पान:केकावलि.djvu/209

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०२ मोरोपंतकृत छळाल कृपणासी कां ? अजि! दयानिधे ! कांपिती भेटासि भट संगरी, परि न कांतरा दापिती; । कराल तितुकी कृपा बहु; अहो ! शरण्या! तमी आपण म्हणाल तर त्यांत माझा काही दोष नाही. मी समर्थ असून अपजय पतकरित नाही, तर बलहीन म्हणूनच पतकरितों. बळीची योग्यता माझ्या अंगांत नाहीं म्हणून केवळ निरुपायास्तव मी अपकीर्ति स्वीकारितों. 'चामरें...पामरें' ही सामान्योक्ति दृष्टांतरूपाने यांत सांगितली आहे. ह्यांत अर्थांतरन्यास आणि दृष्टांत असे दोन अलंकार झाले. सुभापितः-'चामरें नृपासि उचितें; वृथा मिरविली जरी पामरें' हे उत्तम सुभाषित होय. १. प्रास्ताविकः-छळ सोसण्यास मी असमर्थ आहे त्या पक्षी तुम्ही माझा छळ. करणार नाही अशा अभिप्रायाने कवि म्हणतात. अन्वयः-'अजि! दयानिधे! [तुह्मी] कृपणासि कां छळाल? संगरी भट भटासि कापिती परि कातरा न दापिती; [छळा वांचून कराल तितकी कृपा बहु; अहो शरण्या! मी शरणागत अरण्यांत तमी बुडोनि श्रमतसें.' २. दीनाला, गरीबाला. ३. अहो! ४. दयासागरा! अहो दयासागरा देवा! तुम्ही मला दीनाला कशाला छळाल? छळणार नाही हेच खरें. ५. योद्ध्यास. ६. युद्धांत. शूर पुरुष लढाईत आपल्या बरोबरीच्या शूरास मारितात. ते भित्र्यांना दटावित देखील नाहींत मग मारण्याची गोष्ट लांबच. 'बळीही समर्थ व त्याच्या निष्ठेची परीक्षा पाहाणारे तुम्हीही समर्थ. तेव्हां त्याचा जो छळ तुम्हीं केला तो त्यासच योग्य, मजसारखा दीन तशा छळास पात्र नाही, असा मागल्या चार केकांवर कटाक्ष ठेवून कांपिती भटासि...दापिती ही येथे कवीची दृष्टांतोक्ति जाणावी.' [य० पां०-पृ० २७९.] ७. भ्याडांस, भित्र्यांना. प्रत्येक वीराने आपल्या बरोबरीच्या वीराशी लढावें असा धर्मयुद्धाचा एक नियम आहे. ८. ज्याला शरण जातात तो शरण्य; हे रक्षणस्थाना! मजवर तुम्ही कितीही थोडी कृपा केली तरी ती मला फारच होय. ९. अधकारांत. 'मज दीनावर छळावांचून जितकी कृपा कराल तितकी मला पुष्कळ हाइल' असें कवीने म्हटले, ते आपले दैन्य कवि येथें वर्णितात. 'छळ न करितां कराल अजा जी तीच मज दया मोठी । अपमान श्रम नसतां जें जोडे स्वल्प तेंचि धन कोटी. ॥ ४७ सला अपहर गंगा-हद शिखिकुंडी शिरेल कोण कवी ? | आरोग्य शर्करा दे तरि कटकीची न घे रसज्ञ चवी.' ४८ ॥ (दत्तदयोदय). देवा! हा मी तुमचा शरणागत या संसाररूपी अरण्यांत आणखी अज्ञानरूप अंधकारांत बुडून श्रम पावत आहे. मी वाट चुकून ह्या संसाररूप निर्जन वनांत आलो. तशांत येथे अज्ञानरूप अंधकार तर खूपच पडला आहे म्हणून मला मोक्षरूपी मार्ग दिसत नाहीं, व अंधारांत चालतांना मध्ये कामक्रोधादि खांच खळगे लागतात त्यांत मी पडतों. मला स्वतःच्या साह्याने ह्या गाढ धकार पडलेल्या रानांतून बाहेर निघतां येत नाही. म्हणून मी आपणास शरण आलो आहे. मला • मला आपण भक्तिज्ञानाचा सुप्रकाश दाखवून ह्या संसारारण्यांतून बाहेर काढा.