Jump to content

पान:केकावलि.djvu/154

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. उगाचि, तशि एक ही क्रेजवनांत लीला जशी. ॥ ५५ 56 कैसें तरि असो मंग; स्वपणरक्षणाकारणे खरी भली नव्हे, ही सुमति नव्हे, व लघुही नव्हे, म्हणून ही वध्य आहेच आहे. १२. लाजतां. केकेचा स्पष्टार्थः-कवि भगवंताला म्हणतातः-ही विषयवासना राक्षसी खरासुरासारखीच प्रबल आहे व तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणाच्या हातून मरण पावणार नाही, म्हणून तुम्हीच हिला मारा-यावर तुम्ही शंका घ्याल की विषयवासना हीराक्षसी खरी, पण ती स्त्रीजाति आहे म्हणून मी हिचा वध करणार नाही. तर देवा! ही आपली शंका व्यर्थ आहे, कारण आजपर्यंत दुष्ट राक्षसींचा आपण वध केला नाहीं असें नाहीं. रामावतारी ताटकेचा व कृष्णावतारी पूतनेचा आपण वध केला त्या स्त्रियाच होत्या. त्यांचा वध करावयास जर आपणास संकोच वाटला नाही, तर मग ह्या विषयवासनाराक्षसीचा वध करण्यास कां संकोचतां? पूतनाताटकादि राक्षसींच्या वधापेक्षां हिचा वध करणे अधिक प्रशस्त आणि आवश्यक आहे. कारण त्या जरी दुष्ट होत्या, तरी हिचा दुष्टपणा सर्वांत जास्त आहे. पूतनेने गोकुळांतील कित्येक स्त्रियांची मुले मारिली व ताटकेने कित्येक ऋषींच्या यज्ञांचा विध्वंस केला हा काय तो त्यांचा उपद्रव, पूण ह्या विषयवासनाराक्षसीचा तर सर्व लोकत्रयाला सर्वकाळ उपद्रव आहे. तेव्हां ह्या दुष्टतम राक्षसीचा वध करण्यास बिलकुल संकोच धरूं नका. हिचा वध करणे आपणास अत्यंत सहज आहे. कृष्णावतारी गोकुलांत खेळतां खेळतां ज्याप्रमाणे तुम्ही अनेक दुष्ट राक्षसांचा संहार केला त्याप्रमाणे सहज रीतीने ह्या विषयवासनाराक्षसीचा संहार करून तिच्या त्रासापासून मलाच नव्हे तर एकंदर लोकत्रयास सोडवा. १. उगेच, कारणाशिवाय. २. गोकुळांतील वनांत, गोकुळांतील अरण्यांत जशा अनेक लीला केल्या तशी ही एक लीलाच होईल. त्या लीलेंत खर मारला, या लीलेंत खरी मारिली इतकेंच. गोकुळांत कित्येक दुष्ट राक्षसराक्षसींचा जसा आपण सहज लीलेने नाश केला, त्याचप्रमाणे हिचा नाश करावयास तुम्हाला श्रम करणे नको. प्रसादगुणः-या केकेंत अनेक कथासंदर्भाचा निर्देश असून शब्द ऐकतांच अर्थबोध होतो ह्मणून हा प्रसादगुण समजावा. चतुर्थ चरणांत थोडक्यांत पष्कळ अर्थ आणिला आहे म्हणून ह्यांत अर्थप्रौढीही पुष्कळ आहे. ३. केकान्वयः-मग कसे तरि असो, स्वपणरक्षणाकारणें तों शरणागतव्यसन स्वयें वारणे अवश्य; हैं तुम्हां मुख्य विहित [होय, यास्तव हो! [देवा!] न पुसतां निजोक्ति खरी करा. तो खर अधिक [दुष्ट] काय ? हो! खरी संहरा. प्रस्तावनाः-आपल्या भक्तांचे संकट दूर करणे हे तुमचे आद्यकर्तव्य आहे अशा अभिप्रायाने कवि म्हणतात. ४, ५. 'मग कसें तरि असो.' मग त्याचे काहीतरी कारण असो. आपल्या भ. क्तांचे संकट वारणे हे तुम्हाला अवश्य आहे. मग तसे करण्यास आमची भीड का. रण होवो किंवा तुम्हा स्वतःलाच तशी अवश्यकता वाटो. त्या कारणांचा सामना