पान:केकावलि.djvu/204

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. १९५ परि त्वरित भेटवी तुजहि, योगमायाधवा ! ॥ ७४ तुम्हांसमचि हे गुणे; अणु उणे नसे नाम; हा कायाधवापरि-प्रल्हादाप्रमाणे. कथासंदर्भ:-हिरण्यकशिपूस कयाधूपासून चार पुत्र झाले. त्या सर्वांत ज्येष्ठ प्रल्हाद. ह्याची माता कयाधू ही जंभासुराची कन्या. हा जन्मतःच भगवन्निष्ठ परमभागवत होता. भगवन्नामग्रहणास्तव पित्याने याचा फार छल केला. शेवटी विष्णूला ह्याच्या कैवारास्तव स्तंभांतून प्रकट होऊन ह्याच्या पित्याचा वध करावा लागला. मोरोपंतांनी विष्णुपुराणांतील कथेच्या आधारावर 'प्र-हादविजय' नावाचे एक सुरस आख्यान रचिलें आहे. १. द्वितीयार्धाचा अर्थः- भगवन्नाम आश्रितांचे दुःख व पातक तर नाहींसें करितंच. फार कशाला, तें प्रल्हादाप्रमाणे ईश्वराची गांठ देखील लवकर घालून देते. भगवन्नामस्मरणानें कयाधूपुत्र प्रल्हादास जसे देवाचे सत्वर दर्शन झालें तद्वत् इतरांसही तें होतें. २. योगमाया (प्रकृति)+धवा (पतीला). योगमायेचा पति ईश्वर त्याला, योगमाया जी मूलप्रकृति तिचा स्वामी त्याला. योगमायाः-'चिदानंदमयब्रह्मप्रतिबिंबसमन्विता । तमोरजःसत्वगुणा प्रकृतिर्द्विविधा च सा ॥ १५ ॥ सत्वशुद्ध्यविशुद्धिभ्यां मायाऽविद्ये च ते मते । मायाबिंबो वशीकृत्य तां स्यात्सर्वज्ञ ईश्वरः ॥१६॥ अविद्यावशगस्त्वन्यस्तद्वैचित्र्यादनेकधा । सा कारणशरीरं स्यात् प्राज्ञस्तत्राभिमानवान् ॥ १७ ॥ (तत्वविवेक.) मायां तु प्रकृतिं विद्यान्मायिनं तु महेश्वरं । अस्यावयवभूतैस्तु व्याप्तं सर्वमिदं जगत् ॥ २३ ॥ मायाधीनश्चिदाभासः श्रुतो मायी महेश्वरः। अंतर्यामी च सर्वज्ञो जगद्योनिः स एवहि ।। ५७ ॥ (चित्रदीप) (पंचदशी.) 'जीमध्ये सच्चिदानंद ब्रह्माचे प्रतिबिंब आहे व जीमध्ये सत्व, रज व तम हे तिन्ही गुण सारख्या मानाने आहेत तिला प्रकृति असें ह्मणतात. तिचे दोन प्रकार आहेत. जीमध्ये शुद्ध सत्वगुण अधिक असून तो इतर दोन गुणांनी गढूळ झालेला नसतो तिला माया म्हणतात, जीमध्ये तो गुण इतर दोन गुणांनी गढूळ झालेला असतो, तिला अविद्या म्हणतात. मायेमध्ये प्रतिबिंबित जो चैतन्य आत्मा त्याने मायेस स्वाधीन ठेविलें आहे. तोच सर्वज्ञ व सर्वशक्तिमान् ईश्वर होय. माया हीच प्रकृति म्हणजे जगाचे उपादान कारण होय. आणि ही मायोपाधि ज्यानें धारण केली तोच परमेश्वर जगाचे निमित्त कारण होय. आणि याच्याच अंशरूपाने सर्व जग व्यापून गेले आहे. माया ज्याचे स्वाधीन आहे त्यालाच श्रुतीमध्ये मायी, अंतर्यामी, महेश्वर, सर्वज्ञ व जगद्योनि अशी नांवें दिली आहेत. अविद्येमध्ये प्रतिबिंबित जो चिदात्मा तोच जीव. तो परतंत्र आहे. या जीवास स्थूल, सूक्ष्म आणि कारण ही तीन शरीरें आहेत. वर सांगितलेली अविद्या हीच याचे कारण शरीर आहे आणि त्याच्या अभिमानी जीवास प्राज्ञ म्हणतात. ३. प्रास्ताविकः-यांत कवि नामाचा महिमा परमेश्वराच्या महिम्यापेक्षाही जास्त असें वर्णितात. हे (नाम) गुणे (गुणाने) तुम्हांसमचि (तुझ्या बरोबरीचें, तुझ्या योग्यतेचें) [आहे], परमेश्वराची व नामाची योग्यता सारखीच होय. 'म्हणतां तुम्हीच हरिचे हरिहूनि उणे वदों नका यश तें' (वामनचरित्र २००) ४. कोणत्याही पदार्थाचा अतिसूक्ष्म भाग. 'नाम (भगवन्नाम) अणु (लेशमात्रही, किमपिही) उणे (कमी) नसे (नाहीं) भगवंतापेक्षां नामाची योग्यता रतिभर देखील कमी नाही.