हाता) हा (मोरोपंत) भाषणी (बोलण्यांत, प्रभुस्तवन करण्यांत) कुशल (चतुर) नसे (नाही) परि कृपापात्र (भगवत्प्रसादास योग्य) असा (आहे). प्रास्ताविकःरावणाने सीता हरण केली तेव्हां सीतेला शोधण्याकरितां तुम्ही आपल्या पावलांस श्रम दिले. यावरून सीतेविषयीं तुम्हांला दया आली असे दिसते; मग मजविषयींच आपणांस ती कां येत नाही अशा अभिप्रायाने कवि यांत रामावतारकथा वर्णन करितात. ५. प्रभुश्रेष्ठा! सर्व देवांत वरिष्ठ अशा! ६. दयायुक्त, कृपाळू. प्रथमार्धाचा : अर्थः-सीता पर्णकुटींतून नाहींशी झाली तेव्हां देवा तुम्हांस तिची फार दया आली व तिची काय अवस्था झाली असेल हा विचार मनात येऊन तुम्हांस फार वाईट वाटले. मग सांप्रत माझ्यावर आपली अवकृपा कां? सीतेप्रमाणे मजविषयीही सदय व्हा. राजाधिराज! याचा आपण स्वतःच विचार करा. ७. सांप्रत.