________________
१३८ मोरोपंतकृत सास गेला. तेथे त्याला बंधूच्या नात्याने शिव आलिंगन देण्यास उठला असतां तूं उन्मार्गवृत्ति आहेस म्हणून मी तुझ्या आलिंगनाचा स्वीकार करीत नाही' असें ऋषि महादेवाला बोलला. त्यावर शिव क्रुद्ध होऊन त्याला त्रिशुलाने मारण्यास उद्युक्त झाला. हे पाहून भृगून स्तुति करून शिवाचा क्रोध शांत केला व नंतर तो त्रिमूतांपैकी उरलेल्या देवाकडे वैकुंठास गेला. तेथें विष्णु लक्ष्मीच्या मांडीवर मस्तक ठेवून निजला होता, त्याच्या वक्षस्थलावर भृगूने लात मारली. त्या काळी विष्णूनें खाली उतरून त्या मुनीस नमस्कार केला, आणि ह्मणाला, 'भगवन् ! आपण आला हे मी जाणले नाही, या अपराधाची मला क्षमा असावी. कारण मुनिश्रेष्ठा ! तुमचे चरण अत्यंत कोमल असल्यामुळे त्यांस माझ्या कठीण हृदयावर आघात घडल्याने दुःख झाले असेल.' असें बोलून देव स्वहस्ताने त्या ब्राह्मणाचे चरण रगडीत बसले. आणि त्याची अशी प्रार्थना करिते झाले की, 'तुम्ही आपल्या पादोदकाने मला व माझ्या स्वरूपांत असणाऱ्या सर्व लोकपालांस पवित्र करावें; कारण तुमचें चरणोदक सर्व तीर्थासही पवित्र करण्याची शक्ति देणारे आहे. तसेंच हे ऐश्वर्यसंपन्न ब्राह्मणा! मीही तुमच्या अनुग्रहानेंच लक्ष्मीस मुख्य प्रीतिपात्र झालों असून आज तुमच्या चरणताडनानें माझें अनिष्ट दूर झाल्यामुळे ही लक्ष्मी माझ्या वक्षस्थली निरंतर वास करील.' नंतर भृगुऋषीनें ऋषिसभेस परत येऊन हा वृत्तांत सांगितला. तेव्हां सर्व देवांत विष्णूच श्रेष्ठ आहे असा सर्व ऋषींनी निश्चय केला. ज्या ठिकाणी भृगुऋषीने लात मारली त्या लातेच्या चिन्हाला 'श्रीवत्स' व विष्णूला श्रीवत्सलांछन असें ह्मणतात. मोरोपंतादि महाराष्ट्रकवींनी ह्या भृगुपदलांछनाबद्दल विष्णूचा पुष्कळ ठिकाणी गौरव केला आहे. वामनाचे पुढील उताऱ्यावरून प्रकृत केकेंत वर्णिलेल्या विष्णूच्या क्षमागुणाचे दृढीकरण होईल:-मूढ मूर्ति हरि ! या भुजगाची। शांति माउलिच तूं त्रिजगाची। तूं क्षमा तदपराध कराया। योग्य सिद्धसुरसाधकराया ॥ १२ ॥ ताडिलेंच भृगुनें तुज लातें। साध्य होय हृदयीं तुजला तें । गाति या अमृत आचरणातें । भक्त जे शरण या चरणांतें ॥१३॥ उरी भृगूची हरि लात सोसी। ऐसी क्षमेचीच सदा असोसी। क्षमा धरू वृत्ति अशी मनाची। प्रार्थी हरीतें मति वामनाची ॥ ४० ॥ [हरिविलास-अध्याय ६ पृ० ४३३-४३४]. या कथेचे वर्णन पंतांच्या ग्रंथांत [कृष्णविजय-उत्तरार्ध-अध्याय ८९ गी० १-२५ ] आहे. तसेच पंतांनी 'भृगुचरित्र' म्हणून एक लहानसें स्वतंत्र प्रकरण लिहिले आहे. भृगुपदलांछनाविषयी 'वेदार्थयत्नकार' रा. ब. शंकर पांडुरंग पंडित यांचे विचार:-'या ऋग्वेदांतील ऋचेतील प्रार्थना किती नम्र आणि किती भाविक आहे पहा. रक्षण करणारे देव महाराज' म्हणजे मोठ्या शक्तीचे व अधिकाराचे राजे होत; आणि ज्याचे रक्षण करावयाचें तो दीन दास, दीनवाण्या स्थितीत आहे असे उपासक मंत्रवक्ता म्हणतो. हा जो देवभजकभाव त्याला, आणि देवाधिदेव विष्णूच्या छातीवर ब्राह्मणाने लाथ मारिली आणि तेणेकरून जे क्षत पडलें तो एक अलंकारच आहे असे समजून विष्णूनें तें क्षत बिरुद करून बाळगिलें आणि तो आपल्यावर ब्राह्मणाचा प्रसाद झाला असे मानिले. या धार पातकरूपी कथेला किती अंतर आहे पहा! (अंक ३ पृष्ठ १२९) 'ऋग्वेदांत विष्णूविषयाँ आहे त्यांत आणि पुराणांत वगैरे त्याजविषयी सांगितलेल्या कथांत पुष्कळ अंतर अजून (वैदिककाळांत) बायकोची, मुलांची आणि संसार करण्याची जरूर जें सांगितले आहे त्यांत आणि पुराणात आहे. विष्णूस अजून (वैदिककाळांत) बायक