पान:केकावलि.djvu/133

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२८ मोरोपंतकृत 'कसें तरि करूं तुझें अवन; पूरवू आळ जी तशीच पराशराला होती, त्याला पाहिजे तितकी वर्षे तप करित जगावे अशी शक्ति नव्हती, आणि अग्नीच्या देवत्वावर त्याचे ब्रह्मवर्चस्व नसे हे उघड दिसून येतें' (वेदार्थयत्न अंक १७ पृ० १४५-१४६). ६. 'शिवणे' या क्रियेच्या योगाने कृतांताचे सांनिध्य कवीने स्पष्ट दाखवून भगवंताच्या सत्वरागमनाची आवश्यकता सुव्यक्त केली आहे. ७. पावणे= प्रसन्न होणे, जवळ येऊन साहाय्य करणे. या पामराचे आपणापाशी इतकेंच विनयपूर्वक आणि प्रार्थनापुरःसर मागणे आहे की काळाने मला पकडिलें नाहीं तों आपण येऊन माझा उद्धार करावा. १. अन्वयः-'तुझें अवन कसे तरि करूं, जी मनिं आळ असेल ती पूरबू, आमची काळजी तुज रे! कशास? हो प्रियतमा! जगजीवना! असें जरि [तुम्ही म्हणाल तर] जी वना सुखसमृद्धि ती तदाश्रितमृगासि ही होय. २. प्रास्ताविकः-माझ्याकरितां तुम्हां प्रभुवराला आयत्या वेळी एकटेंच धांवत येण्याचे श्रम पडूं नयेत असे माझ्या मनांत आहे, पण देवा! यावर तुमचे म्हणणे पडेल की 'कोणत्या तरी रीतीने आम्ही तुझें रक्षण करूं, तुझा उद्धार करूं मग तसे करण्यांत आम्ही एकटे येऊ अथवा दुकटे येऊ अथवा आम्हांला धांवावें लागो किंवा सावकाश चालावें लागो, त्याची तुला काळजी नको' अशी आशंका देव वेतील असे पहिल्या दोन चरणांत दर्शवून पुढील दोन चरणांत तिचें कवि समाधान करतात. अवन=रक्षण. ३. तृप्त करूं. येथे 'पूरवू' शब्दांत हस्व उकाराचे जागीं दीर्घ ऊकाराची योजना कवीने वृत्तसुखास्तव केली आहे. पंतांच्या निरंकुशत्वाविषयी अल्प विचारः-वृत्तसुखास्तव कवीनें आपलें निरंकुशत्व जागोजागी गाजविलेले आढळते. -हस्वास्तव दीर्घ, दीर्घास्तव -हस्व, चुकीचा संधि, समास असून संधि नाहीं, 'घ'स्तव 'ख', 'ढ'स्तव 'ड', 'झ'स्तव 'ज' इत्यादि पुष्कळ प्रकारचे निरंकुशत्व पंतांच्या काव्यांत आढळते. इतर कवींच्या काव्यांतून जशी जागोजागी व्याकरणाची ओढाताण, निरंकुशत्व गाजवितांना केलेले भाषेचे खून, जरूर नसतां केवळ वृत्त जमविण्याकरितां दडपून दिलेले 'गा!, वो!, निधानें, पैं, झणी' इ० शब्द किंवा शब्दांश आढळून त्या मानाने सरसत्व फार कमी असते तसें पंतांचे नाही. त्यांच्या विस्तृत काव्यरचनेच्या मानाने त्यांचे निरंकुशत्व फारच कमी आढळून त्यामुळे अर्थहानि किंवा रसहानि झालेली अत्यल्प अशीच आढळेल. पंतांच्या सरस्वतीचा प्रकार इतर कवींच्या पेक्षां फारच भिन्न आढळतो. इतरांच्या तरंगिणींचा प्रवाह बेताचाच असून त्यांच्यांत दगडधोंडे, शेवाळ हेच फार, म्हणून खळखळही फार. पण पंतांच्या सरस्वतीचा प्रवाह सिंधुब्रह्मपुत्रांप्रमाणे अलोट असूनही तिच्यांत दगडधोंडे फार कमी आढळतात व म्हणतन तिचा ध्वनि समुद्राप्रमाणे शांतगंभीर दिसतो. अशा किरकोळ कवींची आमच्या कविराजराजितिलकाशी बरोबरी करणे किंवा एकाच वेळी दोघांचीही नांवें घेणे म्हणजे भवभूतीने म्हटल्याप्रमाणे सामान्य कुंभकाराची योग्यता विश्वनिर्माणकर्त्या ब्रह्मदेवाबरोबर समजण्यासारखे होय. पंतांच्या निरंकुशत्वाची काही निवडक उदाहरणे पुरवणींत दिली आहेत ती पहावी. ४. इच्छा, लळा,