Jump to content

पान:केकावलि.djvu/189

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८० मोरोपंतकृत असा वृक कृतघ्न हे न कळले कसे हो! हैरा? पण त्यांत रुद्राचे वर्णन आहे. ऋग्वेदांतील कांहीं सूक्तांची ( उदाहरणार्थ सूक्त ४३, ११४) देवता रुद्र आहे व सूक्त ११४ मंत्र ७ ( मा नो महान्तमुत ) यांत रुद्राने मारूं नये अशी प्रार्थना केली आहे. त्यावरून रुद्र अथवा शिव हा विश्वसंहता होय, ह्या पौराणिक वर्णनांतील बीज अत्यंत प्राचीन अशा ऋग्वेदाच्या मंत्रांत आहे हे दिसून येईल. ब्रह्माविष्णूप्रमाणे शिवाचे ( शिव मंगल, अर्थात् मंगलस्वरूपी परमेश्वर ) सर्व पौराणिक वर्णनही अध्यात्मपर आहे. ४. वर घावयास लागल्याबरोबर. वररूपी मद्याने असा अर्थ काही जण करितात. तोही चिंतनीय आहे. तसा अर्थ स्वीकारल्यास वरासवें हा शब्द श्लिष्ट मानावा. प्रथमार्धाचा अर्थः-देवा! तुह्मी भक्तांवर फार लवकर प्रसन्न होता. त्याप्रमाणे मजवर प्रसन्न होऊन मला कदाचित् शिवाप्रमाणे भलताच न झेंपेल असा वर द्यावयास लागाल. शिव भक्तांवर प्रसन्न होऊन त्यांना वर द्यावयास लागले म्हणजे ते किती देऊ काय देऊ असें त्यांस होऊन त्यांचे मन वेडे होऊन जाते त्याप्रमाणे देवा! आपले मन वरामुळे बावरे होऊ देऊ नका. शिवाप्रमाणे विष्णुहि भक्तांवर लवकर प्रसन्न होतो असे सांगून कवीने शिवविष्णूंमधील अभेदाचें दृढीकरण केलें. शिव आशुतोष आहे म्हणजे भक्तांवर सत्वर प्रसन्न होतो तसाच तो क्रुद्धहि लवकर होतो. याविषयीं भागवतांतील पुढील वचन पहा:-शापप्रसादयोरीशा ब्रह्मविष्णुशिवादयः । सद्य: शापप्रसादोङ्गः शिवो ब्रह्मा न चाच्युतः ॥ १२ ॥ योऽल्पाभ्यां गुणदोषाभ्यामाशु तुष्यति कुप्यति ॥ १५ ॥ ( भागवत, दशम अ० ८८ श्लो० १२, १५) ५. वराने. १. वृकासुर, ह्याचेच पुढे भस्मासुर असें नांव पडले. कथासंदर्भः- वृकासुर हा . शकुनी असुराचा पुत्र. त्रिमूर्तीत शिव शीघ्र प्रसन्न होतो असें नारदाचे वचन ऐकून ह्याने शिवाची आराधना करणे आरंभिलें. ह्याच्या सेवेने शिव प्रसन्न होऊन त्यांनी ह्याला ‘ज्याच्या मस्तकावर तूं हात ठेवशील त्याचे भस्म होईल' असा वर दिला. त्या योगाने त्याने स्वर्गमृत्युपाताळांत फार धुमाकुळ माजविला. पुढे एकदां पार्वतीचे सुंदर रूप पाहून त्याला तिचा अभिलाष उत्पन्न झाला व शिवाला मारून आपण तिचे हरण करावे म्हणून हा शिवावरच उलटून त्याच्या मस्तकीं हात ठेवण्यास धांवला. ह्या संकटप्रसंगी शिवाने विष्णूचे स्मरण केले. त्या वेळी विष्णूनें 'मोहिनी'रूप धरून व भस्मासुरास आपल्या मोहक भाषणाने संतुष्ट करून नृत्य करावयास लागले. मोहिनीरूपदर्शनाने व तिच्या स्मितहास्ययुक्त कटाक्षप्रेरणानें भस्मासुर वेडावून जाऊन तिच्या बरोबर तोही नाचूं गाऊ लागला. ती जसे हावभाव करी तसे तोही करी. असें होतां होतां मोहिनीने आपल्या मस्तकावर हात ठेवलेला पाहून खानेही आपल्या डोक्यावर हात ठेविला व त्याचे भस्म झाले. भागवत दशम अ० ८८ यांतील कथा किंचित् भिन्न आहे. त्यांत विष्णूने बटुरूप धारण करून वृकासुरास मोह पाडला व सापाथ स्वमस्तकावर हस्तक ठेववून त्याचे भस्म करविलें असें सांगितले आहे. भस्मासुरकथच तात्पर्यः-'भस्मासुर राक्षसाची उत्पत्ति, स्थिति व लय सर्व भस्मरूप आहेत. म्हणजे