________________
१३४ मोरोपंतकृत असोत तुज आमुची सकल भावुकायुर्बळें; जगोनि बहु काय म्यां सैंकृत जोडिलें दुर्बळें ? । १. आमुची सकल भावुकायुर्बळें तुज [देवा] असोत, म्यां दुर्बळें बहु जगोनि काय सुकृत जोडिलें! प्रियसख्या! [देवा!] बहुत काळ सुखी असें; मायातमी जना सुपथ दाखवीं, [हे] सत्तमा ! यांत मी मुदित [होय]-असा अन्वय. प्रास्ताविकः-भगवंताला यत्किंचितही कष्ट पडूं नयेत इतकेच नव्हे, तर त्याने सर्वकाळ सुखी असावें आणि आपल्या सर्व आयुष्याच्या अर्पणाने त्याने दीर्घायु व्हावे असा स्वधिक्कारपूर्वक प्रेमभाव दाखवीत कवि प्रार्थितात. २. आमची. आम्हां भक्तजनांची. ३. भावुक (भक्त)+आयुः (जीवित)+बळे भक्तांची आयुष्ये. 'सकळ भाविकायुर्बळें' असाही पाठ आढळतो. त्याचा अर्थ 'भाविक जनांची सगळी आयुष्ये असा करावा. 'आयुष्याचे बळ, आयुष्याची दोरी, आयुष्याची मर्यादा' ह्या सर्वांचा अर्थ एकच आहे. देवा! तुला कष्ट पडूं नयेत इतकीच आम्हांस काळजी आहे असे नाही, तर तूं निरंतर सुखी असावे असेंही आम्ही इच्छितों. यास्तव आम्हां सर्व निष्ठावंत भक्तांची अवशिष्ट आयुष्ये तुला असोत असें मी ह्मणतों' असा प्रथम चरणाचा अर्थ. भक्तीची पराकाष्ठाः-भगवंताला आयुष्य अर्पिण्यांत पंतांनी येथे आपल्या भक्तीची पराकाष्ठा दर्शविली. आपले आयुष्य दुसऱ्याला देणे हे प्रेमाचे मोठे लक्षण समजले जाते. पौराणिककालांतील रुरुप्रमद्वारा (आदिपर्व-अ० ३ गी० २६-४२) व अर्वाचीन इतिहासांतील बाबर-हुमायून यांच्या गोष्टी वाचकांनी लक्षात आणाव्या. जो कोणी अत्यंत जिवलग असतो त्याला 'माझें सारे आयुष्य तुला असो' असा आशीर्वाद देण्याचा संप्रदाय फार आहे. हे 'आशी' नामक अलंकाराचे उदाहरण जाणावें. जेथें अभीष्टवस्तुप्राप्ति होवो असें आशीर्वादात्मक वर्णन असते तेथे आशी अलंकार होतो. याचे सोदाहरण लक्षण:-'आशीर्नामाभिलषिते वस्तुन्याशंसनं यथा । पातु वः परमं ज्योतिरवाङ्मनसगोचरम् ॥ १५७ ॥.' [दंडिकृत काव्यादर्श-द्वितीय परिच्छेद.] 'पतीची परम आवडती हो' 'तुला चक्रवर्ती पुत्र होवो' 'हे राजा ! तुला मार्कंडेय ऋषीचे आयुष्य असो' ही आशी अलंकाराची उदाहरणे समजावी. केका ११८,११९ यांतही हाच अलंकार आहे. ४. सत्कर्म, पुण्य. 'म्यां दुर्बळें बहु जगानि काय सुकृत जोडिलें ??=म्यां पामराने इतके दिवस जगून कोणते पुण्य आचरिलें ? कोणतें परमार्थसाधन केले ? कोणतेच केले नाही हे उत्तर. (येथे 'प्रश्नालंकार झाला.) तेव्हां पुढे तरी मी काय सत्कर्म आचरणार हे यावरून दिसतेच आहे. म्हणून मजसारख्या दुर्बळांची आयुष्ये तुजसारख्या पुण्यश्लोकास असावीत म्हणजे त्यांचे सार्थक होईल. काव्यांतील भ्रामक कल्पना व काव्यानंदःमनुष्याचे आयुष्य नियमित असल्यामुळे त्याच्या हातून फारशी सत्कमै होऊ शकत नाहीत, तहत् ईश्वराचेही आयुष्य कदाचित् त्याच्या सत्कर्माचरणास पुरणार नाही अशी शंका घेऊन कवान आम्ही सर्व दुर्वळांची आयुष्ये तुला असोत असे म्हटले आहे. हा विचार वास्तविक पाहातां ॐणाचा आहे. पण असले प्रेममदिरेच्या भरांत सुचलेले खुळे विचार उत्तम कवित्वाचे पोषक