Jump to content

पान:केकावलि.djvu/208

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. २०१ नको छळ; अधीर मी; तैशि न कीर्ति हो; चामरें नृपासि उचितें; qथा, मिरविली जरी पामरें। अकीर्तिच असो, रुचे तुज कशी ब्रेजी कांबळी? असें न समजा कसे ? वरिल हाँरिला का बळी ॥ ७८ १. प्रास्ताविकः- बळीसारखा छळ करून मग माझ्यावर कृपा करावी असें जर तुमच्या मनांत येत असेल तर देवा! तसा छळ सोसण्याचे माझे आंगीं सामर्थ्य नाही व त्या छळापासून मिळणारी कीर्तिही मला नको. बळीराजा परम समर्थ होता म्हणूनच वामनावतारी त्याने तुमचा असा भयंकर छळ सोसला आणि तशी सुकीर्तिही मिळविली. मी केवळ असमर्थ आहे म्हणून माझी तरी परीक्षा घेऊ नका व त्यापासून मिळणारी कीर्तिही मला देऊ नका. ज्याची कीर्ति त्यालाच शोभते. बळीची योग्यता मला पामराला कोठली? अशा आशयाने कवि परमेश्वराला प्रार्थितात. २. सहनशील नाहीं असा. बळीसारखें धैर्य माझ्यांत नाही. ३. अलौकिक. छळाशिवाय अलौकिक कीर्ति कशी मिळेल असे म्हणाल तर देवा! तशी माझी कीर्ति व्हावयास नको. ४. होवो. ५. चवन्या. चमरी नांवाच्या मृगांच्या केसाच्या ह्या चवऱ्या करितात म्हणून त्यांस चामरे म्हणतात. नृपांसि उचितें चवन्या ह्या राजांलाच शोभतात. ६. व्यर्थ. ७. फिरवून घेतली, वारून घेतली. ८. गरीबानें, दरिद्रयाने. दरियाने जरि आपल्या मस्तकावरून चवऱ्या वारून घेतल्या तरि त्या त्याला भूषणास्पद न होतां उलट दूषणास्पद होतात, तद्वत् बळीची कीर्ति बळीलाच योग्य, मला योग्य होणार नाही. ९. अपकीर्तिच. बळीची योग्यता मी नको म्हटली म्हणून जरी माझी अपकीर्ति झाली तरी होवो. मी अपकीर्तिच पतकरतो. १०. गोकुळांत. तुला गोकुळांत कांबळी कशी आवडली? पीतांबर नेसून शालजोडी पांघरण्याची तुमची योग्यता असतां केवळ आपले संवगडी गोपाळ यांच्या सारखाच आपलाही वेष असावा अशा हेतूने तुम्ही गोकुळांत घोंगडी पांघरावयास घेतली. असें करण्यांत जशी तुह्मीं मानापमानाची चाड धरिली नाही त्याप्रमाणे मीही अपकीर्तीची पर्वा करित नाही. घोंगडी पांघरण्याने वास्तविक जशी तुमची योग्यता कमी झाली नाही, त्याप्रमाणे बळीची कीर्ति मला नको म्हटले म्हणून माझी अपकीर्ति होत नाही. ११. घोंगडी. सरस उपमाः-येथे अपकीर्तीला जी कांबळीची उपमा दिली आहे ती मूल्यहीनतेस्तव व कृष्णत्वास्तव फार सरस आहे. हास्य व कीर्ति यांचा रंग पांढरा, आकाश व पाप यांचा रंग काळा, प्रेम व क्रोध यांचा रंग तांबडा जसे रंगांविषयी कवींचे संकेत आहेत. १२. ही गोष्ट तुमच्या ध्यानांत कशी येत नाहीं? १३. पराजयास, अपजयाला. १४. पराक्रमी पुरुष पराजयाला कां पतकरील? पतकरणार नाहीत. कोणीही मनुष्य अंगांत शक्ति असन पड खाणार नाही. अशक्त, बलहीन मनुष्यच हार घेतील. मी बलहीन आहे म्हणूनच हार घेतो. सुकीर्ति सोडून अपकीर्तीची इच्छा कां करितोस असें देवा!