पान:केकावलि.djvu/203

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोरोपंतकृत दुरत्यय असा महा खेळहि त्यास भी हा कळी; । हरि व्यसन पाप हे; बहु कशास? कायाधवापरी (प्रहादाप्रमाणे) तुजहि (तुला देखील) (त्वरित लवकर) भेटवी (भेट करून देते). प्रथमचरणार्थः-मन जरी अत्यंत दुर्निवार आहे तरी भगवंताचें नाम त्याला युक्तीन स्ववश करितें. भगवन्नाम घेणाऱ्या मनुष्याच्या मनाचे आकलन हळुहळू होत जाऊन काही काळाने त्याला परमेश्वराचें एकाग्रतेने चिंतन करितां येते. भागवत एकादशस्कंधांत कृष्ण उद्धवास मनोनिग्रह कसा करावा तो सांगतात:-'वश मन होय विवरितां विश्वाच्या उद्भवासि आणि लया । तत्वंपदार्थशोधन की मद्भजनचि वशासि आणिल या ॥ ४२३ ॥' [मंत्रभागवत-एकादशस्कंध]. १. दुर्जय, ज्याचा नाश होणे कठीण, अत्यंत प्रबळ. २. अतिशय दुष्ट. ३. कलिकाळ, कलियुगांत लोकांस पापप्रवर्तक करणारी देवता. (पृ० ५६ टीप १ पहा.) कळी जरी अत्यंत दुष्ट व दुर्जय असा आहे तरी भगवंताच्या नामास तो भितो. भगवन्नामापुढें कलीचें कांहीं सुद्धा चालत नाही. केवढेही उग्र पिशाच असले तरी ते नरहरिमंत्र म्हटला असतां थरथर कांपते व पछाडलेल्या मनुष्यास सोडून दूर पळते, त्याचप्रमाणे कळी भगवन्नाम घेणाऱ्याच्या वाऱ्यास सुद्धा उभा राहत नाही इतका तो त्यास भितो. ४. दुःख (कलिकृत). नामप्रभावानें कलीने घडविलेले पातक व दुःख नाहीसे होते. पण तें नामस्मरण अंतःकरणापोसून असेल तरच कार्य करते. याविषयी पुढील एका आंग्लकवीचे अवतरण वाचनीय आहे:. I often say my prayers; but do I ever pray? And do the wishes of my heart go with the words I say? I may as well kneel down and worship gods of stone; As offer to the living God a prayer of words alone. For words without the heart the Lord will never hear Nor will He to those lips attend whose prayers are not sincere. __(JOHN Barton.) कृष्ण उद्धवास म्हणतात:-'वा! रे ! वारे नामें अघ अभ्रचि, नाम शुद्ध वारें च । मन्नामकीर्तन सुतरि पापाचा उतरि उद्धवा ! रेच ॥ ४२५ ॥' मंत्रभागवत-एकादशस्कंध]. महाराष्ट्र कविवर्य साधु तुकाराम म्हणतात:-'तुटे भवरोग । संचित क्रियमाण भोग ॥ १ ॥ ऐसें विठोबाचें नाम । उच्चारितां खंडे जन्म ॥ २ ॥ वसों न सके पाप । पळे त्रिविध तो ताप ॥ ३ ॥ तुका म्हणे माया । हाय दासा लागे पायां ॥४॥' भागवताच्या षष्ठ स्कंधांत भगवन्नाममहिमा सविस्तर वर्णिला आहे. त्याचा छोटासा मासला पंतांच्या 'मंत्रभागवतां'तून पुढे दिला आहे:-'भगवन्नामाचार सकळेहि अघे सवासने जळती । मळती न नामधारक, पळती यमदूत, विघ्न ही टळती. ॥३॥ गणपतिस विघ्न तैसें भगवन्नामासि दोष कांपति, तें। माहात्म्य ऐकिल्यावरि गणिजेल यमोग्र शष का पतितें ? ॥४॥, मंत्रभागवत-स्कंध ६ गी० ३-४]. वामन पंडितांनी ह्या प्रकरणाच्या नामसुधा' रचिली आहे. ५. फार कशाला?. कयाधूचा पुत्र तो कायाधव.