Jump to content

पान:केकावलि.djvu/153

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४६ मोरोपंतकृत 55 खरासुर जसा, तशी विषयवासना हे खरी; हिचा वध करावया तुजचि शक्ति आहे खरी;। । बैकी सुमति, ताटका लघु, न हे भैली; लोजशी रिखे इंद्रियनिग्रही पुरुष नितांत विरळा होत, ह्या गोष्टीही कवीने सुंदर रीतीनें वर्णिल्या आहेत. या केकेंत अभेदरूपक, काव्यार्थापत्ति आणि श्लेष असे तीन अलंकार कवीने योजिले आहेत. ह्मणून ही केका फारच सरस झाली आहे. १.अन्वयः-जसा खरासुर तशी हे विषयवासना खरी [फार बळकट आहे]. हिचा वध करावया [हे देवा!] तुजचि खरी शक्ति आहे; बकी सुमति, ताटका लघु, [पण हे भली न, उगाचि लाजशी, जशी ब्रजवनांत लीला तशि ही एक [लीला होय. प्रस्तावनाः-मागील केकेंत विषयवासना ही सामान्य गाढवी असें वर्णिले आहे. हीत ही दैत्यरूपी गाढवी आहे असे सांगतात. कथासंदर्भः-कृष्णावतारी धेनुकासुर नांवाचा राक्षस कंसाच्या पदरी होता. रामकृष्णांचा नाश करण्याची कंसाजवळ प्रतिज्ञा करून गाढवाचे रूप धरून तो गोकुळांत आला. पुढे कृष्णाच्या हातून तो मरण पावला. ही कथा भागवतांत दशमस्कंधाच्या पंधराव्या अध्यायांत वर्णिली आहे. [कृष्णविजय-पूर्वाध-अ० १५.] 'खर' नावाचा एक रावणपक्षपाती राक्षस रामावतारी रामाच्या हातून मरण पावला. पण ह्या केकेंतला 'खर' हा कृष्णावतारांतला समजावा. २. विषयवासना मनुष्याचा नाश करणारी आहे असें गीतेत वर्णिले आहे. [गीता-अ० २ श्लो० ६२-६३.] ३/ही. प्रथमार्धाचा अर्थः-खरासुर जसा प्रतापी होता तशीच ही विषयवासना खरी ही पराक्रमी आहे. खरासुराचा शेवटी जसा तुझांलाच वध करावा लागला, तसा ह्या विषयवासनेचा नाश केला पाहिजे. तो तुमच्याशिवाय इतरांकडून होणे शक्य नसल्यामुळे तुह्मांलाच करावा लागेल, तो तुह्मी करा.(४. गाढवी किंवा खरासुराची बहीण खरी. जशी बकाची बहिण ? बकी ह्मणून सांगितले आहे. (५.) तुला मात्र, भगवंतालाच. ६ खरोखर.७) पूतना. कथासंदर्भः-केका २ पृ० ७ टी० ४ पहा.चांगल्या बुद्धीची. बकी ही सुमति होय, कां की ती मातेच्या वेषाने तुह्मांला स्तनपान देण्यासाठी आली. ९. कथासंदर्भ:ताटका ही सुकेतु नामक यक्षाची कन्या पूर्वी उत्तम रूपसंपन्न होती. अगस्त्य ऋषींच्या शापामुळे हिला मोठे विक्राळ रूप प्राप्त झाले. ही मोठी बलसंपन्न असून जंभपुत्र सुंद याची स्त्री होती. हिला त्यापासून मारीच आणि सुबाहु असे दोन पुत्र झाले. भगवान् विश्वामित्र ऋषि अयोध्येहून स्वयज्ञसंरक्षणार्थ रामलक्ष्मणांला बरोबर घेऊन आपल्या आश्रमाकडे जात असतां मार्गात त्यांची व हिची गांठ पडली. तेव्हां विश्वामित्राच्या आज्ञेवरून रामाने हिचा वध केला. या सर्व प्रसंगाचे वर्णन कालिदासाने आपल्या रघुवंश काव्याच्या अकराव्या सर्गात बहारीचें केलें आहे. रामशराने ताटका मृत्युमुखी पडली या प्रसंगाचेच वर्णन पहा:-'जेव्हां दुःसह रामकामविशिखें वेगें हृदी ताडिली, । गंधाढ्ये तंव रक्तचंदनरसें होवोनि लिप्ता भली; ॥ गेली सत्वर जीवितेशसदनालागोनि रात्रिंचरी, । अत्याती अभिसारिकेपरि बहु ती होउनि घावरी ॥' १९ ('लेलेकृत रघुवंशाचे भाषांतर पृ० १४३)(१०) लहान, अल्पशक्ति.१४. बरी. ही विषयवासनारूपिणी