________________
मोरोपंतकृत प्रसाद मग काय तो? जरि निवारिना लाघवा ? कसे देशमुखानुजा विसरलां ? अहो ! राघवा! ॥ ६६ १. लघुपणाला, कमीपणाला. तृतीयचरणार्थ:-जो शरणागताचा कमीपणा दूर करून त्याची योग्यता वाढवीत नाहीं तो कशाचा प्रसाद? म्हणजे त्याला प्रसाद म्हणणे योग्य होणार नाही. सुंदर व समर्पक व्याख्याः-ह्या केकेंत पंतांनी प्रभुत्व व प्रसाद ह्यांच्या ज्या व्याख्या दिल्या आहेत त्या किती तरी सुंदर आहेत? अशा प्रकारच्या समर्पक व्याख्या पंतांच्या काव्यांत वऱ्याच ठिकाणी आढळतात व त्यामुळे त्यांचे रमणीयत्व आणि आकर्षकत्व ही फारच वाढली आहेत. पुढील थोडींच उदाहरणे पहा:-(१) धर्मन्यायोचित जें तेंचि सुभाषण मनासि उद्धव दे। [विराट०-४ गी० ५३ ], (२) बापा! प्रजा अशी जी पितरांसि भवार्णवांत सुतरी ती [आदि०-अ० २३ गी० ११], (३) शोकी पडल्या चित्ता दे वोधकरासि तो सखा लोकी [कृष्णविजय-उत्तरार्ध-अ० ८२ गी० २६], (४) ती दया हृदयीं रोधी क्रोधाचा नित्य वेग जी [रामायण], (५) उदारपण तें भलें सुखवि में सुपात्रा सदा [केका ६९]. २. रावणाच्या धाकट्या बंधूला (बिभीषणाला). ऐतिहासिकः-ब्रह्ममानसपुत्र पुलस्त्य ऋषीला विश्रवा नामक पुत्र होता. त्याला देववणिनी व कैकसी अशा दोन स्त्रिया होत्या. पहिलीपासून त्याला वैश्रवण (कुबेर) झाला व दुसरीपासून रावण, कुंभकर्ण, शूर्पणखा व बिभीषण अशी चार अपत्ये अनुक्रमें झाली. रावणाला जन्मतःच दहा शिरें होती. चार भावंडांमध्ये बिभीषण तेवढा सत्वगुणी होता. रावणाने सीताहरण केलें तें याला न आवडून याने त्याला पुष्कळ बोध केला. तो रावणास न आवडून त्याने याची पुष्कळ निर्भर्त्सना केली. तेव्हां हा चार प्रधानांस बरोबर घेऊन रामास शरण गेला. रामाने याचे अंतःकरण ओळखून त्यास आश्रय दिला व रावणास मारून लंकाराज्याचा तुला अभिषेक करीन असें अभिवचनही दिले. पुढे रावणवधानंतर रामाने लक्ष्मणाकडून याला लंकाराज्याभिषेक करविला. रामाची याजवर इतकी कृपा होती की ते त्याला आपल्या बंधूप्रमाणे समजत. आपल्या शरणागताचे दैन्य दूर करून त्याला प्रभूनें आपल्या योग्यतेस चढविलें या, उदाहरण चवथ्या चरणांत दिले आहे. ३. रघुकुलोत्पन्ना रामचंद्रा! ऐतिहासिकः- रघु हा इक्ष्वाकुकुलोत्पन्न ऐलविल दिलीपाचा पौत्र व दीर्घबाहु राजाचा पुत्र. हा सूर्यवंशांत इतका प्रख्यात होऊन गेला की, सूर्यवंश हे नांव बरेंच मागे पडून रघुवंश असें नांव चालू झाले. यास अजनावाचा एक पुत्र होता' (भारत. प्रा. ऐ. कोश). कविकुलगुरु कालिदास ह्याने आपल्या प्रसिद्ध रघुवंशकाव्यांत रघु हा दिलीपराजास सुदक्षिणा भार्येपासून नंदिनीनामक वशिष्ठधेनूच्या प्रसादाने झालेला पुत्र होय असें वर्णिले आहे. रघूच्या वंशांत झालेले राजे ते राघव. परंतु हे नांव दाशरथिरामाविषयी योजण्याची विशेष रूढी आहे. चतुर्थचरणार्थः-देवा! रामावतारी आपल्यास पण शरण आला तेव्हां तो शत्रूचा बंधु, ही गोष्ट लक्षात न घेतां आपण त्यावर त्याला आपला बंधु मानून त्याला आपल्या योग्यतेस चढविले ही गोष्ट सरला! विभीषणावर प्रसाद करून जसें तुम्ही त्याला आपल्या यो आपण कशी विसरलां? बिभीषणावर प्रसाद करून