Jump to content

पान:केकावलि.djvu/169

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६२ मोरोपंतकृत 60 निजस्तव जसा तसा, अगुण घे न वदारुचे । ह्मणोनि निगमस्तुता भेलतसें तुला वानितों; ज्ञाते पुरुष अज्ञान भाविकांना अशी गुप्त गोष्ट सांगतात की तुम्हांला भगवंताची स्तुति जशी करता येईल तशी तुम्ही करा; भक्ताने केलेली वेडीवाकडी स्तुति देखील ईश्वराला आवडते व तो आपली स्तुति करणाराचे दोष काढीत नाहीं; ते जशी आपली स्तुति करितील तशी तो आवडवून घेतो. पाठभेदः-कांही पोथींत 'रहस्य मंदा'चे ठिकाणी 'हरीस वंदा' असा पाठ आढळतो. पाठभेदाचा अर्थः-ज्ञाते पुरुष हरीला (देवाला) वंदा (त्याची येईल तशी स्तुति करा) असेंही उपदेशिती (असे सांगतात). केकासंगतिः-मागल्या २५ व्या केकेंत 'आपल्या स्वामीची-देवाची-स्तुति कशी करावी हे माहीत नसून हा मला उगीच हाका मारीत सुटला आहे' अशी भगवंताची आशंका कल्पून 'तुमची स्तुति कशी करावी हे तुम्हीच मला शिकवा' असे कवीन म्हटले आहे. ह्या केकेंत थोर पुरुषांच्या मते भक्तांनी यथामति केलेले स्तवन परमश्वरास प्रिय होते म्हणून मला तुमच्या कथेला जी उत्कृष्ट उपमा सुचली ती (कामधेनूची उपमा) देऊन तुमचे मी यथामति स्तवन करीत आहे, त्याचा तुम्ही सादर स्वीकार कराल व मजवर रागावणार नाही अशी मला खात्री वाटते, असें कवि ह्मणतात. आपण केलेली स्तुति प्रभूचा कृपाप्रसाद होण्यास समर्थ होणार नाही अशी आशंका सर्वकाळच्या कवींस येते. ऋग्वेदांतील रहूगणाचा पुत्र गोतमऋषि अग्निप्रार्थना करितांना ह्मणतोः'[हे अग्नि], कोणती उपासना तुझें मन वळवील ? कोणती स्तुति तुला अत्यंत आनंदकारक होईल ?] अथवा यज्ञांनी तुझ्या कौशल्याप्रत कोण पावला आहे ? अथवा कोणत्या बुद्धीने आम्हीं] तुला हवि अर्पण करावें?' (ऋग्वेदमंडल १ सूक्त ७६ मंत्र १.). १.जसा येईल तसा २. दोष, कमीपणा.३.) वंदन करणाऱ्याचे, स्तुतिपाठकाचे. 'वंदारुरभिवादके' इत्यमरः. (४) निगम (वेद)+स्तुत (स्तविलेला) वेदस्तता (वेदांनी स्तविलेल्या) परमेश्वराला. वेद हे परमेश्वराच्या श्वासापासून उत्पन्न झालेले असून ते सदोदित परमेश्वराचे स्तवन करितात म्हणून देवाला 'निगमस्तुत' (वेदांनी स्तविलेला) असे म्हणतात. वेदांतील देवस्तुतीचा मासलाः-(१) (सनः पितेव) 'हे अग्नि! जसा पिता पुत्राला सुगम असतो तसा तूं आम्हांप्रत हो; आमच्या कल्याणास्तव आम्हांबरोबर रहा.' (ऋ० मं. १ सू० १ मं० ९) (२) (तमित्सखित्व) 'त्या इंद्रालाच मैत्रीसाठी आम्ही प्रार्थितों, त्यालाच धनासाठी [आणि] त्यालाच शौर्यसंपन्नपुत्रासाठी [प्रार्थितों]. ह्मणून तो शक्तिमान् इंद्र द्रव्य देऊन आम्हांस साह्य करो.' (ऋ० १-१०-६) (३) (आश्रुत्कर्ण) 'ज्याचे कान ऐकतात अशा, हे इंद्रा ! आमची ' हाक ऐक; ह्या माझ्या स्तुति आतांच स्वीकारून घे. हे इंद्रा! ह्या माझ्या स्तोत्राला तूं [आपल्या ही जिवलग कर.' (१-१०-९) (४) (संमाग्ने वर्चसा) 'हे अग्नि! मला तेज दे, मला । आयुष्य दे, आणि मग ऋषींसहित मला देव जाणोत. आणि इंद जाणा संतति दे, मला आयुष्य दे, आ (१-२३-२४), (५)