पान:केकावलि.djvu/170

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. स्कारांनी प्रार्थितों, यजने करून प्रार्थितों, [आणि] हवींच्या योगाने प्रार्थितो. हे देवा! हे बुद्धिमंता राजा [वरुणा] ! [आम्हीं] केलेल्या पापांची [आम्हांपासून सुटका करून त्यांची आम्हांला क्षमा कर.' (१.२४,१४) (६) (त्वं भुवः प्रतिमान) [हे इंद्रा !] तूं [या] विस्तीर्ण भूमीचे प्रतिमान होस. [तूं] महावीर ज्यांत राहातात त्या उच्च [स्वर्गाचा] प्रभु होस. [तूं] आपल्या मोठेपणाने सर्वहि अंतरिक्ष भरून टाकिलें आहेस. तुझ्यासारखा दुसरा कोणी नाहीं [हें] अगदी सत्य [आहे]. (न यस्य) ज्याच्या मोठेपणाचा अंत द्यावापृथिवीस लागला नाही [आणि] अंतरिक्षास [ही] लागला नाहीं;...ज्याच्या [बळाचा अंत मिळाला] नाही, [तो] [तूं] एकटा [हे इंद्रा!], सकलवस्तु अनुक्रमेंकरून निर्माण करिता झालास' (१.५२.१३-१४).' (७) (नहि नु) “आम्हांस किती झाले तरी इंद्राविषयी ज्ञान होत नाही...(१.८०.१५) (८) (उपो पु शृणुही) [गौतम ऋषि स्तवन करितो] 'हे मघवन् ! [तूं] येऊन [आमच्या] प्रार्थना मन लावून ऐकून घे. [तूं आम्हांविषयीं] उदासीन [होऊ] नको. [तूं] ज्यापेक्षां आम्हांला वाच दिली आहेस त्यापेक्षां [आम्ही] तुझ्याजवळ याचना करणारच करणार.' (१.८२.१) (यस्याजस्रं शवसा) 'ज्याचा स्तवनीय महिमा [आणि] प्रताप भूलोकाला आणि द्यु लोकाला चोहोंकडूनही नित्य व्यापून राहत असतो, तो [इन्द्र] [आमच्या] कर्मांच्या योगेंकरून तृप्त [होऊन] [आम्हांला तारो. [तो] मरुतांसहित इंद्र आमचा संरक्षिता होवो.' (९) (न यस्य देवा) 'ज्याच्या बळाचा अंत धुलोकामध्ये देवांना [लागलेला] नाहीं, मर्त्य मनुष्यांस [लागलेला] नाही आणि उदकांनाही लागलेला नाहीं तो [इंद्र] [आपल्या] तेजानें पृथिवी आणि धुलोक यांस व्यापून टाकणारा [होय]. [तो] मरुतांसहित इंद्र आमचा संरक्षिता होवो. (१.१००. १४-१५)' (१०) (त्वं नो अस्या) 'हे इंद्रा! नाहींशी करावयास कठीण अशी जी ही [दरिद्रावस्था], तिजपासून तूं आम्हांला [तार]; हे वज्रधरा ! तूं आम्हांला पापापासून सुद्धा तार. तूं आम्हांला रथ आणि घोडे यांहीं भरलेली विपुल संपत्ति दे, की जेणेकरून आम्हांला अन्न, कीर्ति आणि प्रशंसा ह्यांचा लाभ होईल.' (११) (मा सा ते) 'तर हे धनसंपन्न [इंद्रा!] तुझी कृपा आम्हांला न सोडो; अन्नसंपत्ति आमच्या पदरी राहोत. हे मघवन् ! उदार [असा जो] तूं , [तो] आम्हांला गाई मिळवून दे, [मग आम्ही तुला पुष्कळ द्रव्ये देऊन कुटुंबाच्या मनुष्यांसहित तुझ्या भजनांत परायण होऊ.' [ १. १२१. १८ ] (१२) (द्वा सुपर्णा सयुजा) 'एकमेकांचे जिवलग मित्र [असे] दोघे पक्षी एकाच वृक्षाचा आश्रय करितात. त्यांतून एक त्या वृक्षाची जी गोड फळे [तीं] भक्षण करितो. [आणि दुसरा [तीं] भक्षण न करितां त्यांजकडेस पाहात राहतो.' जीव आणि परमात्मा हे दोन पक्षी, देह वृक्ष, कर्मफळे ही फळें असें रूपक सोडवावें. (१.१६४.२०) (१३) (यस्मिन् वृक्षे मध्वदः सुपर्णा) 'ज्या वृक्षाचे ठायीं गोड फळे खाणारे पक्षी आश्रय करितात आणि जेथून ते सकळ विश्वांवर पिल्लं घालतात, त्याचेच फळ सर्वापेक्षां गोड असे म्हणतात. त्या पित्याला जो जाणत नाही त्याला ते फळ मिळत नाहीं? वृक्ष म्हणजे परमात्मा, पक्षी म्हणजे इंद्रिये, गोड फळे म्हणजे ज्ञान, आश्रय करितात म्हणजे झोपेच्या वेळी आपआपल्या कि पासून निवृत्त होतात, पिलं घालतात म्हणजे संसारापासून परमात्म्याचे ज्ञान इत्यादि समजन