Jump to content

पान:केकावलि.djvu/191

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८२ मोरोपंतकृत तया करि तुम्हीच द्या मंदनमारक ! क्षीरधी;। असे तीन अर्थ होतात. व्यु:-'कुमार'शब्दाला क्षुद्रार्थी क प्रत्यय लागून कुमारक= लहान मुलगा, अथवा गरीब मुलगा अशा अर्थाने हा शब्द झाला आहे. कथासंदर्भ:उपमन्यु हा वसिष्ठकुलोत्पन्न व्याघ्रपाद नामक ऋषीचा ज्येष्ठपुत्र होय. हा लहानपणी एकदा दुसऱ्या एका समवयस्क ऋषिपुत्राबरोबर खेळत खेळत त्याच्या घरी गेला. तेथे त्या मुलाच्या मातेने आपल्या पुत्राबरोबर यालाही क्षीरपान करविलें. घरी आल्यावर हा आपल्या माते. जवळ गोरस मागू लागला. तेव्हां तिनें गरीबीस्तव नित्यनेमाप्रमाणे पीठ पाण्यांत काल• वून त्याला दिले. पण ते न घेतां अमक्याच्या आश्रमांत मी दूध प्यालों तसे दूध मला दे असें तो म्हणूं लागला. हे पुत्राचे भाषण ऐकून माता फार खिन्न झाली व 'तसें गोरसपान करण्याचे तुझ्या नशीबी नाही, कारण तुझें तसें पूर्वसुकृत नाही' असें म्हणाली. तेवढ्यावरून याने वनांत जाऊन शंकराची आराधना केली. याची उत्कट भक्ति पाहून शंकर इंद्ररूपाने वर देण्यास याजवळ आले व याला वर मागण्यास सांगितले. त्यावर 'शंकराशिवाय इतर देवतांपासून वर मागण्याची माझी इच्छा नाहीं, शंकरांनी मला लहान वर दिला तरि तो इंद्रा! मला तुझ्या मोठ्या वराच्या शतपट योग्यतेचा वाटतो. ह्मणून मला शंकराच्याच दर्शनाची इच्छा आहे, तूं स्वस्थानाप्रत जा.' असें याने इंद्ररूपधारी शंकराला झटले. असा याचा 'सुदृढ निश्चय' पाहून शंकर प्रसन्न झाले व त्यांनी याला कल्पपर्यंत आयुष्य तसेंच समग्र क्षीरसागराचें आधिपत्य हे वर दिले. याची कथा महाभारतांतर्गत अनुशासननामक पर्वत आहे. ज्ञानेश्वरीत एका ठिकाणी ज्ञानोबाराय लिहितात:-'मागां दूध दे मणितलियासाठीं । आघविया क्षीसब्धिची करूनि वाटी । उपमन्यूपुढे धूर्जटी । ठेविली जैसी' ॥ (ज्ञानेश्वरी १०-१७.) ६. क्षीर (दुधाच्या ठिकाणीं) धीः (बुद्धि) यस्य (ज्याची) सः (तो) क्षीरधीः= दुग्धप्राप्तीविषयी ज्याला इच्छा झाली आहे असा. १. त्याच्या हातांत, त्याच्या स्वाधीन. २. मदनांतका! शंकरा! कथासंदर्भ:एकदां हिमाचलावर शिव ध्यान करीत बसले असून नगकन्या पार्वती त्याची सेवा करीत असतां तेथे शंकरपार्वतींचे ऐक्य करावे ह्या हेतूने इंद्रादि देवांच्या आज्ञेवरून वसंतासह काम आला व त्याने आपले पुष्पबाण शंकरपार्वतींवर मारण्याचे सुरू केले. मदनबाणांच्या अनिवार माऱ्यामुळे पार्वती कामातुर होऊन शंकराला बिलगू लागली व प्रत्यक्ष शंकराच्या मनाचीही चलबिचल व्हावयास लागली. असें एकाएकी होण्याचे कारण काय हे पहाण्याकरितां शंकराने आपले डोळे उघडले. तों वसंतासह काम त्याच्या दृष्टीस पडला. तेव्हां आपल्या तपास थानेच विघ्न केलें असें जाणून शंकराने आपला भालप्रदेशस्थ तृतीयनेत्र उघडून त्याचे भस्म केले. शिव व मदनदाह-गूढ रूपक-शिवाविषयी पुष्कळ रूपके आहेत. त्यांत ज्ञानी पुरुष हाच शिव किंवा शंकर असें पुराणांतून कांहीं स्थळी वर्णिलें आहे. अन्यस्थळी आत्म्याला, किंवा परमात्म्यालाही शिव म्हटले आहे. जीव अथवा अंतरात्मा याच्यांत अनेक वासना ना असतात. तो आपल्या स्वरूपस्थितीकडे लक्ष्य देत नाही म्हणून त्या वासना अशान राहतें त्या अज्ञानांत बीजांत अनुद्भत वृक्ष तशा राहातात व