पान:केकावलि.djvu/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अभिमानाने मटल्यावरून काशिनाथ वावांच्या सांगण्यावरून पंत व विठ्ठल या उभयतांच्या आर्या रात्री देवाजवळ ठेविल्या. प्रातःकाळी मंडळी पाहावयास गेली तेव्हां पंतांच्या आर्या देवाजवळ असून विठ्ठल पाध्ये यांच्या दूर खाली पडलेल्या दिसल्या. तेव्हापासून विठ्ठल पाध्ये यांनी पंतांचा मत्सर करणे सोडून दिले. पंतांचा स्वभाव गोड, मनमिळाऊ पण अमळ तिरसट असे. पंडितपुराणिकांत दिसून येणारी अहंमन्यता त्यांच्या ठिकाणी नसून ते फार नम्र होते. त्यांना ग्रंथसंग्रह करण्याचा मोठा नाद असे. त्यांचे आचरण फार पवित्र होते. या त्यांच्या गुणांवरून बारामतीकरांच्या घरची मंडळी, त्यांचे आश्रित, बारामतीची व इतर ठिकाणची त्यांची स्नेहीमंडळी यांची त्यांजविषयी मोठी पूज्यबुद्धि असून ते त्यांना फार मानित असत. तसेंच वाबूरावांनी पंतांस आश्रय दिला होता यास्तव त्यांनी आपल्या काव्यांत पुष्कळ ठिकाणी आपल्या यजमानांचा व त्यांच्या पुत्रांचा कृतज्ञपणे उल्लेख केला आहे. ७ भगवद्भक्ति, सत्संग व तीर्थयात्रा. 'मन हेचि फार इच्छी की आतां सेवणे तुझे पाय, । | तुजवांचुनि इतरांच्या भजनी मजलागि होय फळ काय?' ॥ (आर्या केका २१) | 'मातेतें त्यजुनि पळहि जाय न भलतीकडे जसें वाळ, ।। सत्संगति सोडुनि मन नच जाउ, तसेंचि घेउ हे आळ. ॥ (सन्मनोरथ. ११) मोरोपंत महाभगवद्भक्त होते. त्यांला कीर्तनपुराणश्रवणाची व सत्संगाची लहानपणापासून फार गोडी होती. याविषयी त्यांच्या स्फुटकाव्यांतून व विशेषतः 'सन्मनोरथराजि' या काव्यांतून पुष्कळ उल्लेख आढळतात. 'जसें मांजर दुधावर टपतें, हळद, कुंकू ही सौभाग्यद्रव्ये जशी सुवासिनीला प्रिय असतात, फाल्गुनी पौर्णिमेची जशी लहान मुलांना आवड असते, तसे मला कीर्तन प्रिय असावें व हरिकीर्तनप्रसंगी धनिकाच्या येथे जसा चोर जपून शिरतो तसें शिरून अनेक कामें मागें असली तरी कुचर ढोराप्रमाणे कीर्तन सोडून मी उठू नये' अशी इच्छा पंत सन्मनोरथराजीत प्रकट करितात. कीर्तनमहिमा एकास्थळी पंत असा वर्णन करितात:काढिली स्पष्ट मोहाच्या पाठिची साल साधुनी । भगवत्कीर्तनें, केली देवांची सालसा धुनी. ॥ (मोहाच्या पाठीची साल संतांनी भगवत्कथा करून काढिली व पाप्यांचा उद्धार करण्याचें काम कीर्तनांतच होत असल्यामुळे देवपदी गंगेकडे फारसे राहिले नाही ह्मणून ती आळशी झाली-हें तात्पर्य.) भगवनामवर्णनाची पंतांस केवढी मोठी आवड होती ती त्यांच्या अष्टोत्तरशतरामायणांवरून व इतर काव्यांवरून स्पष्ट होते. भगवद्भक्तांच्या समागमाचे पंत फार भुकेले होते. त्यांच्याविषयी पंतांचे मनांत केवढी पूज्यबुद्धि वसत , असे ते त्यांच्या साधुसत्कार, साधुरीति, साधुस्तव, सद्वर्णन इत्यादि प्रकरणांवरन दिसन येते. 'न शूद्रा भगवद्भक्ता विप्रा भागवताः स्मृताः । सर्वे वर्णेषु ते शूद्रा अभक्ता वै जनाईने' हे भागवती वचन त्यांच्या ठिकाणी इतकें बाणून गेले होते की सन्मणिमालेत मुकुंदराज, ज्ञानदेव, सुक्ताबाई, नामदेव शिंपी, एकनाथ, तुकाराम वाणी, सावळा माळी , गोरा कुंभार, जनी दासी, बोधला पाटील, सेना न्हावी, दादु पिंजारी, धना जाट, मीराबाई