Jump to content

पान:केकावलि.djvu/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कर्माबाई, कबीर, मानपुरी गोसावी, शेख फकीर, नरहरि सोनार, कान्हपात्रा वेश्या, चोखा महार, रोहिदास चांभार, शेख महंमद, सजणा कसाई, लतीबा, इत्यादि भिन्नभिन्न जातींच्या भगवद्भक्त स्त्रीपुरुषांना त्यांनी अत्यंत प्रेमपुरःसर नमस्कार केला आहे. सन्मणिमालेत एके ठिकाणी (८७ गीति) ते लिहितातः–'हृदया ! स्मर त्यासि. असो श्रीभगवद्भक्तजाति भलती बा!'. जवळपास कोठे संत आले असें वर्तमान त्यांना कळले तर ते दर्शनास गेल्याशिवाय राहत नसत. एवढेच नव्हे तर संतदर्शनार्थ ते दूरचा प्रवास करण्यास देखील मागे पुढे पहात नसत. 'सन्मणिमाला' काव्यांत अनेक महाभगवद्भक्तांचा उल्लेख करून तें काव्य संपल्यावर कन्हाडा नजीक नरसिंहपुर येथे श्रीसिद्धेश्वर भटजी बोवा नामक प्रसिद्ध फटावकर्ते अमृतराय यांचे शिष्य मोठे प्रासादिक भगवद्भक्त योगी राहतात असें पंतांस कळ्ल्यावरून ते इ. स. १६७४ त ह्मणजे ४५ व्या वर्षी बारामतीहून श्रीचे दर्शनार्थ मुद्दाम नरसिंहपुरास गेले व तेथे जाऊन त्यांनी 'महाराज ! मी अल्पमतीने सन्मणिमाला ह्मणोन कांहीं आर्या केल्या, त्यांत आपले नांव घालण्याचे राहिले. त्यांस त्या मालेमध्ये आपले नांव व्यक्तरूपाने असावे अशी बुद्धीस प्रेरणा श्रींनी करावी' ह्मणून वोवांस आग्रहपूर्वक प्रार्थना केली. त्यावर 'बरें आहे' ह्मणून आज्ञा झाली असता त्यांनी पुढील गीति रचिली:-- नमिले श्रीसिद्धेश्वर भटजी वावाचिया सुपद-कमला; । या सन्मणिमालेला सांपडले हे बरें सुपदक मला. ॥ पंतांनी आपल्या उत्तरवयांत पुष्कळ यात्रा केल्या हे त्या त्या ठिकाणच्या देवतांच्या स्तुतिपर ज्या त्यांनी कविता केल्या त्यांतील उल्लेखांवरून समजतें. पंत आपल्या वयाचे साठवे वर्षी शके १७११ सौम्य संवत्सरी यजमानपुत्र पांडुरंगराय यांनी पाठविल्यावरून वडील भाऊ सोनोपंत, आपली स्त्री रमावाई, आईपेक्षा अधिक प्रेम करणारी आत्या, व इतर नातलग घेऊन धनाजी जाधवाचे नातु अमरसिंह जाधव यांजवरोबर काशीयात्रेस गेले. पंतांस यात्रेस जाण्यास प्रथम त्यांच्या पत्नीनेच आग्रहपूर्वक सुचविले असून बंधु आबा व भावजय सगुणाबाई यांनी त्यांना अनुमोदन देऊन यात्रेचे सर्व साहित्य करून दिले, ह्या गोष्टी विष्णुपदवकिलीवरून कळतात. पंतांनी 'गंगावकिलीं'त सवाई माधवराव पेशवे, नाना फडनवीस, हारपत फडके, रास्ते, अहल्यावाई होळकरीण या सर्वांचा उल्लेख केला आहे त्यावरून इ. स. १७८८-८९ ह्या वर्षी वर निर्दिष्ट केलेली मंडळी जिवंत होती असे दिसते. यांनी प्रथम, गयेस जाऊन पिंडप्रदान केले. नंतर ते काशीस गेले. पंत काशीस चातुर्मास राहिले. तेथे असतांना रोज सकाळी स्नानानंतर भगवद्गीतेचे पद्यात्मक भाषांतर रचून तें ब्राह्मणाला दान केल्याशिवाय ते भोजन करित नसत अशी त्यांच्याविषयी एक गोष्ट सांगतात. काशीस असतांना पतांनी आपली कविता काशिकर पंडितांस दाखविली. ती त्यांना फार पसंत पडली. याच महायात्रत पंतांनी अनेक पवित्र क्षेत्रांचे व तीर्थांचे दर्शन घेऊन त्यांवर स्तोत्रे रचिली. .. काशातल्या तर सर्व देवतांचे त्यांनी पृथक् वर्णन केले आहे. गंगा, गोदावरी, कृष्णा, इत्यादि दशावरील तीर्थातच पंतांनी स्नान केलें असें नाही. तर कोंकणांतील राजापुरच्या गंगेचही त्यांना 'सत्संगत्तीने एकवेळ अलभ्य मज्जन घडले.' 'पंत भूमीवरची मोक्षपुरी