________________
केकावलि. १२७ उशीर मग कां ? बसों कृपण मीही कां शोचित ? । नव्हे |भुवरा! तुम्हां उचित एकटें धांवणे; कृतांत र्शिवला नसे तंव, दिसे बरें पावणे. ॥ ४७ १. तुम्हांकडून मदुद्धरणाविषयी इतका विलंब कां व्हावा? २. दीन,अनाथ. कद्र हा अर्थ येथे अपेक्षित नाही. म्यां अनाथाने तरी तुमची वाट पाहात व कोणी मला तारणारा नाहीं, तूंही प्रसन्न होत नाहींस असा शोक करीत कां बसावें? तुम्ही माझें तारण करण्याविषयी उशीर करूं नका म्हणजे मलाही शोक करीत बसावे लागणार नाही.असा भावार्थ. ३. खेद करीत. 'शुच् धातु संस्कृतांत शोकार्थक आहे. यापासून शोचणे (शोक करणे) हा धातु झाला आहे. ४. प्रभुश्रेष्ठा! राजाधिराज! 'आयत्या वेळेस धांवत येऊन मी तुझा उद्धार करीन' असें देवा! तुम्ही म्हणाल अशी शंका घेऊन कवि म्हणतात. पृथ्वीवरील सर्व राजांमध्ये तसेच स्वर्गीय देवांमध्ये श्रेष्ठ जे तुम्ही त्या तुम्हांला कोणी बरोबर न घेतां एकटें धांवणे योग्य नाही. प्रभुवर आणि धावणे या दोन्ही शब्दांनी व्यधिकरण दाखविले आहे. प्रभुवर शब्दानें धांवणे अनुचित असें दर्शविले आहे. कवि कळवळून म्हणतातः-हे देवा! गजेंद्राला मुक्त करण्यासाठी आपण एकटे धांवत धांवत गेला, तसे प्रसंग येऊन ठेपल्यावर तुम्ही धांवत-उड्या टाकीत-याल, पण प्रभुवराने एकट्याने धांवत येणें अनुचित होय. ५. यम. 'कृतांतो यमुनाभ्राता शमनो यमराट् यमः' इत्यमरः. शेवटच्या चरणाचा अर्थ:-जोपर्यंत मी मृत्युमुखी पडलों नाहीं, (यमाचा फांस जोवर माझ्या गळ्यांत पडला नाही) तोंवर माझें रक्षण करणे हे बरे दिसते. जर विलंब कराल तर तुमचे येणे माझ्या उपयोगी पडणार नाही इतका मृत्यु माझ्या संनिध आला आहे. अथवा, काळाने मला स्पर्श केल्यावर मग तुम्ही गडबडीने एकाकी धांवत यावे त्यापेक्षां अगोदर सावकाशीने इतर भक्तमं. डळीसह आला म्हणजे तुम्हांला श्रम होणार नाहीत. वैदिक प्रार्थना:-'म्हातारपण येण्यापूर्वी आम्हांवर प्रसन्न हो' अशी प्रार्थना ऋग्वेदांत पराशर ऋषीने अग्नीला केली आहे. पराशर ऋषि अग्निची स्तुति करितातः-'हे अग्नि ! वडिलांपासून चालत आलेला [जो तुझा] आमचा स्नेह [तो तूं ] विसरूं नकोस, तर विद्वान्, [आणि] बुद्धिमान् [असा जो तूं तो] आमचे पाठबना दो जसे धुकें [पदार्थाच्या] रूपाला [नाहीसे करून टाकितें तसें] वृद्धपण रूपाला नाहीसे करून टाकिते. [तर] त्या दुर्भाग्यापूर्वीच [तूं आम्हांवर] प्रसन्न हो.' (भग्वेद, मंडल १, सूक्त ७१, मंत्र १०): या मंत्रावरील रा० ब० शं. पां. पंडितांची टीका अनेक गोष्टींस्तव विचारणीय आहे असे समजून येथे दिली आहे:-'ही प्रार्थना पराशर ऋषीने केली आहे, यास्तव याचा विचार मन लावून करणे अवश्य आहे. कारण ज्या पराशराविषयी महाभारतांत, पुराणांत आणि तसल्याच वेदोत्तरकालिक ग्रंथांत अद्भुत चमत्कार वर्णिले आहेत. आणि जो असंख्य वर्षे तप करित बसला होता, म्हणून सांगितले आहे, त्याचे खरे स्वरूप या मंत्रावरून दिसून येते. जशी आम्हां कलियुगांतील बापड्या मल्स म्हातारपणाची भीति असते.