पान:केकावलि.djvu/186

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था, पुष (ड.व्हता. मघटी: पुणे) असो वरि कसा तरी, विमल भाव ज्याचा करणव पेठ, पुणे-३० ग्यतेस चढविले व 'प्रभुत्व' पदाचें सार्थक्य केले, तद्वतच माझ्यावर अनुग्रह करण्याची आपली इच्छा असल्यास तसे करण्यास आपण समर्थ आहांत. अर्थसादृश्यःमोरोपंतकृत मुक्तामालेतील पुढील श्लोक यासंबंधी वाचनीय आहे:-'जीवेत्याशीरुचिता दातुं नमतेऽविचार्य दत्ताश्रीः । न मनाक पात्र विचारो नमनात्सर्वस्वदानमाश्चर्यम्' ९०. अर्थ:-तुला अभय असो एवढा आशीर्वाद बिभीषणाला पुरे होता पण रामाने विचार न करितां त्याला लंकेचे राज्य दिले. यांत पात्रापात्रविचार झाला नसून फक्त नमनावरून एवढे सर्वस्वदान रामाने केलें हें आश्चर्य. या केकेच्या प्रथम दोन चरणांत प्रभुत्वाची व्याख्या केली आहे. तिसऱ्या चरणांत प्रसादाचें लाघवनिवारकत्व निषेधरूपाने सांगितले आहे. आणि चवथ्या चरणांत स्वसाम्य देणारा प्रसाद कोणावर केला याचे उदाहरण दिले आहे म्हणून यांत अर्थातरन्यास नामक अलंकार झाला आहे. तिसऱ्या चरणांत विनोक्ति नामक अलंकार आहे. 'विना संबंधिना येन केनचिद्वर्ण्यवस्तुनः । अरम्यता रम्यता वा विनोक्तिरिति कथ्यते ॥ तादृक्षमपि चातुर्य सौंदर्य तव मानिनी। व्यर्थमेवेति जानीहि सरसं दयितं विना ॥९८॥ विनाक्रूरस्वरं काक माकन्दं मकरंदितम् । गाहस्व गाढं गंतारः कोकिलं मन्वते जनाः' ॥ ९९ ॥ (मंदारमरंदचंपू). याचे लक्षण:-'प्रस्तुत कांहीं वांचुनि दूषित वदती विनोक्ति तरि तीच । विद्या हृदयंगमही विनयावांचूनि संतत रितीच ॥ १ ॥ तें जरि कोणावांचुनि रमणीय विनोक्ति तीहि तरि साची । पिशुनजनावांचुनियां राजेंद्रा शोभते सभा तुमची' ॥२॥ एखाद्या गोष्टीवांचून प्रस्तुत रम्य किंवा हीन होतें असें जेथें वर्णिलें असतें तेथें विनोक्ति अलंकार होतो. विनोक्तींत बहुधा विनाशब्दाचा उपयोग केला असतो तरी कचित् त्यावाचूनही विनोक्ति होते. ह्या केकेंत तसाच प्रकार आहे. १. अन्वयः-वरि कसा तरी असो (पण) ज्याचा भाव विमल (आहे) तयावरि दया करा. (हे प्रभो) पचे असाचि वर चाकरा द्या, (कारण) जें दासा न जिरे (तें)बहुहि दिले (तरी) वृथाचि गमतें. अधिकार पुसोनि (वर) द्या, ते (वर) सुकर (आणि) सदा साजिरे (होत). प्रास्ताविकः-ध्रुवाची व बिभीषणाची योग्यता माझ्या आंगांत नाही म्हणून देवा! माझ्या योग्यतेप्रमाणे मला वर द्या, त्यांतच माझें कल्याण आहे असे कवि सांगतात. २. निर्मळ. ' असो वरि... दया' याचा अर्थः-तुमचा भक्त वरून दिसण्यांत कसाही असला तरी त्याची अक्ति जर निर्मळ व अंतःकरणापासून आहे तर त्यावर तुम्ही दया करतां. देव भक्ताची परीक्षा बाह्योपकरणांवरून करीत नसून अंतरंगाच्या निर्मळ स्वरूपावरून करितो. ३. एकनिष्ठभक्ति. भक्ति व भावः-हरिकथेचे श्रवण किंवा कीर्तन करणे, भगवन्नामस्मरण करणे, देवदर्शन घेणे, देवपूजा करणे, इत्यादि प्रकारांपैकी एक किंवा अधिक प्रकारांचे अवलंबन करणारा मनुष्य ईश्वराची भक्ति करितो असे होईल. परंत ती भक्ति निर्मळ, निष्कपट, एकनिष्ठ व जिव्हाळ्याची असल्याशिवाय ती भावाच्या पायरी पोचणार नाही. संतमंडळींनी भक्तिभावांत हा फरक पुष्कळ ठिकाणी आपल्या ग्रंथांतून केलेला