________________
मोरोपंतकृत परंतु हृदयीं महाजनभयास मी मानितों. ॥ रूपक सोडवावें. (१४) (चित्रं देवानामुदगादनीक) 'देवांचे सुंदर मुख, [आणि] मित्राचें, वरुणाचे, आणि अग्नीचे चक्षु, [आणि] जंगमाचा व स्थावरांचा जीव असा जो सूर्य तो पहा हा उगवला आहे [आणि] द्युलोक, पृथ्वी [आणि] अंतरिक्ष यांस [तेजानें] भरून टाकित आहे.'(१.११५.१) (१५) (नकिरिन्द्र त्वदुत्तरो) 'हे इंद्रा! तुजहून अधिक श्रेष्ठ कोणी नाही, हे वृत्रघ्ना ! अधिक मोठा कोणी नाही. तुझ्यासारखाही कोणी नाही.' (४.३०.१) (१६) (तत्सवितुवरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्) 'जो [सविता] आमच्या बुद्धीना प्रेरूं शकतो त्या देदीप्यमान सविल्याचे श्रेष्ठ तेज आम्ही थ्यातों.' हा मंत्र जगद्विख्यात गायत्री मंत्र होय. (३.६२.१०) जसें येईल तसें. केकेच्या द्वितीयार्धाचा अर्थः- परमेश्वराची भक्तिपूर्वक स्तुति-मग ती स्वसामर्थ्यानुरूप वेडीवांकडी कशीही केलेली असो-ती त्याला प्रिय आहे असे गुरुजन सांगतात, त्या आधारावर देवा! मी तुम्हांला 'भलतसें' (यथामति) वानितों (तुमची स्तुति करितों) हे जरी खरे आहे तरी माझ्या मनांत पंडित लोक मला नांवें ठेवतील ही शंका येऊन मला तुमचें यथामति स्तवन करण्यास शंका वाटते. १.विद्वान्, नैयायिक, वैयाकरण, साहित्यशास्त्रज्ञ, शब्दशास्त्रवेत्ते व अर्थवादी पंडित यांचे भय. पंडितलोक माझ्या पदयोजनेस कोणता दोष लावतील न कळे, हे भय मी मनांत मानितों. (बाळगतो.) कृष्णविजयपूर्वार्धाच्या शेवटी 'सज्जनप्रार्थनेंत' सज्जन रसिकांचे अभय घेऊन पंतांनी काव्यरचना केली असा उल्लेख आहे. 'मोरोपंताच्या ग्रंथांवरून पाहतां तो आपणास पंडित समजत असे किंवा त्या पदावर चढण्याविषयी त्याची हाव होती असाही प्रकार बिलकुल नजरेस येत नाही. तो आपली पदवी ओळखून तींत संतुष्ट होता असें दिसते. आपलें कवित्व कोणत्या तोलाचे आहे हे पक्केपणी जाणून तो त्याविषयी योग्य अभिमान वाळगित असे व दूषकांच्या आक्षेपांची पर्वा करित नसे, हे त्याच्या काही उल्लेखांवरून दिसते'. (निबंधमाला अंक ७) या व मागील केकेंत पंतांनी व्यंग्योक्तीने विद्वत्तेचा ताठा बाळगून इतरांस तुच्छ मानणाऱ्या पंडितंमन्य 'बुधजनांचा' किंवा 'महाजनांचा' उपहास केला आहे. माझ्या कृतीत दोष पडूं नये म्हणून मी फार जपतों असें व्यंग्य आहे, ते न सांगतां, त्याचे कारण जे 'महाजनभय' तें मी मानितों असें पर्यायाने वर्णिलें आहे म्हणून ही पर्यायोक्ति जाणावी. 'तें पर्यायोक्त जरी कथिलें व्यंग्य प्रकारभेदानें । हे त्यांसि नमन, केले राहुवधूच्या कुचां विफळ ज्याने' ॥ (अ. वि.) जो व्यंग्यार्थ कवीस बोलावयाचा आहे त्याचे प्रकारांतराने म्हणजे वळसा घेऊन मुळच्या रूपापेक्षाही विशेष सुदर असें वर्णन करणे यास 'पर्यायोक्त' अलंकार म्हणतात. वरच्या उदाहरणांत 'वि• ष्णूला नमस्कार असो!' असें न म्हणतां ज्याने राहूस्त्रियांचे स्तन विफळ केले त्याला (अर्थात् विष्णूला) नमस्कार असो' असे म्हटले आहे. पर्यायोक्ताचा एक दुसरा प्रकार और सिद्धि कोणत्या तरी गोष्टीचे मिष करून केली असते. 'पर्यायोक्त तयासहि इटासद्धता जेथे जाते मी आमलना T TI म्हणति मिर्षे इष्टसिद्धता जेथें । जातें मी अ