________________
मोरोपंतकृत दिसे अधिकही, तसा गुण तुला असेना महा; । सदैव भलत्यासही सुलभ; आणखी गायका छळी न, न अधोगति क्षणहि दे जगन्नायका!॥ ७५ १. किंबहुना हा गुण अधिकही दिसे, तसा महा (गुण) तुला असेना=नामार्च ठिकाणी हा एक गुण (ज्याचे वर्णन उत्तरार्धात केले आहे तो) अधिक दिसतो तेवढा मोठा गुण तुझ्यात नाही. २. सदोदित. ३. पाहिजे त्याला देखील, अनधिकाऱ्याला सुद्धां. ४. सुखें करून प्राप्त. भगवन्नामस्मरण करण्यास वर्णगुरु ब्राह्मणापासून वर्णाधम चांडालापर्यंत सर्वांस सारखाच अधिकार आहे. हा ब्राह्मण, हा शूद्र, हा भेद नामाच्या ठिकाणी नाहीं. भगवंताचें नांव पाहिजे त्या जातीच्या मनुष्याने पाहिजे तेव्हां घ्यावे. त्याला आडकाठी नाही. तसा ईश्वर सदैव भलत्यास सुलभ नाहीं. भगवन्नाम व ईश्वरप्राप्सीची इतर साधनें:-ईश्वरप्राप्तीची योग, याग, दान, स्वाध्याय, यज्ञ, संन्यास, व्रत, तप इत्यादि पुष्कळ साधने आहेत. ती फार दुष्कर असून सर्व जातींच्या लोकांना त्यांचे अवलंबन करण्याचा अधिकार नाही. पण भगवन्नामाचे तसें नाहीं. ते पाहिजे त्या जातींच्या मनुष्याने घेतले तरी तो पापविमुक्त होतो. तसेंच यज्ञयागादि क्रिया फक्त ठरीव वेळेस मात्र करितां येतात तसा प्रकार नामाचा नाही. ते पाहिजे तेव्हां, पाहिजे त्या मिषाने घेतले तरी 'सकल पातक भस्म करीतसे.' म्हणून वर कवीने नामाची योग्यता ईश्वरापेक्षाही कांकणभर जास्त अशी वर्णिली आहे. योगयागतपश्चर्यादि साधनांपेक्षां ईश्वर भक्तीनें लवकर प्रसन्न होतो. योगसाधनाने ईश्वरप्राप्ति करून घेणाऱ्या पाठीमागे पुष्कळ विघ्ने लागतात. त्यांचे वर्णन मंत्रभागवत' एकादशस्कंधांत एके ठिकाणी केले आहे ते असें:-वश करुनि इंद्रियें मन लावी जो श्वास जिणुनि मद्ध्यानीं । त्याचे काय करावें सावध असतां स्मरादि वध्यांनी ? ॥ ३५७ ॥ तेव्हां विघ्न कराया अणिमामहिमादि सिद्धि ज्या आठ । अन्याहि पंचदश वा योग्याची पुरवितात त्या पाठ. ॥ ३५८ ॥ वाहविति सिद्धि करिती माझ्या प्राप्तींत अंतरायातें । प्रथमचि विदित असावे त्यांचे अहितत्व संतरायातें ॥२५९ ॥' ५. जो तुझें नाम गातो त्यास. भगवन्नामाचे कीर्तन करणाऱ्यास. ६. दुःख देते. हे नाम] आणखी (शिवाय) गायका (नामसंकीर्तन करणाऱ्या मनुष्यास, ईश्वराचें भजन करणाऱ्यास) छळी न (छळीत नाहीं, दुःख देत नाहीं.) येथे 'छळ' शब्दावर श्लेष आहे. नामपक्षीं, छळणे म्हणजे दुःख देणे, ईश्वरपक्षीं, छळणे म्हणजे कापट करणे. ईश्वर आपल्या भक्तांचा आपल्यावरील दृढ विश्वास पहाण्याकरितां छल करितो. वामनावतारी भक्तराजबळीशी देवानें कपट करून त्यास काही काळपर्यंत पाताळांत घातलें, या गोष्टीकडे या ककृत कवीचे लक्ष्य आहे. ७. दुर्गति; पक्षी, पाताळगति. हाही शब्द श्लिष्ट नामपक्षा, अधोगति म्हणजे दुर्गति, व वामनपक्षी, पाताळवास. पंतांनी इतरत्रही ह्या शोपजना केलेली आढळते. 'मुक्तीहुनी शतगुणे बळिराज्याची अधोगतिहि सुगतिवामन ९) नाम आपल्या भजकांस दुःख देत नाही एवढेच नव्हे तर ती ईश्वर आपल्या भजकांस छळून (कपटाने फसवून) त्यांर देतें. उलट पक्षीं ईश्वर आपल्या भजकार अधोगति