Jump to content

पान:केकावलि.djvu/142

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. असें प्रियसख्या ! सुखी बहुतकाळ; मायातमी जना सुपथ दाखवीं; मुंदित सत्तमा! यात मी.॥ आहेत. 'केकावलीची प्रस्तावना' हा निबंध पहा. 'दिक्कालातीत जो भगवान् त्यास आपुलें आयुष्य मनुष्याने अर्पण करून दीर्घायु इच्छिणे हे केवळ जरी असमंजस दिसते, तथापि गंगेस गंगेच्या पाण्याने अर्घ्यप्रदान करण्याप्रमाणे येथे हे कवीचें आयुरर्पण सप्रेम पूजन जाणावें.' [य० पां०] सकललोकजीवातु परमेष्ठीला मानवी आयुष्य देणे हे हास्यास्पद व भ्रममूलक आहे. असें असतां मोरोपंतांनी हा वेडगळ प्रकार कसा केला? असा प्रश्न कांहीजण कदाचित् करतील. त्याला उत्तर असे आहे की काव्याचा प्रधान हेतु मनोरंजन हा साधण्यास कवीला ज्या कांही कल्पना योजाव्या लागतात त्यांचा भ्रम वाचणाऱ्यांच्या मनांवरही असावा लागतो. यास्तव काव्यवाचनापासून मनाला आनंद व्हावा अशी इच्छा असल्यास पर आ कांही ज्ञान घटकाभर विसरले पाहिजे. कवीची प्रतिभा ही मदिरेप्रमाणे आहे. तिच्या कवि असतां जे कित्येक वेडगळ दिसणारे विचार तो बोलतो त्यांची रुचि घेण्यास त्याच्या वाचकांनीही काही वेळ गुंगले पाहिजे. कर्णानें पृथ्वी उचलली, रावणाला दहा तोंडे होती, सावता वानर व आस्वलें ही बोलत, सुग्रीव व वाळी हे सूर्य व इंद्र यांचे वीर्य एका वातीच्या ग्रीवेवर व केशावर पडून उत्पन्न झाले, शिळा सागरावर तरल्या, एका मोकाच्या पदस्पर्शाने शिळेची सुंदरी झाली, धर्मपक्ष्यांनी जैमिनीस ज्ञान सांगितले, नव मांडव्यऋषीने सूर्योदयापूर्वी मरशील असा शाप दिला ह्मणून एका पतिव्रतेने सूर्योदयच लोषाच्या मस्तकावर पृथिवी आहे, वगैरे पौराणिक गोष्टींच्या वाचनापासून आनंद होण्यास की काही काळपर्यंत आपलें भौक्तिकशास्त्रांचे ज्ञान विसरले पाहिजे. ५. दीनानें. १. अस, राहा. २. प्राणसख्या! देवा! तुम्ही सदोदित सुखी असा. मग आम्हाला कष्ट झाले तरी हरकत नाही. कारण आम्ही जगून फुकट आयुष्याचे दिवस मात्र वेंचणार, तेंच तुम्ही जगलांत तर अज्ञानरूप अंधकारांत भटकणाऱ्या पतितांस पुण्यमा. र्गाचा उजेड दाखवून त्यांचे कल्याण तरी कराल-असा भावार्थ.३.मायातमी अब +अंधकारांत-मायारूप अंधकारांत. माया अज्ञान. अज्ञानरूप अंधकारांत भटकत फिरणाऱ्या लोकांस-पाप्यांस-उत्तम मार्ग जो भगवत्प्राप्तीचा मार्ग तो दादीरात रस्ता चुकून भलत्याच वाटन जाऊन खाचखळग्यांत कांटेझडपांना सरूला रस्त्यावर आणणे जसे चांगल्या मनुष्याचे काम आहे तद्वतच अज्ञानांधकारांत पुण्यमार्ग सोडून पापमार्गाने जाणाच्या पतितांस फिरून पुण्यमार्ग दाखविणे देवा। तुमचे काम आहे ते तुम्ही करा, त्यात मला आनंद आहे. ईश्वरी कृपा व सन्मार्गदर्शनः-ईश्वरी कृपेशिवाय पतितास सन्मार्ग दिसणे नाही. ऋग्वेदांतील पुढील प्रार्थना पहा:(मंडल १ सूक्त ९० ऋ० १) 'ऋजुनीति नो वरुणो मित्रो नयतु विद्वान् । अर्यमा देवैः सजोषाः ॥ (मंडल १ सूक्त१०४ ऋ० २)ओत्ये नर इन्द्रमूतये गुर्नू चित्तान्सद्यः अध्वनःजगम्यात्॥ यांचे भाषांतर प्र०१०१यांत दिले आहे. बायबलांतील पुढील प्रार्थना पहा:-" Shew me They ways, O Lord. (teach me Thy paths. Lead me in Thy truth, and teach me.' (Ps. XXV;