पान:केकावलि.djvu/146

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. १३९ कवी तवयशकथा नेवसुधानवद्या पिती.॥ ६१ लागली नव्हती. तो ब्राह्मणांकडून लाथा मारून घेऊन त्यांतच आपला मान आहे असे मानून घेण्यास शिकला नव्हता.' (वेदार्थयत्न अंक ३ पृष्ठ १८०) 'भृगुः-हे प्रख्यात महापुरातन महर्षि होत. पूर्वी या जगांत अग्नि नव्हता, तो भृगूसाठी मातरिश्व्याने म्हणजे वायूने पृथ्वीवर आणिला (ऋ. १.६०.१), भृगूनी अग्नीला प्रथम यजमानाच्या घरीं स्थापिलें. यावरून भृगूनें अग्निभक्तीचा प्रचार प्रथम स्थापिला असे समजल्यास चालेल; किंवा भृगूनी अग्नि पृथ्वीवर आणिला हे केवळ रूपक आहे असे मानल्यास त्याला क्र ३.५.१० यांत आधार आहे. या मंत्राचा (भृगुभ्यःपरिमातरिश्वा गुहासन्तं हव्यवाहं समीधे) अर्थ सायणाचार्य 'लपून राहिलेला जो अग्नि त्याला मातरिश्व्याने भृगूंपासून ह्मणजे सूर्यकिरणांपासून पेटविलें' असा करितात. यावरून भृगु ह्मणजे सूर्यकिरण असा अर्थ आला असून त्यामुळे जेथे जेथे भृगूनी पृथ्वीवर यशकर्मासाठी ह्मणून अग्नि प्रथम आणिला किंवा पेटविला असे सांगितले आहे, तेथे तेथे सूर्यकिरणांनी अग्नीस प्रथम पृथ्वीवर आणिलें असा गूढार्थ समजतां येईल, आणि मातरिश्व्याने अग्नि भृगूसाठी पेटविला ह्मणजे सूर्यकिरणापासून पृथ्वीवर प्रगट होणारा जो अग्नि त्याला वाढवन वायनें विस्तृत केले असा अर्थ. भृगु हे अतिप्राचीन ऋषि होत असें वेदमंत्र रचले गेले तेव्हांही नित असत. सगळ्या ऋग्वेदसंहितेत भृगूंनी केलेली सूक्ते नाहीत.' (वेदार्थयत प० १ अंक १४ पृ० ८४४) भृगुपदलांछनकथेत गूढ रूपक असावे असे वाटते. भृगु हा ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रापकी एक असून त्याला ख्याती पत्नीपासून धाता व विधाता असे दोन श्रीनामक एक कन्या होती. त्यांपैकी कन्या नारायणाला दिली. तीच लक्ष्मी होय असें मार्कंडेयपण अ०५२ यांत सांगितले आहे. ३. भूषण म्हणून मिरवितोस (धारण करितोस). मिरविणे हा शब्द फारसी आहे. देवा! सर्वकाळ तुम्ही भृगुपदलांछन भूषण म्हणून वक्षस्थलावर धारण करितां. यापेक्षा तुमच्या क्षमागुणाची महती ती कोणती सांगावी. भागचा अत्यंत असहनीय असा अपराध पोटांत घालून त्याने मारलेल्या लातेची खूण वक्षस्थलावर भूषण म्हणून धारण करितां, तेव्हां तुमच्या क्षमागुणाची बरोबरी इतर कोण करणार आहे? १. ज्ञानी, पंडित. 'संख्यावान् पंडितः कविः' इत्यमरः २. नव (नवीन) सुधेप्रमाणे अमृताप्रमाणे) अनवद्या (स्तुत्या, स्वच्छा) अशी जी तव (तुझी) यशासा (गोष्टी ती कवि (ज्ञाते पुरुष) पिती (पितात, आनंदाने ऐकतात). नूतन अमताप्रमाणे सरस व निर्दोष अशी भगवंताची कीर्ति ज्ञाते पुरुष प्रेमाने गातात-हा भावार्थ येथे 'सधा' शब्द श्लिष्ट आहे. सुधा=(१) अमृत, (२) चुना. अमृताचा रंग पांढरा असा कविसंकेत आहे, तेव्हां भगवंताची कीर्ति ही नवसुधेप्रमाणे पांढरी, स्वच्छ. अनिंदित अशी आहे असें कवीचे म्हणणे. 'सुधा' शब्दाचे अनेक अर्थ कोशांत आढळतात:-'सुधा लेपोऽमृतं लुही' इत्यमरः. 'सुधा प्रासादभाक् द्रव्यं सुधा विद्यत्सधामतम, मधा धात्री सुधा नुही ॥' (मंजरीकोश.) अनवद्या स्तुत्या; अन्+अ+ जारण्यास योग्य, बोलण्यास उचित-जी बोलण्यास अनुचित नव्हे सुधा हि भोजनं ज्ञेयं सुधा धात्री सुधा नही ॥' (मंजरीकोश) GE