पान:केकावलि.djvu/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पंढरी' सही पुष्कळ वेळां गेले होते. त्यांनी पांडुरंगाची संस्कृत प्राकृत अशा दोन्ही त-हेचीं स्तोत्रं रचिलीं आहेत. पंढरीसच बाबापाध्ये यांची मुलगी पंतांचे चिरंजीव रामकृष्णपंत यांस दिली. हा शरीरसंबंध जुळल्यामुळे पंतांचें तेथे बरेच वेळां जाणे झाले व पंतांच्या मृत्यूनंतर त्यांचे चिरंजीव सासऱ्याच्या आग्रहामुळे कायमचे पंढरीसच राहिले. काशीयात्रेहून परत येतांना पंतांनी 'देवी अहिल्याबाई'ची भेट घेतली व तिच्या थोरपणाबद्दल आपला आदर प्रकट करावा ह्मणून त्यांनी 'अहिल्यास्तुति' नामक एक लहानसें प्रकरण रचिले. या उदार स्त्रीने पंतांशी सालिना ५०० रुपये घेऊन आपल्याजवळ राहावें ह्मणून फार आग्रह केला, परंतु पंतांचे आपल्या यजमानांवर फार प्रेम होतें ह्मणून त्यांनी ती गोष्ट मोठ्या दुःखाने नाकारली. पंतांची सर्व देवांविषयीं समवृद्धि होती तरी ते रामोपासक होते. आपल्या उपास्य देवतेप्रीत्यर्थ त्यांनी आपल्या उत्तर वयांत १०८ रामायणे रचिली. त्यांत त्यांनी आपली चित्रकाव्याभिरुचि प्रकट केली आहे. (परिशिष्ट-'अ' पहा) यापैकी सुमारे ७४ रामायणें आजवर छापून प्रसिद्ध झाली आहेत. ८ पंतांची काव्यरचना व काव्यगुणदोषविवेचन. 'सरसा सालंकारा सुपदन्यासा सुवर्णमयमूर्ती । आर्या तथैव भार्या न लभ्यते पुण्यहीनेन.' ॥ प्रेम, प्रतिभा, शिक्षारीति पहा; आयका बरें कवन; । पवनप्रियपुत्रा ! बा ! म्यां हें केलें न निजगुणस्तवन. ॥ (नामरसायन.) संस्कृतप्राकृत कवींची काव्ये वाचून व पुराणकीर्तन श्रवण करून पंतांना काव्यरचनास्फूर्ति झाली. हे एकदां पंढरपुरास गेले असतांना रेवडीकर बोवांचे कीर्तन आपल्यास ऐकावयास सांपडावे ह्मणून गर्दीत पुढे घुसले. तेव्हां लोकांस जरा एकीकडे होण्याविषयी विनंति करावयाच्या इच्छेवरून त्यांस तेथल्या तेथेच आर्या करावयाची स्फूर्ति होऊन त्यांनी पुढील आर्या रचिलीः ___ नित्य तुह्मी प्रभुपाशी पेढे वरफी नवा खवा खावा,। तरि म्यां एके दिवशीं रेवडिचा स्वाद कां न चाखावा ? ॥ हीच त्यांची पहिली आर्या. तेव्हांपासून ह्यांच्या काव्यरचनेस आरंभ होऊन बारामतीस आल्यावर वीस एकवीस वर्षांच्या आंत ह्मणजे आपल्या वयाच्या पंचेचाळिसाव्या वर्षापूर्वी त्यांनी भारत, बहद्दशम, प्र-हादविजय, चषक, आर्याकेका, कुशलवचरित, संशयरत्नावलि, रामनामार्या, मुक्तामाला, नामरसायन, ब्रह्मोत्तरखंड, मंत्ररामायण, सन्मणिमाला, वगैरे काव्ये रचिली. ब्रह्मोत्तरखंड रचिले तेव्हां पंत नवीनच कविता करावयास लागले होते असे दिसते. (ब्रह्मो० २२. ८०) तसेंच गंगाप्रार्थनादि कांही कविता पंतांनी काव्यरचना करावयास लाग ल्यानंतर थोड्याच दिवसांनी काशीरामेश्वराच्या पंडितांकडे अभिप्रायार्थ पाठविल्या. ('ज्या उपजतांचि गेल्या काशीरामेश्वरा नमायाला.') तसेंच शके १६९५ माघ शुक्ल ८ मीचे सुमारास (२०जानेवारी १७७४) पंत नाशकास गेले होते. तेथे श्रीमती गोपिकाबाई पेशवे (नानासाहेब पेशव्यांची पत्नी) ह्या त्या वेळेस तेथे होत्या. त्यांच्या सांगण्यावरून त्यांनी 'भीष्मभक्तिभाग्य'