पान:केकावलि.djvu/147

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४० मोरोपंतकृत 52 भवन्मतिस आवडे जरि, धनादिका लागि ते _मदीय गुणकीर्तनश्रवण कां तरि त्यागिते? ।' असेंहि म्हणशील बा! जरि, तरी तुझी मावली तुज त्यजुनि पाँजितां, कशि दुधाकडे धांवली ? ॥ ५२ ती स्तुत्य, प्रशस्य. येथे दोन नकार आहेत त्यांपासून निषेधार्थाचा परस्पर लोप झाला आहे. द्वौ नौ प्रकृतार्थ गमयतः' (Two negatives make one affirmative'.) असा वचनाधार सुप्रसिद्ध आहे. केकेचा भावार्थः-कवीने भगवंताच्या क्षमागुणाची प्रशंसा करून मजसारख्या सर्व पाप्यांच्या पातकांची क्षमा करून त्यांचा उद्धार करा अशी प्रार्थना केली आहे. ३. पितात. पिणे ही क्रिया रसाच्या ठिकाणी संभवते, पण लौकिक रीतीस अनुसरून ती कथेच्या संबंधानें वर्णिली आहे म्हणून हा समाधि नामक गुण होय. हा 'समाधि' नामक काव्यालंकारापासून अगदींच भिन्न समजावा. दंडिकृत काव्यादर्शीत या गुणाचे सोदाहरण लक्षण दिले आहे:-'अन्यधर्मस्ततोऽन्यत्र लोकसीमानिरोधिना । सम्यगाधीयते यत्र स समाधिः स्मृतो यथा ॥ ९३ ॥ कुमुदानि निमीलन्ति कमलान्युन्मिपन्ति च । इति नेत्रक्रियाध्यासालब्धा तद्वाचिनी श्रुतिः' ॥९४॥ [काव्यादर्श-१ परिच्छेद-पृ० ८३]. यशाला सुधेची उपमा दिली आहे ह्मणून 'पिती' असे झटले आहे. १. अन्वयः-'जरिभवन्मतिस आवडे तरिते/मति धनादिकालागि मदीयगुणकीर्तनश्रवण का त्यागिते? बा! [देवा!] जरि असेंहि [तूं] म्हणशील, तरी तुझी मावली तुज पाजितां त्यजुनि दुधाकडे कशि धांवली? प्रास्तविकः-'तुला मी फार आवडतों असें तूं बोलण्यांत नेहमी दाखवितोस पण मजपेक्षां तुला विषय फार आवडतात. असें तुम्ही म्हणाल तर हा दोष मजकडे लावू नका, अशा अभिप्रायाने कवि म्हणतात. भवत्। मतिस तुझ्या+बुद्धीला तुझ्या मतीला, 'बुद्धिर्मनीषा धिषणा धीः प्रज्ञा शेमुषी मतिः' इत्यमरः व्या०:-भवत् हे संस्कृतांत सर्वनाम होय. त्यांतील 'त्'ला 'यरोऽनुनासिकेऽजनुनासिको वा' या सूत्राने न् आदेश झाला आहे. व्यंजनापुढे त्या वर्गातील अनुनासिक व्यंजन आल्यास पहिल्याच्या जागी सवर्ण अनुनासिक व्यंजन होते, जसें तद्+नयन तन्नयन, तद्+मन तन्मन. २. आवडतो. ३. द्रव्यादि ऐहिक विषयांसाठी, येथे 'आदिक' यामध्ये स्त्रीपुत्रादिकांचा समावेश करावयास हरकत नाही. ४. ती तुझी मति. प्राकृत कवितेत 'ती, ही' यांच्या जागी 'ते, हे' ही रूपे घालण्याचा सांप्रदाय फार आहे. पुरवणीतील 'कवीचे निरंकुशत्व' हे सदर पाहा. ५. मदीय (माझे) गुणांचे कीर्तन (वर्णन करणे) व श्रवण (ऐकणें). ईश्वराच्या दयादाक्षिण्यादि गुणांचे वर्णन व श्रवण. 'जर तुला मी खरोखरीच आवडत असतो तर तुझी मती माझे गुण वर्णन करण्याचे किंवा ते ऐकण्याचे सोडून स्त्रीपुत्रधनादि विषयांकडे कां धांव घेती? ज्या अर्थी तुझ्या बुद्धीची ओढ विषयांकडे जास्त धांवते त्या अथी मी तुला आवडतों हे म्हणणे लाघवी (खोटें) आहे' हे देवाचे कवीला म्हणणे. ६. त्याग करते, टाकती. ७. वर सांगितलेले. वरील ईश्वराच्या आक्षेपावर कवि