________________
केकावलि. २०५ शरभंग, सुतीक्ष्ण, अगस्त्य इत्यादिक ऋषींस भेटून पंचवटीत येऊन राहिले. वनवासांत लक्ष्मणाने आपल्या ज्येष्ठवंधूची व त्याच्या स्त्रीची सेवा अत्यंत एकनिष्ठपणाने केली. तो त्यांना खाण्याकरितां रोज कंदमूळफळे अरण्यांतून आणून देई व रात्री ते निजले म्हणजे थोडा वेळ आपण विश्रांति घेई (केका ८४ पहा). पंचवटींत राहत असतांनाच रामाच्या सांगण्यावरून लक्ष्मणाने शूर्पणखेची विटंबना केली व रामानें खरादि राक्षसांचा संहार केला. रावणास रामाविषयीं समग्र वर्तमान शूर्पणखेकडून कळले. तेव्हां त्याने मारीच राक्षसास सुवर्णमृगाचे रूप धरून सीता बसली होती तेथे जाण्यास सांगितले. सीतेच्या दृष्टीस तो सुवर्णमृग पडतांच त्याला मारून त्याच्या चर्माची कंचुकी करून ती आपण अंगांत घालावी अशी तिला इच्छा झाली व तिने रामाला सुवर्णमृग मारून आणण्यास आर्जवाने व आग्रहपूर्वक सांगितले. प्रिय स्त्रीची हौस पुरविण्याकरिता राम लक्ष्मणास सीतेच्या संरक्षणाकरितां ठेवून मृगाच्या पाठीमागे गेले. (केका ८३ पहा). रामाने मृगाचा पाठलाग करून शेवटी त्याला बाणाने मारिलें. त्या मायावी मृगाने मरतांना आपले मूळस्वरूप प्रकट करून 'हा तात!' असे रामाच्या शब्दाप्रमाणे शब्द काढले. सीतेला ते शब्द रामाचे वाटून तिने लक्ष्मणास आपल्या पतीच्या साह्यार्थ जाण्यास सांगितले. 'हे शब्द मायावी राक्षसाचे आहेत, रामचंद्राला त्रैलोक्यांत कोणापासून भीति नाहीं, तूं स्वस्थ अस' असे लक्ष्मणाने सीतेला सांगितले. पण त्याने तिच्या मनाची खात्री न होतां उलटं ती त्याला 'तुला माझा अभिलाष उत्पन्न झाला आहे म्हणूनच रामचंद्र संकटांत पडले असता त्यांच्या साह्यार्थ तूं जात नाहीस असे दिसतें' अशा प्रकारचे हृदयक्षोभ करणारे शब्द बोलली. त्यामुळे लक्ष्मणाचें मन फार खिन्न झाले व तो सीतेला पर्णकुटींत एकटी सोडून आपण राम गेला होता तिकडे चालता झाला. (केका ८४ पहा). मागे रावणाने भिक्षुरूपाने येऊन सीतेचे हरण केले. मायावी मृगास मारून राम परत आले तेव्हां पंचवटीतील आश्रमांत सीता दिसली नाही ह्मणून ते लक्ष्मणासह तिच्या शोधार्थ निघाले. मार्गात त्यांना मरणोन्मुख स्थितीत असलेला दशरथमित्र जटायुपक्षी भेटला. त्याजपासून रावणाने सीतेचे हरण केलें हें वर्तमान ऐकून राम सीतावियोगास्तव रात्रंदिवस शोक करित करित व सीताभ्रमाने वेड्याप्रमाणे वृक्षपाषाणांस आलिंगन देत देत (केका ८१ पहा) क्रौंचारण्याच्या बाजूने मातंग ऋषीच्या आश्रमांत गेले. तेथे मातंगमुनीची शिष्या शवरी हिने उष्टी व वाळकी बोरे देऊन रामाचें आतिथ्य केलें (केला ३९ पृ० १०९ टीप ५ पहा). नंतर राम पंपासरोवरावरून ऋष्यमूक पर्वताकडे गेले. तेथे त्यांनी वानरराज सग्रीवासी रून वाळीचा वध केला. पुढे सुग्रीवाने सीतेचा शोध करण्याकरितां वानर पाठविले, त्यांत दक्षिण दिशेकडे गेलेल्या मारुतीस मोठ्या प्रयासाने लंकेंत सीतेचा शोध लागला (केका ८२ पहा). नंतर सुमुहूर्तावर राम लंकेस जाण्यास निघून समुद्रतीरी येऊन पोहोचला. याच वेळेस बिभीषण रावणाचा त्याग करून रामास शरण आला. रामाने त्यास अभय देऊन रावणवधानंतर लंकाराज्य देण्याचे त्यास अभिवचन दिले (केका ६६ पहा). नंतर रामाने नलवानरहस्ते समुद्रावर सेत बांधवून सुवेलपर्वताजवळ सैन्य नेले. पुढे अंगदाला रावणाकडे सामार्थ पाठविले पण साम होईना. तेव्हां अखेर रामरावणांचे घनघोर युद्ध झाले व त्यांत रावणाचा पराजय झाला. तेव्हां बिभीषणाला लंकेच्या गादीवर बसवून रामचंद्र परत अयोध्येस आले ३. सीतापते ! रामचंद्रा ! जानकीच्या प्राणवल्लभा ! १८ मो० के०