________________
केकावलि. १४६ करितां लोक हातांत दंड (काठी) घेऊन तिला मारतात, तरी ही त्यांच्या काठ्यांना न जुमानतां त्यांना लाथा मारते व आपल्या जागेवरून हालत नाही. अशी सदंडांची दशा! मग कवि म्हणतात, मी तर अदंड म्हणजे माझ्या हातांत काठी नाही, तेव्हां ही माझें थोडीच ऐकायला बसली आहे ! (येथे काव्यार्थापत्ति अलंकार झाला). दुसरा अर्थ-सदंडाला म्हणजे सर्वसंगपरित्याग करून असणाऱ्या संन्यासिजनाला जर ही गाढवीसारखी द्वाड विषयवासना आवरत नाही, तर मग स्त्रीपुत्रधनदारादि संसारपाशांत गुरफटलेल्या गृहस्थाश्रमी लोकांना आवरत नाही, यांत काय नवल आहे ? 3. लाथा मारते. जनाला मोह पाडून त्यांच्या गळी पुनः पुनः पडते. ४. ज्याच्या हातात काठी नाहीं तो, किंवा ज्याने चतुर्थाश्रमाची दीक्षा घेतली नाही असा संसारी मनुष्य, गृहस्थाश्रमी पुरुष. विषयवासनेची दुर्निवारताः-विषयवासनेचा मुख्य व रूढार्थ जो स्त्रीविषयक आसक्ति ती किती दुर्निवार आहे, मोठमोठे तपस्वी तिच्यापुढे कसे नन झाले, देवांत श्रेष्ठ अशा देवांची सुद्धा तिच्यामुळे कशी त्रेधा उडाली हे पुराण श्रवण करणारास सुविदित आहेच. एकनाथी भागवतांतील पढील संक्षिप्त उतारा पहाः-(काम आपला प्रताप नरनारायणांस सांगतो) 'मज कामाचेनि घायें। ब्रह्मा कन्येसि धरूं जाये । पराशरा केलें काये । भोगिली पाहे दिवा दुर्गंधा ॥ ११७ ॥ ज्यातें योगी वंदिती मुकुटीं । जो तापसांमाजी धूर्जटी। तो शिव लागे मोहिनीपाठीं। फिटोनि लंगोटी वीर्य द्रवलें ॥ ११८ ॥ विष्णु वृंदेच्या स्मशानीं । धरणे बैसे विषयग्लानि । अहल्येची काहणी । वेदी पराणीं वर्णिजे ॥ ११९ ॥ नारद नायके माझी गोष्टी । त्यासि जन्मले पुत्र साठी । माझी साहों शके काठी । ऐसा वळिया सृष्टी असेना ॥ १२० ॥ जो ब्रह्मचाऱ्यांमाजी राजा । हनुमंत मिरवी पैजा । तयास्तव मकरध्वजा । संगेंविण वो जन्मविला म्यां ॥ १२१ ॥ कलंकिया केला चंद्र। भगांकित केला इंद्र । कपाटी घातला षण्मुख वीर । जो लाडका कुमर महेशाचा ॥१२२॥ मज जाळिलें महेशे । त्यासि म्यां अनंगें केलें पिसें । नवल धारिष्ट तुझ्या ऐसें । पाहतां न दिसे तिहीं लोकीं ॥ १२४ ॥ (अ० ४) (कामबाणाचा दरारा) ज्या बाणाचा पिसारा । लागतांचि पैं भेदरा । तापसी घेतला पुरा । सोडूनि घरदारा पळाले ॥ २२७ ॥ (अ०६). एवढ्याकरितां संन्याशांनी काष्ठाच्या सुद्धां स्त्रीस नुसत्या पायाने देखील स्पर्श करूं नये असें श्रीमद्भागवत एकादशस्कंध यांत सांगितले आहे:-‘पदापि युवतीं भिक्षुर्न स्पृशेदारवीमपि । स्पृशन्करीवत्वयनका रिण्या अंगसंगतः ॥ (अ० ८ श्लो० १३) तसेंच 'काशीखंड' अ० ७ पहा. ५. कवि मोरोपंत.६. व्या०:-'कोणत्याही कार्याविषयी असामर्थ्य दाखवायाचें असतां किती या शब्दाचा प्रयोग व्यवहारी भाषणांत फार आढळतो.' [य० पां०-पृ० २१२.] अशा आशयाची उदाहरणे पंतांच्या काव्यांत पष्कळ आहेत. (१) किति कुरुबळ ? भस्म करिल जग पाशुपतज्ञ हा निमेषांत. [उद्योगपर्व-अ० १४ गी० १० पृ० ३३०.] केकामाधुर्यः-या केकेंत कवीनें भगवत्कथेला कामधेनूची उपमा देऊन आपल्या उपासकांचा उद्धार करण्याचे तिचे सामर्थ्य सुंदर रीतीने दर्शविके आहे. विषयवासनेला गाढवी व भगवत्कथेला कामधेनु ह्मणून त्या दोघींत असलेलें अल्प साधर्म्य व अत्यंत वैधर्य है चांगले दाखविले आहे. तसेच भगवत्प्राप्तीस विषयवासना विघ्नकारिणी असूनही ती दलिता सल्यामुळे संसारत्याग केलेल्या तपस्व्यांना सुद्धा कधी कधी तिचा मोह पडतो व शुकाचार्यांसा