________________
केकावलि. भला जगविला तुम्ही भवमहाहिचा मोहरा. ॥ ६८ भैजे सुदृढनिश्चयें द्विजकुमारक क्षीरधी, भस्मासुर राक्षस मुळीच नाही. परंतु जे कपट करितात, विश्वासघात करितात, प्रजेला पीडा देतात, ज्याने आपल्याला नामरूप दिले त्या ईश्वराचे वेदप्रतिपाद्यधर्मकथितनियम मोडतात, व ज्यांना भूतदया नाही असे लोकच भस्मासुर. ते लोक ज्या मनुष्यदेहाच्या योगाने आत्मज्ञान होऊन तरावे, त्याच मनुष्यदेहीं पतन पावतात. जसा भस्मासुर राक्षसाला चांगल्या कामाकरितां मिळालेला वर त्याने वाईट कामाकडे खर्च केल्यामुळे त्याच वरानें तो नाश पावला, त्याचप्रमाणे बहुत सुकृतांच्या योगाने तरणोपायार्थ मिळालेला मनुष्यदेह जे भस्मासुराने केलेल्या दुष्ट कृत्यांसारख्या दुष्ट कृत्यांत खर्च करितात, ते अज्ञानरूप मायेनें व्याप्त होऊन त्याच अमोल मनुष्यदेहाच्या योगाने आपल्या जीवात्म्याला पुनः पुनः डुकरें, कुत्री व बकरी वगैरे जीवांच्या योनीत घालून जन्ममरणाचे फेरे खावयास लावतात.' ( वेदोक्तधर्मप्रकाश-विष्णुवावा ब्रह्मचारीकृत). पंतांनी भागवतांतील कथेच्या आधाराने एक स्वतंत्र भस्मासुराख्यान' रचिलें आहे. त्याचे ४२ श्लोक आहेत. २. कृतोपकार विसरून आपल्या हितकर्त्यास अपकार करणारा. ३. महादेवाला. तृतीयचरणार्थः-देवा! वृकासुराला वर दिला असतां, तो आपलाच घात करण्यास कदाचित् प्रवृत्त होईल हे महादेवाला कसे समजले नाही? ही गोष्ट सर्व त्रिभुवनाचे मनोरथ जाणणाऱ्या महादेवाला कळली नाहीं हे मोठेच आश्चर्य! १. भव+महा+अहिचा=संसार+मोठा+सर्पाचा संसाररूपी मोठ्या सर्पाचा; प्रपंचावर कवीने येथे सर्पाची कल्पना करून महादेवाला सर्पविषहारक मणि असे मानले आहे. चतुर्थचरणार्थ:-तो वृकासुर महादेवालाच जाळून भस्म करणार होता पण तुम्ही मोठ्या युक्तीने शंकराचे प्राण वाचविले. महादेवावरचे प्राणसंकट टाळिलें हा तुम्ही जगावर मोठाच उपकार केला; कारण महादेवाच्या कृपेमुळे पुष्कळ लोक संसारसर्पाच्या उग्र विषापासून मुक्त होऊन कैवल्यपदास पोंचले. २. विषहारक मणि. ज्याने हलाहलासारखें अत्युग्र विष पचविलें तो मोहरा खराच. व्या०:-येथे ‘भवमहाहिचा' ह्याची 'कर्मणि पष्ठी' समजावी. माझ्या योग्यतेप्रमाणे मला वर देऊन मला कृतार्थ करा असा कवीचा आशय आहे. तृतीय चरणांत हात आणि चतुर्थ चरणांत रूपक अलंकार झाला आहे. ३. अन्वयः- [देवा!] क्षीरधी द्विजकुमारक सुदृढ निश्चयें [तुम्हाला] भजे, [हे ] मदनमारक! तुम्हीच तया करी श्रीरधी द्या; जे सुपात्रा सदा सुखवि तें उदारपण बरें [होय]; पन्नगा अमृत दिले तशि खळी कृपा त्रासदा [होते. प्रास्ताविकः-यांत विष्णु आणि शिव एकरूप अशी भावना करून शिवाचें औदार्य तेच विष्णूचें होय व महादेवाचे औदार्यही सत्पात्री होत असे, अशा अभिप्रायाने कवि म्हणतात. ४. सु (अत्यंत) दृढ (अढळ) निश्चय (निश्चयाने)-मनाच्या खऱ्या निर्धारानें. ५. ब्राह्मणपुत्र, व्याघ्रपाद नांवाच्या मुनीचा पुन उपमन्य. 'दंतविप्रांडजा द्विजाः' इत्यमरः. 'द्विज'शब्दाचे (१) दांत (२) ब्राह्मण (३) पक्षी १६ मो० के०